संगमनेरात पुन्हे 11 रुग्ण आज एक मयत 15 रुग्ण हिवरगाव पठार, पेमगीरी, पिंपळगाव कोंझीरे, गुंजाळवाडी कोरोनाचा प्रवेश
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात हिवरगाव पठार 1, पेमगीरी 1, पिंपळगाव कोंझीरे 3, खांडगाव 2, ढोलेवाडी 1, गुंजाळवाडी 2 तर रेहमतनगर 1 असे पुन्हा 11 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा आकडा आता 180 वर गेला असून मयत संख्या 13 आहे. आजकाल संगमनेरात कोरोनाचा आलेख हा प्रचंड प्रमाणात वाढता दिसून येत आहे. तर नागरिक स्वत: काळजी घेताना दिसत नाही. असे लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे संगमनेरला जी शासनाने मोकळीक दिली आहे. त्यावर आता मात्र काहीतरी निर्बंध घालण्याची गरज भासू लागली आहे.
तर याच बरोबरोबर अकोले तालुक्यात विरगाव येते 1, ब्राम्हणवाडा येथे 1 तर काळेवाडी येथे एक अशा तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या अहवालामुळे अकोल्याची डोकेदुखी वाढली असून दोन गावे नव्याने बाधित घाले आहेत. तर जे धुमाळवाडी आणि पिंपळगाव निपाणी येथील रिपोर्ट पाठविले होते. त्यापैकी सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ही तालुक्यासाठी महत्वाची बाब आहे.तर या व्यतीरिक्त संगमनेर तालुक्याचा विचार केला तर, संगमनेर शहरात 70 कोरोना बाधित असून त्यातील 65 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 2, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 39, पिंपारणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 1, सय्यदबाबा चौक 1, कसारा दुमाला 1, नाईकवाडपुरा 1, हिवरगाव पठार 1, पेमगीरी 1, पिंपळगाव कोंझीरे 3, खांडगाव 2, ढोलेवाडी 1, गुंजाळवाडी 2 तर रेहमतनगर 1 असा एकूण 180 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. आजवर तालुक्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या संगमनेर शहरात 8 जणांनी या महामारीसमोर हतबल होऊन अखेरचा श्वास घेतला आहे. तर धांदरफळ 1, निमोण 2, डिग्रस 1, पळसखेडे 1 असा 13 जणांना कोरोनाची बाधा होऊन ते मयत झाले आहेत.
दरम्यान नागरिकांनी घाबरुन न जाता जेथे जाल तेथे स्वत:ची काळजी घ्या. समोरच्याला बाधा असेल नसेल मात्र आपण आपले सेफ्टी बाळगा, मास्क वापरा, गर्दी करु नका, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, लहान मुले व वृद्ध व्यक्ती यांची विशेेषत: काळजी घ्या. कारण, तुम्हीच तुमच्या जीवणाचे शिल्पकार आहात.!