संगमनेरात गणपती उत्सव व मोहरम बाबत अत्यंत महत्वाचा निर्णय.! ना बाप्पाची ना सवारीची मिरवणूक.!

  

संगमनेर (प्रतिनिधी) :- 

               उद्या मोहरम आणि गणपती बाप्पाच्या आगमणासाठी आज संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एक महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा ना श्रीगणेशाची मिरवणूक निघणार आहे ना मोहरमची सवारी निघणार आहे. त्यामुळे, संगमनेरात जो कोरोनाचा प्रदुर्भाव वाढतो आहे, त्यावर आळा बसण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह म्हणाले की, जिल्ह्यात सर्वत्र बैठका सुरु आहे. त्यामुळे, गणपती स्थापनेचा विषय हताळला जात आहे. जे सण येत आहे ते शांत व संयमाने साजरे करावे, कारण, कोरोनाचा प्रदुर्भाव टाळला पाहिजे. या कोरोनातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. त्यासाठी कोरोनासाठी प्रत्येकाने संवेदनशिल राहिले पाहिजे. पोलीस आज जे काम करत आहे. ते कोणासाठी करत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. नागरिकांना त्रास देऊन पोलिसांना आनंद होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने मास्क लावले पाहिजे. कारण, जर प्रत्येकाने मास्क लावले तर ७० ते ८० टक्के आपण सुरक्षित आहोत. उद्यावर गणपती आला आहे. सोशल डिस्टन्स साठी घरात २ ते ३ फुटाचा गणपती बसवा. त्यामुळे ना मिरवणुका ना मोठी वाहणे लागणार. त्यामुळे, बाप्पाचे विसर्जन घरात करता येईल. या वर्षी थोडे सामाजिक भान बाळगा नंतर पुढील वर्षी तुम्ही पुर्वीप्रमाणे मोठे गणपती बसवा आणची कोणतीही हरकत नसेल. बाप्पाची आरती देखील २ ते ३ लोक आवश्यक आहे. ४ ते ५ लोक सुद्धा आरतीला नको आहे. विसर्जन बाबत वार्ड निहाय कृत्रीम तलाव तयार केले जातील. किंवा एक ट्रॅक्टरमध्ये मुर्ती जमा करुन त्यांचे एकाच वेळी नदित विसर्जन केले जाऊ शकते. तसेच, जेव्हा कोणी नदिला किंवा तळ्यावर विसर्जनाला जातात तेव्हा कोणी बुडणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या कुटुंबाची व स्वत:ची सेफ्टी कशी करता येईल ते प्रत्येकाने पहा. तुम्हा सर्वांना उत्सवासाठी शुभेच्छा.!

         संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, कोविडला हरविण्यासाठी आपण चांगल्या उपायोजना केल्या आहेत. आपण त्यासाठी एक जुटीने काम करत आहोत. मात्र, दुर्दैवाने काही लोक मास्क वापरत नाही, आजूनही लोक सुपाऱ्या आणि लग्न करण्यास एकत्र येत आहेत. हे टाळणे गरजेचे आहे. कोविड बाबात ज्या काही सुचना नागरिकांनी दिल्या आहेत त्यावर विचार केला जाईल.  गणपती खरेदीला कोणी एकाच वेळी गर्दी करु नका. आजपासून खरेदीला गर्दी करा, सॅडो मातीच्या गणपतीची स्थापना करावी, नगरपरिषद कृत्रीम तलावाची निर्मिती केली जाईल, मात्र तेथे देखील कोणी गर्दी करु नये. आपल्या कुटुंबात कोणाला सर्दी, खोकला आला तर स्वत:हून काळजी घ्या. कोविड कोणाला सोडत नाही. त्यामुळे, आपला आनंद पुढील वर्षी साजरे करु.  या वर्षा कोविडला हरवायचे आहे. त्यामुळे येणारे प्रत्येक सन घरातल्या घरात साजरे करा. कोविडणे अनेकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे, प्रत्येकाला विनंती आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या.

     अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे म्हणाल्या की, संगमनेर तालुक्याचा मला चांगला अनुभव आहे. ते प्रशासनाचे सर्व नियम पाळणार आहे. त्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आले आहे. त्यात महत्वाचे म्हणजे आता संगमनेर तालुक्यात कोठेही मिरवणूक निघणार नाही. प्रत्येकाने आपल्याला उत्साहाला आवर घालायचा आहे. प्रत्येकाने बाल मंडळाला विरोध करावा. मस्जिदीत सवारी बसेल आणि तेथेच तिचे विसर्जन होईल. कोणीही गर्दी करु नये अन्यथा १८८ चे गुन्हे दाखल केले जातील. गणपतीचे विसर्जन कृत्रीम तळ्यात करायचे आहे. जेव्हा बाप्पाला तळ्यावर न्याल तेव्हा आरती करायची नाही. बाहेर पडाल तेव्हा मास्कचा वापर करावा.

 दरम्यान शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, काँग्रेस शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक,माजी नगरसेवक शौकत भाई जहागीरदार,माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बबलू वामन, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, नगरसेवक पवार, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, शिवसेना शहराध्यक्ष अमर कतारी,नगरसेवक वाकचौरे निखील पापडेजा. अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे,डी.वाय. एस. पी.रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम,नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार,तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील, साहयक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी.यावेळी पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी आभार मानले.

- सुशांत पावसे