नामदार साहेब.! कार्यकत्यांची तोंड आवरा.! प्रशासनाला बळ द्या खच्चीकरण नको.!


सार्वभौम (संगमनेर) : 

                    छत्रपती शिवराय आणि माँ जिजाऊ यांनी मावळ्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि फक्त लढ म्हणाले, म्हणून तर तान्हाजी, सुर्याची आणि बाजी, मुरारबाजी यांच्यासारखे मावळे तयार झाले. जेव्हा स्वराज्यावर वेळ आली तेव्हा आधी लगिन कोंढाण्याचे मग रायबाचे अशी गर्जना करणारे मावळे उभे राहिले आणि तेव्हा रयत उभी राहिली. आज संगमनेरच्या मातीवर देखील कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. गेल्या सहा महिन्यात येथे 1 हजार 515 रुग्ण मिळून आले आहे. ना. थोरात साहेब राज्याची धुरा संभाळात आहे. अशा वेळी त्यांच्या मावळ्यांनी येथील अधिकार्‍यांच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हटले पाहिजे, त्यांना सर्वोतपरी मदत केली पाहिजे. मात्र, सहकार्य सोडा.! त्याच्यावर विनामास्क कारवाई केली काय आणि त्यांची इगो झाला काय! त्यामुळे, त्यांनी लढ म्हणण्याऐवजी सोशल माडियाच्या माध्यामातून नगरपालिकेच्या अधिकार्‍यांना टारगेट केले आहे. हे असे आपले पदाधिकारी असतील तर येथे कोरोना अटोक्यात येणार तरी कसा? असा सवाल आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 खरंतर गेल्या सहा महिन्यापासून संगमनेर प्रशासन कोरोनाशी झुंज देत आहे. शहरात 620 तर ग्रामीण भागात 830 रुग्ण मिळून आले आहे. येथे नायब तहसिलदार, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी व डॉक्टर यांना कोरोनाच्या महामारीला सामोरे जावे लागत आहे. तरी देखील बरे झाल्यानंतर हे लोक पुन्हा सामान्य जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत त्यांना बळ देण्याचे काम येथील जनतेचे आहे. त्याचेच एक उत्तरदायीत्व म्हणून नामदार साहेबांनी अनेकदा सन्मान सोहळा देखील राबविला. मात्र, त्यांचे कार्यकर्ते या अधिकार्‍यांवर ताशेरे ओडण्यात दंग झाले आहेत हे मोठे दुर्दैव आहे.                


त्याचे झाले असे की, आज दि. 27  ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याला संगमनेर नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी दुचाकीहून जात असताना अडविले होते. त्याच्या तोंडाला कदाचित मास्क असावे मात्र, ते खाली आल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी त्याला दोनशे रुपयांचा दंड देखील ठोकला. मात्र, पावती देताना कदाचित त्यावर कारण चुकीचे लिहिले गेले. त्यामुळे, त्याचेच भांडवल करीत त्याने सोशल मीडियाचा आधार घेत नगरपालिकेला टारगेट केले. हा सदमा त्याच्या इतका जिव्हारी लागला की, त्याने फेसबुकवर लिखान करुन नगरपालिकेच्या कर्मचारी मंडळींच्या कार्यतत्परतेला सलाम ठोकला. तर दोनशे रुपयांचे दु:ख व्यक्त करीत हा विषय सामान्य जनतेच्या माथी मारला. कोरोनाच्या काळात सामान्य लोकांवर आर्थिक डबघाईचे सकंट आहे, त्यांना फटका बसतो आहे, कोरोना हा हवेतून होत नाही, मात्र या हुशार मंडळींना कोणा समजवणार.! अशा प्रकारे आपल्यावर झालेल्या कारवाईची भडास काढली. म्हणजे जोवर आपल्यावर वेळ येत नाही, तोवर बघ्याची भुमिका घ्यायची आणि आपल्यावर कायदेशीर कारवाई केली तर मात्र प्रशासनावर ताशेरे ओढायचे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे, चुकीला चूक म्हणणे आणि कारवाईला सामोरे जाणे ही मानसिकता पदाधिकार्‍यांची का होत नाही? असे प्रश्न अनेकांना पडले आहे. त्यामुळे, किमान चूक असताना तरी अशा प्रकारची टिका करणे ते देखील काँग्रेसच्या पदाधिकार्‍याने हे प्रशासनाला देखील कोठेतरी ब ोचले आहे. एव्हाना शेतकरी व सामान्य नागरिक शहरात येतो, त्याच्यावर कारवाई देखील होते, तो बिचारा दंड भरतो आणि चालता होता. तो कोठीही वाच्चता करीत नाही. मात्र येथे गावभर डंका पिटून निर्वाळा सादर करण्याचा प्रयत्न केला जातो हे चूक आहे अशा प्रतिक्रिया कर्मचार्‍यांनी दिल्या आहेत.         शहरात कारवाईचा धडाका.!

आता संगमनेर प्रशासन काही प्रमाणात हतबल असले तरी त्यांनी धीर सोडलेला नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, अकोले तालुक्यात गेल्या सहा महिन्यात विना मास्क, थुंकणे वैगरेच्या फक्त 917 कारवाया करण्यात आल्या असून त्यातून निव्वळ 1 लाख 37 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अजून येथे हजार झालेले मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्या तुलनेत संगमनेरात मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्या पथकाने 2 हजार 100 कारवाया करण्यात आल्या असून आजवर 4 लाख 87 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्यामुळे, त्यांचे काम नक्कीच उल्लेखनिय आहे. तर संगमनेरात शहर वाहतूक शाखेने आजवर 658 गाड्यांवर कारवाई केली असून 40 जणांवर विनामास्क कारवाई केली आहे. तसेच जानेवारी ते जुलै या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी 23 लाख 15 हजार 300 रुपयांच्या कारवाया केल्या असून केवळ ऑगस्ट महिन्यात 4 हजार 647 केसेस करुन 10 लाख 5 हजार 400 रुपये दंड होईल अशी कारवाई केली आहे. शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी 269 व 188 नुसार 14 शे कारवाया केल्या आहेत. (यात शहर वाहतून शाखा व नगरपालिकेचा दंड समाविष्ट आहे.)

आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. जर कोणाला अडविले तर तो कोणत्या ना कोणत्या पदाधिकार्‍याचा फोन आणतो. विशेषत: येथे नामदार साहेब काही हस्तक्षेप करीत नाहीत. मात्र, त्यांच्या नावाखाली येथे अनेकदा अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचे काम केले जाते. जर सगळ्यांनाच सोडून द्याचे तर कारवाई करायची कोणावर? जर पदाधिकारीच अधिकार्‍यांना चुकीचे ठरवत असेल तर त्यांना या पडत्या काळात बळ द्यायचे कोणी? आपल्यावर कारवाई झाली म्हणजे सगळी शासकीय प्रणालीच चुकीचे हे म्हणणे कितपत योग्य आहे? त्यामुळे, आज दिवसभर सोेशल मीडियावर होणार्‍या चर्चेवर अनेकांनी टिका केली आहे. त्यामुळे, साहेबांनी पदाधिकार्‍यांना तरी संयमाचे धडे शिकविणे गरजेचे आहे असे मत कर्मचार्‍यांनी व्यक्त केले आहे.