संगमनेरचे टेम्पोभर कुत्रे अकोल्यात सोडले, कळस, कुंभेफळ, सुगाव व रेड्याचे लोक आक्रमक! कुरणच्या व्यक्तीवर गुन्हा!


सार्वभौम (अकोले) : 
                    संगमनेर शहरातील मोकाट कुत्रे अकोले तालुक्यातील कळस, कुंभेफळ, सुगाव व रेडे परिसरात सोडल्यामुळे नागरिक संतप्त झाल्याचे पहायला मिळाले आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवार दि. 6 जुलै रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर नागरिकांनी वाहन ताब्यात घेतले तेव्हा त्यात फक्त 10 ते 12 कुत्रे शिल्लक राहिले होते. तर यात 60 ते 70 कुत्रे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर नागरिकांनी हे वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याचा अग्रह धरला केला. त्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात आली आहे.
                     याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर नगरपालिका हाद्दीतून एक कंत्राटदाराने 60 ते 70 कुत्रे पकडून एका टेम्पोत कोंबले होते. त्यांची विल्हेवाट कोठे लावायची? तर जे कोपर्‍यात पडले एकले त्याचे नाव अकोले, त्यामुळे कोणी काही करा आम्ही सहन करतो. त्यामुळे संगमनेरचे हे कुत्रे थेट अकोल्यातील सोडण्याचे आदेश कंत्राटदाराने वाहन चालकाला दिले. त्यानंतर या महाशयांनी जे गाडी काढली ते थेट कळसमधून कुंभेफळ मार्गे टाकली. त्यावेळी तेथे काही कुत्रे त्याने सोडले. पुढे कुंभेफळमध्ये काही संगमनेरचा वानवळा सोडला, पुढे हे कुत्रे पेरत-पेरत त्याने सुगाव ते रेड्यामध्ये 10-12 कुत्रे सोडल्यानंतर टेम्पोत फक्त 10 कुत्रे राहिले होते.
             
    दरम्यान हा प्रकार काही जागरुक नागरिकांना समजला असता त्यांनी या गाडीचा पाटलाग केला. रेडे परिसरात असताना या टेम्पोला नागरिकांनी अडविले असता वाहन चालकाला हे कुत्रे कोठून आणले, कोठे चालविले, कोणी पकडले, अशासाठी चालविले अशी विचारणा केली असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मग नागरिकांनी त्यास चांगलाच पब्लिकी प्रसाद दिला. त्यानंतर तो पोपटासारखा बोलला. हे कुत्रे संगमनेर नगरपालिका हाद्दीतून उचलले आहे. ते ठेकेदाराच्या सांगण्यानुसार कोंभाळणे घाटात सोडण्यासाठी चालविले होते. मात्र, इतक्या लांब जाण्याऐवजी ते रस्त्यानेच सोडून पुन्हा माघारी जाण्याचे प्लॉन होता असे सांगण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी 407  टेम्पो क्र एम एच 14 ए. झेड 787 हा ताब्यात घेऊन गाडीचा चालक ए. शेख (वय 45 रा. कुरण, ता. संगमनेर) यास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस ठाणे आऊट ऑफ कव्हरेज..!
आमदार साहेब! या अकोल्याचे पालकत्व तुमच्या हातात आहे. त्यामुळे, येथे जर एखाद्यावर अन्याय झाला तर तो पहिला फोन पोलीस ठाण्यात केला जातो. मात्र, येथील पोलिसांचा आणि कर्मचार्‍यांचा फोन रात्री बंद तर लागतोच, तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हरकत नाही. मात्र, तेथील पोलीस ठाण्याचा फोन रात्री नेहमी बंद लागतो. त्याचे कारण, देव जाणे! पण, अकोल्यासारख्या दुर्गभ भागात पोलिसांना रात्री अपरात्री जायला कंटाळा येईल पंरंतु एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे तेथे हजार रुपयांचा मोबाईल का होईना कोणत्यातरी निधितून उपलब्ध करून द्यावा ही विनंती.
                    याचा कारण म्हणजे, जेव्हा रात्री रोडे ते कुंभेफळ परिसरात कुत्र्यांची गाडी पकडली तेव्हा जवळजवळ सात ते आठ जणांना फोन लावला तरी तो लागला नाही. पोलीस ठाण्याचा तर नाहीच नाही. त्यानंतर राजूर पोलीस ठाण्यात लावून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केले. त्यांनी तत्काळ फोन घेतला. तर तेथील ठाणे अंमलदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी 15 ते 20 मिनिट प्रयत्न करुन देखील हात टेकले पण संपर्क झाला नाही. त्यामुळे, पोलीस ठाणे आणि पत्रकार जर हतबल होत असतील तर सामान्य मानसाचे काय? त्यामुळे, ही टिका नाही तर आपण याबाबत गांभिर्याने विचार करुन एका तुर्तास मोबाईलची सुविधा करून तो नंबर नागरिकांसाठी खुला कसा करता येईल हे प्रकर्षाने जाणवले आहे. ते रात्री तीने ते चार पत्रकारांनी अनुभविले असून त्याची कोणीतरी तरी दखल घेऊन ही सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.