अकोले शहरासह 22 पॉझिटीव्ह तर संगमनेरात 28 रुग्णांची भर.! हे गाव वाळीत टाकलं.! तपासणीवर नगरिक संतप्त.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                      संगमनेर तालुक्यात कोरोनाचे आज पुन्हा 28 रुग्ण मिळून आले आहेत. तर त्यात अकोल्यात पुन्हा 22 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात आता कोरोनाचा प्रदुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे, प्रत्येकाने आता काळजी घेणे गरजेचे आहे. रोज रूग्णांची संख्या वाढती असल्यामुळे, येथील नागरिक काही काळजी घेतात की नाही. असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तर त्या पलिकडे काही नागरिकांनी रॉपीड अ‍ॅन्टीजन टेस्टवरच शंका उपस्थित केली आहे. ज्यांना  अगदी काहीच त्रास होत नाही. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येऊ लागले आहेत. तर कोणत्याही प्रकारचे सिमटन्स नसून देखील बाधीत झाल्यामुळे  संबंधित व्यक्ती आणि कुटुंब यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, हिवरगाव आंबरे यांसारखे प्रतिष्ठीत गावे शेजारच्या गावांनी जणूकाय वाळीत टाकल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. हे गाव 10 दिवस बंद केले खरे, मात्र शेजारची गावे त्यांना दळण दळून देत नाही, कृषीची संसाधने, औषधे, किराणा आणि कोणत्याही प्रकारचा व्यावहार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. तर या गावात जे रुग्ण मिळून आले आहे. त्यांना साधी सर्दी, खोकला सोडा कनकण देखील नाही. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर कारखाना रोड येथे देखील ज्या महिलेला बाधा झाली आहे ती अक्षरश: घराच्या बाहेर देखील निघत नाही, तरी देखील त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या बधुराजांना आरोग्य विभागाची चांगलीच कानउघडणी केली आहे. विशेष म्हणजे ते देखील एक डॉक्टर आहेत. त्यामुळे, कोरोना आणि त्याचे परिणाम यात मोठी संदिग्धता आणि साशंकता असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेणे आवश्यक झाले आहे.

आता संगमनेर तालुक्यात संगमनेर मध्ये कोरोनाची घोडदौड आजही सुरूच आहे. आज पुन्हा २७ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात शहरातील ४ रुग्ण आढळुन आले आहे. यामध्ये शहरातील रंगारगल्ली येथे ५६ वर्षीय महिला, घोडेकर मळा येथे ९ वर्षीय बालक तर मोमीनपुरा येथे २० वर्षीय युवकास तर कुंभारगल्ली येथे ६५ वर्षीय वयोवृद्धास कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज ग्रामीण भागातील १४ गावे मिळुन २३ रुग्ण आढळुन आले आहे. यामध्ये आश्वि बु येथे ५१ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे ५५ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा ७६ वर्षीय वयोवृद्ध, राजापूर येथे ६२ वर्षीय पुरुष तर ५६ वर्षीय महिला तर बोटा येथे ४५ वर्षीय पुरुष तर २२ वर्षीय महिला व १९ वर्षीय युवकाला आणि ३९ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे .पिंपरी लौकी येथे ३१ वर्षीय पुरुष तर ढोलेवाडी १४ वर्षीय युवक व २५ वर्षीय महिला तर वडझरी २९ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरालगत असलेल्या कसारा दुमाला ४६ वर्षीय पुरुष तर चंदनापुरी येथे ६६ वर्षीय वयोवृद्धास तर वडगावपान येथे ४५ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिला आणि १७ वर्षीय युवतीला तर मेंढवण येथे ७ व ६ आणि ७ वर्षीय बालकाना कोरोनाची बाधा झाली आहे. तर गुंजाळवाडी येथे ४३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढवून १ हजार १८० वर जाऊन पोहचला आहे.  दरम्यान, संगमनेर शहरात रोजच दोनअंकी आकडा पहायला मिळत होता. आज तो आकडा कमी होताना दिसुन येत आहे. आज शहरात चार कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहे. तर ग्रामीण भागातील मेंढवन येथे चिमुरड्याना कोरोनाची बाधा झाली आहे.तर वडगाव पान व बोटा येथे आज कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

तर आज अकोले तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात धामनगाव आवारी येथे 44 वर्षीय पुरूष, कोतुळ येथे 40 वर्षीय पुरुष, परखतपुर येथे 39 वषीय पुरूष, मनोहरपूर येथे 15 वर्षीय तरुण, 40 वर्षीय पुरुष तर 34 वर्षीय महिला अशा तिघांना बाधा झाली आहे. तर हिवरगावला कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. तेथे आज पुन्हा अवघ्या 8 वर्षीय मुलीस, 51 वर्षीय पुरुष तर 46 वर्षीय महिलेसा कोरोनाचा प्रुदुर्भाव झाला आहे. तसेच गेल्या कित्तेक दिवसांपासून कळस हे सुरक्षित होते. आता मात्र तेथे 30 वर्षींय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच अकोले शहराच्या लगत असणार्‍या कारखाना रोडचे कोरोना ग्रहन काही सुटता सुटत नाही. तेथे आज पुन्हा संपर्कात असलेल्या चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 42 वर्षीय पुुुरुष, 71 वर्षीय पुुुरुष, 16 वर्षीय बालक, 12 वर्षीय बालिका, देवठाण येथे 85 वर्षीय पुरुष तसेच कोतुळ येथे 41 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुण, 45 वर्षीय महिला तर 56 वर्षीय पुुुरुष, तर समशेरपुर येथे 58 वर्षीय पुरूष, कोतुळ येथे 41 वर्षीय पुरुष, तर अकोले शहरातील पोष्ट ऑफिस जवळ 30 वर्षीय तरुण अशा 22 जणांना आज कोरोनाची लागण झाली आहे.

                               

तर अहमदनगर जिल्ह्या रुग्णालयातून आलेल्या अहवालात म्हटले आहे की, आज एकूण 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 9 हजार 505 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 73.86 टक्के इतकी झाली आहे. दरम्यान, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजले पासून तर आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 609 ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 211 इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 242, अँटीजेन चाचणीत 207 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 160 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223,  संगमनेर 1, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 4, श्रीरामपूर 6, कॅन्टोन्मेंट 04, अकोले 1, शेवगाव 1, मिलीटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत आज 207 जण बाधित आढळून आले. त्यामध्ये, संगमनेर 31, राहाता 14, पाथर्डी 13, श्रीरामपुर 17, नेवासा 21, श्रीगोंदा 09, पारनेर 11, अकोले 15 राहुरी 07, शेवगाव 17,  कोपरगाव 18, जामखेड 13 आणि कर्जत 21 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 160 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामध्ये, मनपा 89, संगमनेर 12, राहाता 04, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 26, श्रीरामपुर 04, नेवासा 02, श्रीगोंदा 01, पारनेर 04, अकोले 03, राहुरी 02 कोपरगाव 01, जामखेड 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण 512 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 193, संगमनेर 18, राहाता 16, पाथर्डी 61, नगर ग्रा. 25, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 21, नेवासा 9, श्रीगोंदा 21, पारनेर 14, अकोले 19, राहुरी 17, शेवगाव 6, कोपरगाव 20, जामखेड 5, कर्जत 36 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या 9 हजार 505 झाली असून उपचार सुरू असलेली रूग्ण संख्या 3 हजार 211 झाली आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 153 इतकी झाली आहे. तसेच आजवर एकूण रूग्ण संख्या 12 हजार 869 वर जाऊन पोहचली आहे.

- सुशांत पावसे