आजपासून 14 दिवस आखं कुरण केंटेनमेंट! सीमारेषा बंद.! घरघर तेथे डॉक्टर!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहराच्या लगत असणारे कुरण गाव आता आज दि. 6 जुलै पासून तर रविवार दि. 19 जुलैपर्यंत कंटेनमेंट करण्यात आले आहे. त्यामुळे, येथे 14 दिवस प्रशासन सर्व सुविधा पुरविणार असून स्थानिक ग्रामस्थांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि घरातील लहान व वृद्ध मुलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आजपासून कुरमध्ये 4 ते 5 हजार लोक होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. आता यात कोणी आपेक्ष घेत प्रशासनाच्या अधिकार्यांना धक्काबुक्की, मारहाण आणि शिवीगाळ, दमदाटी केली नाही म्हणजे बरं! पण, अनेकांना खात्री आहे की कुरण आज कोरोनाने संवेदनशिल झाले असले तरी तेथील ग्रामस्थ देखील तिचकेच संवेदनशिल आहेत यात तिळमात्र शंका नाही.
गेल्या दोन महिन्यापुर्वी म्हणजे मंगळवार दि. 5 मे 2020 रोजीच्या दरम्यान कुरण येथे एकही रुग्ण मिळून आला नव्हता. तेव्हाच पुढील संकटाचे भाकीत वर्तवून प्रशासनाने तेथे कंटेनमेंट झोन घोषित केला होता. त्यावेळी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते. प्रकरण पार न्यायालयाच्या उंबर्यावर जाऊन उभे राहिले होते. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तेव्हा हे गाव कंटेनमेंट केले नसते तर आज तेथे जी परिस्थिती उद्भवली आहे ती तेव्हाच निर्माण झाली असती, कदाचित यापेक्षा भयानक असती. त्यामुळे, प्रशासनाचे खरोखर आभार मानले पाहिजे.खरंतर कुरण हे संगमनेरातील असे एकमेव गाव आहे. तेथे बाहेरून येणार्यांना फारसे सहकार्य केल्याचे दिसत नाही. तेथून व्यापार, व्यवसाय आणि पाहुण्यांची आवक जावक नियमित सुरू होती. मात्र त्याच्या नोंदी करणे व त्यासाठी प्रशासनाला सहकार्य झाले नाही. उलट त्यांना धमक्या देणे, मारहाण करणे, क्वारंटाईन न होणे अशा अनेक घटना आपल्याला ऐकाला मिळाला. इतकेच काय! येथून दोन चार गुन्हे दाखल झाले. त्यामुळे कोणते प्रशासन येथे जिकरीने काम करेल. तरी देखील तलाठी, ग्रामसेवक यांनी तेथे आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे तब्बल दोन महिने कुरणमधील कोरोना चव्हाट्यावर आला नाही. मात्र, प्रशासनाने थोड जरी दुर्लक्ष केले तर काय होते. आता हे नव्याने सांगायला नको.! त्यामुळे येणार्या 14 दिवस तरी स्थानिक लोक प्रशासनाला सहकार्य करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान गुरूवार दि. 2 जुलै रोजी सायंकाळी कुरण येथे ग्रामसेवकास मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर लागेच शनिवार दि. 4 जुलै रोजी कुरणमध्ये सात कोरोना बाधित रुग्ण मिळून आले, तर या धक्क्यातून लोक सावरतात कोठे नाहीतर रविवार दि. 5 जुलै रोजी एकाच वेळी तब्बल 22 कोरोना बाधित रूग्ण तेथे मिळून आले. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत कुरण गाव कंटेनमेंट केले आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गाव बंद करण्यात आले आहे. येथे एक पथक तयार करण्यात आले असून त्यात एकनाथ चौधरी, डॉ. सतिष चांदोरकर, बी. के. जाधव, गंगाधर राऊत, सुषमा दरंदले हे कोविड योद्धे तेथे कार्यतत्पर असणार आहेत.
आता संगमनेर शहरात 68 कोरोना बाधित असून त्यातील 63 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 3, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 38, पिंपारणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 1, संगमनेर खुर्द 1, कसारा दुमाला 1 असे एकूण 150 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत.