संगमनेरात सरकारी पुरस्काराने निर्माण झाला तिरस्कार.! साहेबांच्या कार्यकत्यांचा सन्मान बाकीच्यांचा अपमान.! पोलीस दलातही सल.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                               एका हाताचे दान दुसर्‍या हातला माहित होता कामा नये असे म्हटले जाते. मात्र, संगमनेरात 20 रुपये खर्च आणि 25 जण फोटात हे कोविडच्या काळात येथे सर्रस पाहवयास मिळाले. कदाचित हेच प्रशासनाला भावले, मात्र, ज्यांनी मदती केल्या त्याची कानोकान खबर कोणाला झाली नाही. त्यात बाबासाहेब कुटे, मालपाणी यांच्यासारखे अनेकजण आहेत. तर इतकेच काय! ज्यांनी पुरस्कार म्हणून नव्हे! तर एक कर्तव्य आणि समाजसेवा म्हणून स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही, असे देखील संघटन संगमनेरात आहे. मात्र, या तरुणांनी ज्या भावनेने पडत्या काळात मैदानात उतरुन कामे केले. त्यांच्या भावनांचा चुराडा प्रशासनाकडून झाल्याची सल त्यांनी बोलून दाखविले आहे. कारण, प्रशासनाने सत्ताधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सन्मान केला. मात्र, ज्या काही तरुणांनी अथक परिश्रम घेऊन प्रशासनाचे काम हलके केले. नागरिक म्हणून आपले उत्तरदायीत्व पार पाडले  त्यांना अक्षरश: दुसवट्याची वागणून दिली असे मत त्यांनी सार्वभौमकडे मांडले आहे. इतकेच काय! महसूल विभागाने त्यांच्या अनेक कर्मचार्‍यांचा सन्मान केला. ज्या कुरण बाबत "रोखठोक सार्वभौम"ने लेख लिहीला त्यातील सर्व कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आभार!  मात्र, पोलीस खात्याचा सन्मान करताना देखील कोठेतरी आखडता हात घेतल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखविली आहे.

      अर्थात प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी त्यांचे विभाग चांगले कवर केले. फार श्रम घेतलेल्यांचा सन्मान त्यांनी न चुकता केला. हे त्यांचे कौशल्य आणि अ‍ॅक्टीव्हपणा होता. मात्र, पोलीस खात्याविषयी असे दिसून आले नाही. येथील पोलीस उपधिक्षक हे उपक्रमशिल बाबात इच्छूक वाटत नसल्यामुळे अनेक पोलीस कर्मचार्‍यांच्या पंखात बळ नाही तर खच्चीकरण भरल्या झाल्यासारखे त्यांना वाटू लागले आहे. जर दोन तीन महिने सुट्टी न घेता, तालुक्याच्या सिमारेषा राखणे, ताप आला तरी ड्युट्या करणे, कोणाला तरी ड्युट्या करत असताना कोरोनाने ग्रासले. मग ते कोविड योद्धे नाही तर काय? भलेही महसुलने कमी नावे मागितली असेल. मात्र, पोलिसांचा वेगळा कार्यक्रम घेऊन त्यांचा सन्मान करणे असे या अधिकार्‍यांना का वाटत नाही? पाठीवरती हात ठेऊनी लढ म्हणण्याची मानसिकता डिआयजी कृष्णप्रकाश, डिआयजी लखमी गौतम, सीपी डॉ. सौरभ त्रिपाठी, एसपी शैलेश बलकवडे, एसपी चिन्मय पंडीत, एसपी सुनिल कडासणे, एसपी रंजनकुमार शर्मा यांच्यासह एएसपी सागर पाटील, एसपी बजरंग बनसोडे, एसीपी अभिजीत शिवथरे, एसीपी अजय देवरे, एसीपी दत्तात्रय कांबळे, डिवायएसपी बारगजे सर, डिवायएसपी तानाजी बर्डे यांच्यासह अनेक पोलीस अधिक्षक होते. यांच्यासारखे अधिकारी म्हणजे कर्मचार्‍यांचा पंखात बळ भरणारे होते. तर अनेक सपोनी व पोलीस निरीक्षक हे देखील अशा कामात अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. मात्र, संगमनेरात अनेक पोलिसांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

         याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधुन कोरोनाच्या काळात उत्कृष्टकाम करणार्‍या व्यक्तींचा व संघटनांचा प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परंतु, या सत्कार सोहळ्यात प्रामाणिकपणे काम करणार्‍या संघटनाना डावलुन केवळ साहेबांच्या मर्जीतील व्यक्तींचा सन्मान करुन ज्यांनी 12 ते 18 तास कामे केली, ज्यांनी कुटुंब त्यागून स्वत:ला कंटेनमेंट करुन घेत गेली चार महिने सेवा दिली अशा अनेक जणांना डावलण्यात आले. तर केवळ सत्ताधिकारी संघटनांचा सन्मान करुन बाकी कोविड योद्ध्यांचा अपमान केल्याची टिका होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोना काळात जनतेचे ज्यांनी तारण केले. त्यांचा संगमनेर प्रशासनाला विस्मरण झाले की काय?असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. ज्या संघटनाचा आज सत्कार झाला आहे. त्यांना निकष कुठले आणि ज्यांना डावलण्यात आले त्यांच्यासाठी वेगळे निकष आहेत का? असा प्रश्न ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. कोरोनाच्या या महामारीच्या काळात मागील काही महिन्यांपासुन विश्वहिंदू परिषद, संगमेर युथ, शिवआर्मी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर काही संघटनातील तरुणांनी निर्भीडपणे पुढे येऊन काम केले. मात्र, यांच्या योगदानाला डावलून हा कार्यक्रम झाल्याने संगमनेरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे, आज संगमनेर प्रशासनाची द्विटप्पी भुमिका  पाहायला मिळाली. हे सर्व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात होत असल्याने चर्चा वार्‍यासारखी पसरत आहे. या प्रशासनाच्या कार्यक्रमात अप्रत्यक्ष राजकारण होत आहे का? असा देखील प्रश्न संगमनेरच्या जनतेला पडत आहे. कारण यामधील एक संघटना काँग्रेसची विद्यार्थी संघटना असल्याने जनतेच्या मनामध्ये शंकेचे घर निर्माण करत आहे. खरंतर, एनएसयुआय, लायन्स क्लब, शिवजयंती उत्सव समिती या संघटनेचे ही योगदान मोलाचे आहे. परंतु कुठलीही संघटना पुरस्कारासाठी किंवा सत्कार सोहळ्यासाठी काम करत नसते. पण, आज प्रशासनाकडून काही संघटनाना दुजाभाव केल्याचे दिसून आले आहे. हे करून प्रशासन नेमकं संगमनेरच्या जनतेला काय दाखवत आहे. हे मात्र संगमनेरकरांना न उलगडणारे कोडे आहे. का इथे ही प्रशासन कोणाच्या संगण्याहून काम करत आहे. असा संतप्त सवालही संगमनेरचे नागरिक करत आहे.

- सुशांत पावसे