समनापुरात दोन गट एकामेकांना भिडले.! एकाने नाक फोडले तर एकाने डोके, दोघे रक्तबंबाळ, 15 जणांवर गुन्हे दाखल
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणाहून दोन गटात तुफान हाणामार्या झाल्याची घटना रविवार दि. 16 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात कोणाचे नाक फुटले तर कोणाचे डोके फुटून दोन्ही गटाचे दोघे रक्तबंबाळ झाले आहे. यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आरोपी केलेल्या सर्वांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दोन्ही गटाच्या वदात पर्वत नामदेव गेठे (रा. समनापूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गाठे आणि शेरमाळे यांचा त्यांच्या वस्तीकडे जाण्यायेण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यावर पर्वत गेठे हे मुरूम टाकत असताना आरोपी अंबादास हारकु शेरमाळे, पोपट हारकु शेरमाळे, बाळासाहेब हारकु शेरमाळे व इतर चार ते पाच व्यक्ती यांनी गेठे यांच्या घरातील लोकांना वाईट-वाईट शिवीगाळ करुन दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तर आरोपी पोपट हारकु याने त्याच्या हातातील गजाने पर्वत यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांनी दिलेल्या वरील फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार करीत आहेत.
तर दुसर्या गुन्ह्यात कविता बाळासाहेब शेरमाळे (रा. समनापुर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेठे व शेरमाळे यांच्या एक सामाईक कच्चा रस्ता आहे, त्यावर मुरूम टाकण्याच्या कारणाहून एकमेकांमध्ये वाद झाले होते. त्यावेळी आरोपी पर्तव ज्ञानदेव गेठे, योगेश बाळु गेठे, सखाराम गंगाधर गेठे, पोपट सखाराम गेठे, बंटी पोपट गेठे, पमा पोपट गेठे व मिरा गेठे (रा. समनापूर) यांनी कविता यांच्या घरातील लोकांना वाईट शिवीगाळ व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तर पोपट व बंटी यांनी मिळून कविता यांच्या पतीच्या नाकावर बुक्के मारुन रक्तबंबाळ केले. तर पमा व मिराबाई यांनी कविता यांना खाली पाडून लाखाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील लाकडी दांड्याने मारहाण करुन शेरमाळे यांच्या घरातील मानसांना देखील मारहाण केली असे कविता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धादवड करीत आहे.