अकोल्यात कोरोनाचा 27 ने उच्चांक.! संगमनेरसह 486 रुग्ण बरे.! रेड्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव.!

सार्वभौम (अकोले) :-

                        अकोेले तालुक्यात आरोग्य यंत्रणा जितकी सज्ज तितके रुग्ण वाढू लागल्याचे दिसते आहे. बोलबोल करता तालुक्यात कोरोनाने चौथे शतक गाठले आहे. तर मृत्युचा दर देखील तालुक्यात वाढता आहे. तालुक्यात आजकाल जे रूग्ण मिळून येतात त्यात कुटुंबेच्या-कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण फार आहे. तीच परिस्थिती आजही कायम आहे. कारण, अकोले शहरात महालक्ष्मी कॉलनी येथे काल आणि आज जे रुग्ण मिळून आले आहेत. ते कोविड योद्धे बाधित डॉक्टरांच्या संपर्कातीलच असल्याची महिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. तर ब्राम्हणवाडा पीएससीच्या अंतर्गत जे काही स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 14 व्यक्ती पॅझिटीव्ह आल्या आहेत. या व्यक्ती देखील पुर्वी पॉझिटीव्ह असणार्‍या व्यक्तींच्या संपर्कामुळे हा प्रदुर्भाव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर रेडे येथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील व्यक्ती कोरोना बाधिताच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला काही शंका आल्यामुळे त्याने स्वत:हून पुढे यात तपासणी केली असता तो रिपोट पॉझिटीव्ह आला आहे. 

आज अकोले तालुक्यात कोरोनाने चक्क थैमान घातले. त्यात अकोले शहरातील महालक्ष्मी कॉलणीतील 21 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरूष, 75 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महीला, 46 वर्षीय महीला, तर धुमाळवाडी येथे 55 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महीला, 65 वर्षीय महीला, 17 वर्षीय तरुण, 05 वर्षाची बालिका, रेडे येथील 56 वर्षीय पुरूष व अंभोळ येथे 43 वर्षीय पुरुष अशा एकूण  13 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. ब्राम्हणवाडा येथे 60 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 66 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष,18 वर्षीय तरुण, 85  वर्षीय महीला, 58 वर्षीय महीला, 27 वर्षीय महीला, 18 वर्षीय तरुणी अशा 14 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज तालुक्यातील एकुण 27 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आजवर एकुण 408 रुग्णसंख्या झाली आहे. त्यापैकी 302 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर आजवर 10 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 96 रुग्णांवर उपचार सुरु आहे.


तर आज दुपारी नगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज 486 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 964 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण देखील 80 टक्क्यांहून अधिक असून ते आता 81.47 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 65 ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 943 इतकी झाली आहे. तर बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 44, पाथर्डी 10, नगर ग्रामीण 05, श्रीरामपूर 01,  कॅन्टोन्मेंट 02, श्रीगोंदा 01, पारनेर 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 486 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 171, संगमनेर 39, राहाता 39, पाथर्डी 25, नगर ग्रा.20, श्रीरामपूर 11, कॅन्टोन्मेंट 21, नेवासा 14, श्रीगोंदा 16, पारनेर 29, अकोले 13, राहुरी 07, शेवगाव 10, कोपरगाव 35, जामखेड 23,कर्जत 08, मिलिटरी हॉस्पीटल  05 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या आता 13 हजार 964 इतकी झाली असून 2 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आजवर 232 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रूग्ण संख्या 17 हजार 139 इतकी झाली आहे.