संगमनेरात पोलीस अधिकार्‍यासह 24 बाधित तर 23 वा बळी.! अकोल्यात निवृत्त पीएसआय मयत तर आणखी तिघांना बाधा.!

 सार्वभौम (संगमनेर/अकोले) : 

                          संगमनेरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबेनासा झाले आहे. येथे सामान्य नागरिकांसह सरकारी ड्युटी बजावत असणार्‍या कोविड योद्ध्यांना ही बाधा होऊ लागली आहे. कारण, संगमनेर शहरात कार्यरत असणार्‍या सहायक पोलीस निरीक्षक यांचा देखील रिपोर्ट आता पॉझिटीव्ह आला आहे. तर शहरातील कुंभारआळा परिसरात 78 वर्षीय व्यक्तीचा बळी गेला असून संगमनेरात बळींची संख्या 23 झाली आहे. तर अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. तर शहराच्या अवघ्या काही अंतरावर असणार्‍या औरंगपूर येथे देखील कोरोना बाधित एक रुग्ण मिळून आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोनाने तीसरे शतक पुर्ण केले आहे. सर संगमनेरात आज 24 रुग्णांची भर पडली आहेत.

यबाबात सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात 12 ते 15 पोलीस व 22 आरोपींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पोलीस खात्यात हे कोरोनाचे विष हळूहळू पसरत होते. पोलीस ठाणे सॅनिटाईझ केले, तेथे काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या तरी देखील येथील एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या रायटरला कोरोनाची बाधा झालीच. त्यामुळे ती साखळी थेट सपोनी पर्यंत जाऊन पोहचली. त्यामुळे आज दुपारी या पोलीस अधिकार्‍याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तर संगमनेरात कुंभारआळा परिसरात एका 78 वर्षीय वृद्धाला चारपाच दिवसांपुर्वी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ते उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान दोन दिवसांपुर्वी त्यांचे स्वॅब घेतले असता ते पॉझिटीव्ह आले होते. मात्र, त्यांची प्रकृती व मानसिक स्थिती चांगलीच खालावली. त्यानंतर त्यांना अधिकचा त्रास झाला व त्यांनी खेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्युनंतर कोरोना मयतांची आकडेवारी 23 वर गेली आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 112 वर जाऊन पोहचली आहे. त्यात 1 हजार 2 रुग्ण बरे झाले असून 188 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


                        त्यात आज आलेल्या अहवालात संमनेरात 51 वर्षीय महिला, रंगार गल्ली येथे 20 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथे 55 वर्षीय महिला, साळीवाडा येथे 62 व 31 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 20 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथे 38 व 90, 45 वर्षीय पुरुष तर 16 व 12 वर्षीचा बालक तसेच 60 व 35 वर्षीय महिला, कनोली येथे 50 वर्षीय पुरुष, गोल्डन सिटी येथे 20 वर्षीय बालक, कनोली येथे 46 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालक, 36 वर्षीय पुरुष, माळेवाडी (बोटा) येथे 31 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 23 वर्षीय महिला, निमोण येथे 50 वर्षीय महिला, गणेश नगर येथे 54 वर्षीय महिला तर चिंचोली गुरव येथे 35 वर्षीय महिला अशा 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

  तर अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे एका व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला आहे. हे 64 वर्षीय व्यक्ती गेल्या काही वर्षीपुर्वी खात्यात कार्यरत होते. त्यांचे देशासाठी व समाजासाठी फार मोठे योगदान होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनामुळे त्रास होऊ लागला होता. त्यांचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला होता. मात्र दुर्दैवाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहेे. तर अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे देखील कोरोनाचा 45 वर्षीय एक रूग्ण मिळून आला आहे. एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्या पलिकडे आज खाजगीत हिवरगाव आंबरे येथे 32 वर्षीय तरुण तर मनोहरपूर येथे 64 वर्षीय पुरूष असे दोन  अहवाल प्राप्त झाले आहेत. तर आज दि. 17 रोजी ज्यांचे स्वॅब घेतले आहे. ते जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे रिपोर्ट उद्या येणे अपेक्षित आहे.