संगमनेरात पुन्हा 38 तर अकोल्यात 17 रुग्णांची भर.! गणोरे नव्याने बाधित.!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर आणि अकोले दोन्ही तालुक्यात रोज अर्धशतक रुग्ण मिळून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे निर्विवाद सत्य आहे. मात्र, या आकड्याला पुर्णविराम देण्यासाठी नागरिकांनी थोडेसे जबाबदारीने वागले पाहिजे. तर प्रशासनाने देखील तपासणीमध्ये होणार्या संदिग्धतेवर लक्ष दिले पाहिजे. वास्तवत: पुर्वीप्रमाणे आता क्षेत्र कंटेनमेंट करणे, तपासण्या करणे, बाजारहाट पुरविणे अशा प्रकारची कामे आता प्रशासनाला राहिले नाही. त्यामुळे, बाधितांचा शोध घेण्याच्या पलिकडे आता जागरुकता करण्यासाठी गाव पातळीवर वेगवेगळ्या उपायोजना राबविणे गरजेचे आहे. खरंतर कोरोनाची जी पुर्वीची भिती होती तीचे वलय आता कमी झाले आहे. तर जे भितीपोटी लोक मयत होत होते. ते देखील प्रमाण केवळ 10 ते 15 टक्के राहिले आहे. त्यामुळे, कोरोनाला येणार्या काळात बुळगेपणाचे स्वरुप येऊन तो अगदी थंडी तापासारखा आजार होणार आहे. फक्त त्यासाठी बाधितांना धीर देण्याची नित्तांत गरज असल्याचे समाजसेवकांना वाटते आहे. आत अकोल्यात 17 तर संगमनेरात दिवसभरात 38 रुग्ण मिळून आले आहेत. आता हे प्रशासनाचे अपयश नाही तर यश म्हणावे लागेल. कारण, बाधितांचा शोध घेतल्याशिवाय कोरोनाचा अंत नाही. हेच त्रिवार सत्य आहे.
संगमनेरात आज पुन्हा 38 रुग्ण सापडले आहेत. त्यात शिवाजी नगर येथे 41 वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे 26 वर्षीय तरुणी, मेनरोड येथे 48 वर्षीय पुरुष, राहणे मळा 55 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 26 वर्षीय तरूणी, जाखुरी येथे 38 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 51 वर्षीय महिला, वकील कॉलनी येथे 25 व 24 वर्षीय तरुण तर 48 व 80 वर्षीय महिला, गिरीराज विहार येथे 35 वर्षीय पुरुष तर 57 वर्षीय महिला, निमोण येथे 62 वर्षीय महिला, सोनेवाडी 35 वर्षीय पुरुष, हासेमळा 52 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द 43 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 56 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा 48 वर्षीय पुरुष, भारत नगर 31 वर्षीय महिला, लोहारे येथे 64 वर्षीय पुरुष,, कुरकुटवाडी येथे 40 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष, बोटा येथे 55 वर्षीय महिला, वायाळवाडी येथे 26 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडी येथे 95 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरूण, 28 वर्षीय तरुणी चंदनापुरी येथे अवघ्या 7 वर्षीय बालिका, 72 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला तर खराडी येथे 38 वर्षीय महिला तर 52 वर्षीय पुरुष तसेच साकुर येथे 52 वर्षीय पुरुष अशा 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
तर आज अकोले तालुक्यात आज शेकईवाडी येथे 36 वर्षीय महीला, 57 वर्षीय महीला, धामणगाव आवारी येथे 70 वर्षीय पुरुष, गणोरे येथे 22 वर्षीय महीला, लहीत खुर्द येथे 56 वर्षीय पुरूष, 46 वर्षीय पुरूष, धामणगाव पाट येथील 27 वर्षीय महीला, पाडाळणे येेथे 70 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 40 वर्षीय महीला 18 वर्षीय तरुण, 10 वर्षीय बालिका, 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरूष अशा 13 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर कोतुळ येथे ६७ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला असे दोन कोतुळ तसेच सावरगाव पाट येथे ४१ वर्षीय पुरुष तर बदगी बेलापूर येथे ६४ वर्षीय पुरुष असे खाजगी रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोना बाधितांची एकुण संख्या 507 इतकी झाली आहे. त्यात 365 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून 10 व्यक्ती मयत झाल्या आहेत. तर 128 रुग्णांवर उपचार सुरु आहे.