अभिमानास्पद.! अकोले नगरपंचायतीच्या शिरपेचात पंतप्रधानांनी खोवला मानाचा तुरा.! स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2020 सचिनकुमार पटेल स्विकारणार.!

सार्वभौम (अकोले) :

                          अकोले तालुका चळवळ आणि निसर्ग याबाबत देशात प्रसिद्ध आहे. तर आता गुणवत्तेत देखील संसदेच्या दस्तावेजात अकोल्याचे नाव सामाविष्ठ झाले आहे आणि जर चांगले अधिकारी लाभले तर रिकामे उद्योग करण्यापेक्षा येथील जनतेची व तालुक्याची छाती कशी फुगेल यात कार्यमनग्न असतात. त्याचेच उत्तम उदा. म्हणजे सचिनकुमार पटेल यांनी दाखवून दिले आहे. कारण, केंद्र शासनाच्या टिमने एक स्वच्छ सर्वेक्षण हा एक उपक्रम राबविला आहे. त्यात राज्यातील 12 नगरपंचायती यांच्यात अकोले नगरपंचायतीने मानाचे स्थान पटकाविले आहे. तर जिल्ह्यात फक्त शिर्डी व अकोले पंचायतीचे नाव आहे. यांना आता 20 ऑगस्ट रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2020 हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोले नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांना न्योता पाठविण्यात आहे आहे. त्यामुळे, ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.

खरंतर अकोले नगरपंचायत म्हटलं की पुर्वी कर्मचारी भ्रष्टाचार, इलईडी भ्रष्टाचार आणि एकहाती सत्ता असल्यामुळे सगळा सावळा गोंधळ दिसत होता. मात्र, त्यानंतर अकोल्यात राजकारणाचे वारे उलट्या दिशेने वाहिले आणि एकीकडे आ. डॉ. लहामटे तर दुसरीकडे मा. आमदार पिचड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेंड्याची टक्कर सुरु झाली. त्यात काही अतिशहाणे त्यामुळे अधिकार्‍यांनी कामे करायची तरी कशी? अशा विपक्ष परिस्थितीत मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी पहिला प्रश्न स्वच्छतेचा अंगवळणी पाडून घेतला. म्हणून तर आज अगदी सोशल मीडियावर जरी कोणी तक्रार केली तरी त्याचे अगदी सहज निरसन होऊ लागले आहे. त्याचा फायदा इतका झाला की, जेव्हा केंद्राने स्वच्छ भारत अभियान राबविले त्या मुल्यांकनात पटेल यांचे काम खरोखर पटेल असे होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही बाकी तालुक्यांमध्ये जाऊन आरोग्याची समस्या पहाल तर तुम्हाला किळस आल्याशिवाय रहावणार नाही. एवढेच काय! संगमनेरात प्रवेश करताना म्हळुंगी नदिकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय फिल होते. हे तुमच्याच मनाला विचारायचे. मात्र, पटेल यांनी अगदी शहराच्या आसपास नदी, नाले, ओढे, गटारी या सर्वांना अगदी निर्मळ रुप दिले. येथील नाल्यांमधील मैला वारंवार काढून शहरात साचणार्‍या पाण्याचा अशुद्ध श्वास मोकळा केला. प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, जागरुकता फलक, भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा योग्य बंदोबस्त अशी महत्वाची कामे तडीस नेली. त्याच कष्टाचे हे फळ म्हणावे लागेल.                       खरंतर आपण अनेक विकासांच्या गप्पा ऐकल्या आहेत. मात्र, त्या फक्त कागदावर असल्याचे देखील समोर आले आहे. मात्र, पटेल यांनी स्थानिक राजकारण, विरोध आणि जनतेच्या अस्मितीचे प्रश्न यात नेहमी योग्य अंतर ठेवले. त्यामुळे अकोले शहराचे नाव पुन्हा संसदेच्या इतिहासात रेखाटले गेले आहे. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात हा मुद्दा तुम्हाला पटेल की, हे सर्व टिमवर्क आहे. येथील काही समाजभिमूख नगरसेवक, हाताला हात लावून काम करणारे प्रामाणिक कर्मचारी आणि समाजसेवक यांच्या सहकार्यातून या पुरस्काराची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. मात्र, हा सामाजिक, आर्थिक व राजकीय साचा उभा करणे वाटते तितके सोपे नाही तेच काम सचिनकुमार पटेल यांनी केले आहे म्हणून त्यांना सॅल्युट केला पाहिजे.

आता यात देशातील आणि वेगवेगळ्या राज्यातील अनेक नगरपंचायती यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी व अकोले यांचाच जिल्ह्यात क्रमांक आला आहे. तर राज्यात 12 नगरपंचायतींचा सामावेश आहे. त्यात शिर्डी दोन तर अकोले 10 नंबरवर आहे. या पुरस्काराचे वितरण थेट दिल्ली येथे होणार होते. मात्र, कोविडमुळे त्यास ऑनलाईन रूप देण्यात आले आहे. तसे पुरस्काराचे पत्र मुख्याधिकारी पटेल यांना गुरूवार दि. 13 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले आहे.  या पुरस्कारासाठी पटेल यांना गुरूवार दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्याच्या एनआयसी स्टुडिओत उपस्थित रहायचे आहे. बाकी त्यांच्यासोबत अन्य कोणाला परवानगी नाही. तर पुढील सर्व नियोजन केंद्रशासनाने केले आहे असे त्या पत्रात नमुद केले आहे.              
अकोले तालुक्यातील कारखाना रोड परीसरातील शिवसेना नेते शिवाजीराव शेटे यांचे वडील स्व. विठ्ठल सखाराम शेटे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 1 मुलगी, तीन सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे.  त्यांच्या अंत्यविधीसमयी राजकीय सामाजिक, शैक्षणिक'  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

खरंतर शासन आणि जनता यांच्यात दुवा साधण्याचे काम म्हणजे प्रशासन असते आणि तेथे कसा अधिकारी असावा याचे उत्तम उदा. म्हणजे तुम्हा देखील हे कर्तुत्व पटेल. मात्र, एक खंत अशी की, अकोले म्हणजे दुर्गम भाग. येथे कोणी बदलून येण्यासाठी तयार नसतो. आलाच कोणी तर त्यास पनिशमेंट म्हणून इकडे फेकले जाते. असा नगर जिल्ह्याचा पायंडा आहे. मात्र, इतक्या विपक्ष परिस्थितीत आणि येथील राजकीय मानसिकतेत खचून जाण्यापेक्षा खडकावर देखील बीज पेरुन त्यातून मोत्यासारखे पीक घेण्याची जिद्द असणारे अधिकारी असतील तर देशात काय जगाच्या नकाशात आणि देशाच्या इतिहासात अकोल्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल असे काम करणारे अधिकारी हवेत. त्या दिशेने एक दिपस्तभ म्हणून पटेल साहेबांनी पाऊल टाकले आहे. आता पुढचे मुख्याधिकारी काय दिवे लागवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर येणार्‍या काळात अकोले तालुक्यात अशाच अधिकार्‍यांनी स्वत:हून मागणी करुन तालुक्याच्या हितासाठी आणले पाहिजे अशा प्रतिक्रीया पटेल यांच्याबाबत उमटू लागली आहे. 

 महत्वाचे.! जर तुम्हाला हा सोहळा पहायचा असेल तर खाली दिल्या लिंकवर पाहू शकता. खालील वेबसाईट तुमच्या कम्पुटरवर टाका व पहा. http://webcast.gov.in/mohua

- सागर शिंदे

--------------------------------------
 80 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)