अकोले आमदारांचा कोरोना अहवाल प्राप्त.! संगमनेरात 22 पॉझिटीव्ह तर अकोल्यात 27 जण पॉझिटीव्ह.!

सार्वभौम (अकोले) :-

                       संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 22 रुग्ण मिळून आले आहेत. आज रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टचे रिपोर्ट आले असून त्यात आश्वी खुर्द, कुरकुटवाडी, राजापूर, वडगाव पान अशा अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा झाली आहे. तर तर अकोले तालुक्यात देखील आज कोरोनाने उच्चांक गाठला आहे. आज एकाच दिवशी तालुक्यात 27 रूग्ण बाधित मिळून आले आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी देखील काल एका रुग्णालयात कोरोनाची पुन्हा टेस्ट केली आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे, त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

                    आज संगमनेर शहरासह तालुक्यात शिबलापूर येथे 62 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरुष, आश्वीखुर्द येथे 50 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुणी, 8 वर्षीय बालक, 30 वर्षीय तरूण, कुरकुटवाडी येथे 32 वर्षीय तरुण 62 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, 69 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे, 47 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथे 72 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 25 वर्षीय तरुण, चिकनी येथे अवघ्या 7 वर्षीय बालक व 36 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 45 वर्षीय महिला, वडगाव पान 32 वर्षीय पुरूष, 3 वर्षीय बालक, कोल्हेवाडी येथे 49 वर्षीय पुरूष असे 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.               

                        तर अकोले शहरातील महालक्ष्मी कॉलणीतील 21 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरूष, 75 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महीला, 46 वर्षीय महीला, तर धुमाळवाडी येथे 55 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महीला, 65 वर्षीय महीला, 17 वर्षीय तरुण, 05 वर्षाची बालिका, रेडे येथील 56 वर्षीय पुरूष व अंभोळ येथे 43 वर्षीय पुरुष अशा एकूण  13 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. ब्राम्हणवाडा येथे 60 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 66 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष,18 वर्षीय तरुण, 85  वर्षीय महीला, 58 वर्षीय महीला, 27 वर्षीय महीला, 18 वर्षीय तरुणी अशा 14 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज तालुक्यातील एकुण 27 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आजवर एकुण 408 रुग्णसंख्या झाली आहे. त्यापैकी 302 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर आजवर 10 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 96 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

र अकोले तालुक्याचे लोकप्रिय व समाजभिमूख आमदार डॉ. किरण लहमटे यांनी काल पुन्हा आपली कोरोना टेस्ट केली आहे. त्यांचे आजकाल होणारे दौरे, लोकांमध्ये मिसळणे व हाक देईल त्याच्या मदतीला धावून जाणे त्यामुळे त्यांचा नेहमी जनतेत वावर आहे. इतर आमदार आणि पुढारी यांच्यासारखे ते घरात बसून उंटाहून शेळ्या वळल्यासारखे करत नाही. तर स्वत: मैदानात उतरुन काम करीत आहेत.  तर गेल्या काही दिवसांपासून उद्घाटन, समारंभ आणि जलपूजन या कारणांमुळे त्यांची प्रचंड धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे, काही प्रमाणात त्यांना कणकण जाणवत होती. त्यामुळे, आपल्यापासून कोणाला त्रास नको, या हेतूने त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. मात्र, त्यात त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यापुर्वी देखील एका वादग्रस्त पार्टीच्या नावाने डिंडोरा पिटला गेला होता. तेव्हा अकोले तालुक्यात प्रशासकीय अधिकार्‍यांसह आमदारांनी देखील आपली टेस्ट करून घेतली होती. ती देखील निगेटीव्ह आली होती. 

 तर आज सायंकाळी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल रविवार दि. 23 रोजी सायंकाळी सहा वाजले पासून तर आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५१९ ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३८९ इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९१, अँटीजेन चाचणीत २८३ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४५ रुग्ण बाधीत आढळले आहेत. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६१, संगमनेर ०१, पाथर्डी १२, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर ०१,  कॅन्टोन्मेंट ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

     तसेच अँटीजेन चाचणीत आज २८३ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये, मनपा ५८, संगमनेर १७, राहाता १५, पाथर्डी १७, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट १६, नेवासा ११, श्रीगोंदा ३२, पारनेर ०८, अकोले २७, शेवगाव ०३, कोपरगाव ४०, जामखेड २३ आणि कर्जत १४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १४५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामध्ये, मनपा ९३, संगमनेर  ०४, राहाता ०५, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण १४,  श्रीरामपुर ०४, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०२, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०६, कोपरगांव ०५, जामखेड ०४ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ४८६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७१, संगमनेर ३९, राहाता ३९, पाथर्डी २५, नगर ग्रा.२०, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा १४, श्रीगोंदा १६, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ०७, शेवगाव १०, कोपरगाव ३५, जामखेड २३,कर्जत ०८, मिलिटरी हॉस्पीटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेली रुग्ण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली असून उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या ३ हजार ३८९ वर जाऊन पोहचली आहे तर आजवर २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या १७ हजार ५८३ रुग्ण झाले आहेत.