अकोल्यातील राजुरमध्ये सापडले विषारी द्रावण, तिघांवर गुन्हे.! 2 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त.! एक पसार.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील राजूर ते चितळवेढे रोड येथे विषारी द्रावण (गावठी हातभट्टीची दारु) तिघांनी जवळ बाळगले होते. हा प्रकार राजूर पोलिसांना समजला असता त्यांनी तत्काळ पथक पाठवून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे 120 लिटर दारु मिळून आली आहे. ही कारवाई बुधवार दि. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले असून त्याच तिघांना आरोपी करण्यात आले आहे. निलेश अशोक घटकर व विक्रम अशोक घटकर अशी एका गुन्ह्यातील तर सागर दिलीप भारमल (रा. राहुलनगर, राजूर, ता. अकोले) असे आरोपी करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
अकोले तालुक्यातील राजूर येथे दारु विक्री आणि त्यातून निर्माण झालेल्या गुन्ह्यांमुळे शुक्ला गँग राजूरसह तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे. तर शेंडी व राजूर हाद्दीतील काही तडीपारांचे बांधकाम करण्याचे काम राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांचे सुरू आहे. अवैध धंद्यांवर राजूर पोलिसांचा वचक सुरू असताना देखील येथे वाळुतस्कर आणि गावठी हातभट्टीवाला मोठी धाडस करण्याचा प्रयत्न करतात. यापुर्वी देखील पोलिसांनी चितळवेढे येथून वाळु तस्कारावर गुन्हा दाखल केला होता. एकंदर विचार करता येथे अवैध धंदा करणे जिकरीचे झाले आहे. मात्र, जो कोणी प्रयत्न करेल त्याचे धाडस कमल करण्याचे काम पोलीस करताना दिसत आहे.
आता आरोपी निलेश अशोक घटकर व विक्रम अशोक घटकर ही दोघे बुधवारी त्यांच्या ताब्यातील टाटा व्हीस्टा कार एम. एच 48 ए 2449 या गाडीतून दारु घेऊन जाणार असल्याची माहिती पाटील यांना मिळाली होती. दरम्यान त्यानुसार राजूर पोलिसांनी संबंधित गाडी राजूर ते चितळवेढे रोडवर आडविली असता त्यात 31 हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारु असल्याचे लक्षात आहे. त्यावेळी पोलिसांनी एकासह कार ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर एकजण पोलिसांना पहाताच पसार झाला आहे. तर याच वेळी याच रोडवर एक तासानंतर पुन्हा सागर भारमल हा त्याची दुचाकी एम. एच 1 यु ए 3570 हीच्याहून दारु घेऊन चालल्याची टिप पोलिसांना मिळाली होती. तेव्हा त्यास पोलिसांनी रस्त्यात हटकले असता त्याच्याकडे 60 लिटर गावठी हातभट्टीची दारु मिळून आली. त्यामुळे, त्यास अटक करुन पोलिसांनी गाठी व दारु ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर या दोन्ही गुन्ह्यात पोलिसांनी यांच्याकडून 2 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान राजुरमध्ये आमदार हॉ. किरण लहामटे यांनी छाती ठोकून सांगितले आहे. की, मी गुन्हेगारांचा कर्दनकाळा आहे. त्यामुळे, येथे कोणी अवैध धंदे करून दाखवावे. तर त्यांच्या शब्दाला प्रमाण बसेल असे अधिकारी तेथे असल्यामुळे राजुरमध्ये तरी ते शक्य आहे. मात्र, अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी आजही गणेश उत्सवाच्या काळात जुगार सुरू आहेत. तर मटक तर सर्रास सुरू आहे. या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक अनभिज्ञ असले तरी या अवैध व्यवसायिकांना बळ देण्याचे काम खाकीतील काही कर्मचारी करताना दिसतात. त्यामुळे, एका पडद्याच्या आड काय सुरू आहे हे प्रशासनाला जरी दिसत नसले तरी सामान्या मानसांना ते ज्ञात आहे.
- आकाश देशमुख