अकोल्यात डॉक्टरांसह 22 जणांना कोरोनाची बाधा, तर संगमनेरात कोरोनाचा आकडा घटला.! फक्त 15 रुग्णांची भर.!
संगमनेर तालुक्यात कोरोनाची संख्या आता घटताना दिसून आली आहे. कारण, रोज 30 ते 40 वर जाणारी संख्या आज 15 वर आली आहे. तर काल देखील 24 होती. त्यामुळे, येथे जितके रुग्ण मिळून आले होते. ती चांगली गोष्ट होती. कारण ते डिटेक्ट होऊन त्यांच्यावर उपचार झाला व त्यांच्यापासून बाधा होणे टळले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनाने आपले बिर्हाड येथून आवरते घेतले आहे की काय असे वाटू लागले आहे. तर अकोल्यात मात्र, आता रुग्णसंख्या वाढती दिसून येत आहे. कालपर्यंत थोडी असलेली संख्या आज पुन्हा 22 पर्यंत जाऊन पोहचली आहे. तर येथे कोविड योद्ध डॉक्टर साहेबांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी एका बाधित रुग्णाची तपासणी केली होती. त्यानंतर आपले निर्मळ कर्तव्य बजावत असताना त्यांना देखील या आजाराला सामोरे जावे लागले आहे. तर काल-परवा अकोले तालुक्यात जो कमानवेस परिसरात एका व्यक्ती मयत झाला. त्यांची कोरोनाने मयत झालेली नाही. मात्र, काही उपद्रवी लोक उगच तशा प्रकारच्या अफवा पसरवत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
संगमनेर तालुक्यात साळीवाडा येथे 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, कचेरी जवळ 52 वर्षीय पुरूष तर गणेशनगर येथे 47 वर्षीय पुरूष बाधीत झाला आहे. रंगारगल्लीत पुन्हा नव्याने 57 वर्षीय पुरूष, गुलमोहर कॉलनीत 42 वर्षीय महिला बाधीत झाली आहे. तर अखलापुर येथे 32 वर्षीय 32 वर्षीय तरुण, म्हसवडीत 60 वर्षीय पुरूष, घारगाव येथे 42 वर्षीय पुरूष, माळवाडी येथे 2 वर्षाचा बालक तर 34 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे 45 वर्षीय महिला, सुकेवाडी येथे 16 वर्षीय युवती, ढोलेवाडीत 45 वर्षीय पुरूष तर मालदाडरोड येथे 44 वर्षीय पुरूष अशा 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
अकोले तालुक्यातील कारखाना रोड परीसरातील शिवसेना नेते शिवाजीराव शेटे यांचे वडील स्व. विठ्ठल सखाराम शेटे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 1 मुलगी, तीन सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसमयी राजकीय सामाजिक, शैक्षणिक' क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तर अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय महीला, 42 वर्षीय महीला, 72 वर्षीय महीला, 21 वर्षीय महीला, 35 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 15 वर्षीय तरुण तर 04 महिन्याच्या चिमुरड्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर अकोले शहरात दुदैवाने 48 वर्षीय एका डॉक्टर कोविड योेद्ध्यास कोरोनाची बाधा झाली आहे. तर हिवरगाव आंबरे येथील 57 48 वर्षीय पुरुष व ऐरंगपुर येथील 40 वर्षीय महीला, मेहंदुरी येथे 68 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 45 वर्षीय महीला, कोतुळ येथे 30 वर्षीय महीला, कळस येथे 37 वर्षीय महीला, मनोहरपुर येथे 60 वर्षीय महीला, 12 वर्षीय तरुण, तर पिंपळगाव खांड येथे 35 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महीला अश्या 10 व्यक्तीचे अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत. तसेच खाजगी प्रयोगशाळेत घोडसरवाडी येथील 71 वर्षीय पुरुष पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आज दिवसभरात तालुक्यात आज 22 व्यक्ती कोरोना पॅाझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात एकुण 323 संख्या झाली आहे. त्यापैकी 218 व्यक्ती कोरोनामुक्त झाले.96 व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर 8 व्यक्ती मयत झालेल्या आहे.