अकोल्यात पुन्हा 18 तर संगमनेरात कोरोना कहर सुरुच तर 38 रुग्ण ठणठणीत.!


सार्वभौम (संगमनेर/अकोले) :- 

                                 अकोले तालुक्यात आज पुन्हा 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता अकोले तालुक्यातील दर्‍या खोर्‍यात आणि वाडी वस्तीवर कोरोना जाऊन पोहचला आहे. कारण, समशेरपूर येथील घोडसरवाडी येथे चार रुग्ण मिळून आले आहेत. तर बहुतांशी गावे आता बाधित झाले आहेत. तर आजकाल नव्याने गावे बाधित होताना दिसत आहे. तर संगमनेर तालुक्यात जवळजवळ 60 पेक्षा जास्त गावे बर्‍यापैकी बाधित झाले आहेत. तर शहरात आजही भयानक परिस्थिती दिसून यात आहे. आजकाल कोरोनाचे रुग्ण दिवसेंदीवस वाढत आहे मात्र, ती संख्या कमी होताना दिसत नाही. आज देखील संगमनेरात 29 रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील बाधितांचा आकडा कायम टिकून असल्याचे दिसते आहे. 

             आज अकोले तालुक्यातील कोतुळ येथे 61 वर्षीय महीला, 85 वर्षीय महीला, 33 वर्षीय महीला, 25 वर्षीय महीला, 13 वर्षीय बालिका, 08 वर्षीय बालिका, 15 वर्षीय तरुण, 03 वर्षीय बालक, हिवरगाव आंबरे येथील 60 वर्षीय महीला, 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथील 21 वर्षीय तरुण, कुंभेफळ येथे 50 वर्षीय महीला, समशेरपुर येथील 34 वर्षीय पुरुष, कळस येथील 29 वर्षीय तरुणी समशेरपुर येथे 61 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय महीला मनोहरपुर येथील 60 वर्षीय पुरूष अशा 18 जणांचे अहवाल आज पॅाझिटीव्ह आले आहेत. तर आजवर बाधितांची संख्या 299 पर्यंत जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 198 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून 94 व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर आठ व्यक्ती मयत झालेल्या आहे.

                         
आज जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज 576 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता 10 हजार 081 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  76.24 टक्के इतकी झाली आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 354 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता  2984  इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 111, अँटीजेन चाचणीत 142 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 101 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 85,  पाथर्डी 03,  नगर ग्रा. 10, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 03, पारनेर 04 आणि कोपरगाव 05 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत आज 142 जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर 24, राहाता 03, पाथर्डी 07, श्रीरामपुर 10, श्रीगोंदा 15, पारनेर 21, अकोले 15, राहुरी 02, शेवगाव 09,  कोपरगाव 16, जामखेड 16 आणि कर्जत 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 101 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 60 संगमनेर 05, राहाता 05, नगर ग्रामीण 16, श्रीरामपुर 01, नेवासा 02, श्रीगोंदा 01, पारनेर 01, अकोले 04, राहुरी 03, जामखेड 01 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. 
                        दरम्यान, आज एकूण 576 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 253 संगमनेर 38, राहाता 27, पाथर्डी 48,, नगर ग्रा. 34, श्रीरामपूर 06,  कॅन्टोन्मेंट 27, नेवासा 22, श्रीगोंदा 21, पारनेर 27, अकोले 05, राहुरी 11, शेवगाव 11, कोपरगाव 05, जामखेड 12, कर्जत 26 आणि मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या 10 हजार 081 तर उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या 2 हजार 984 तर मृत्यू झालेल्यांची संख्या 158 वर गेले आहे. तसेच आजवर एकूण रूग्ण संख्या 13 हजार 223 इतकी झाली आहे.