संगमनेर शहरात पुन्हा तीन रुग्ण तर निमगाव जाळीत पुन्हा कोरोनाची प्रादुर्भाव!


सार्वभौम (संगमनेर) : 
                     संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागात पंजाबी कॉलनी येथे काल दोन रुग्ण सापडले होते. त्यानंतर आज पुन्हा ऑरेंज कार्नर आणि गणेश नगर वा परिसरात कोरोनाचे चार रुग्ण मिळून आले आहेत. तर निमगाव जाळी येथे देखील एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज श्रमीकनगर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा चार रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाने 169 चा आकडा गाठविला आहे.
                               
संगमनेरात गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव कोरोनाने ठेवला नाही, पुर्वी ठराविक ठिकाणे कोरोना बाधित होती. आता मात्र, झोपडपट्टी ते श्रीमंतींच्या कॉलनीत त्याने प्रवेश केला आहे. आज ऑरेंज कार्नर येथे 59 वर्षीय पुरूषाला व  73 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर गणेश नगर येथे 65 वर्षींय पुरुष कोरोना बाधित असून निमगाव जाळी येथे पुन्हा कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला असून तेथे 28 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या 169 वर गेली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
         आज बुधवार दि. 8 जुलै रोजी दुपारी श्रमीकनगर येथे चार दिवसांपुर्वी एक कोरोना बाधित रुग्ण मिळून आला होता. आज सकाळी तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. हा व्यक्ती 65 वर्षाचा असून तो संगमनेरमधील 13 वा बळी ठरला आहे. विशेष म्हणजे संपुर्ण जिल्ह्यात कोरोनाचे मयत रुग्ण 19 असून त्यापैकी 13 रुग्ण एकट्या संगमनेरचे आहे.
    खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २ हजार २०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २ हजार ८०० रुपये द्यावे लागणार आहेत.  राज्य शासनाने हा दर निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळांनी कोरोना चाचण्यांसाठी या दरानेच आकारणी करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी आकारणी केली जाऊ नये, सर्वसामान्य रुग्णांचे हित जपले जावे, यादृष्टीकोनातून हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने  नुकतीच यासंदर्भात चार सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांनी या दरनिश्चितीनुसार दर आकारावेत, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.