कोरोनाने संगमनेरचे वाजविले बारा! 150 बाधित आज 12 वा मयत!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात राहणार्या 70 वर्षीय वृद्धाचा आज पाहटे मृत्यु झाल्याचा अहवाल नाशिक प्रशासनाने संगमनेर प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता संगमनेरात कोरोनाने बाधित होऊन मयत झालेल्यांची संख्या 12 वर गेली आहे. गेल्या चार महिन्यापासून संगमनेर तालुक्यात कोरोनाने हाहाकार घातला असून त्यावर कसे काम करावे कसे नियोजन करावे याबाबत प्रशासन पुर्णत: हतबल झाले असून एकच दिवशी 23 रुग्ण तालुक्यात मिळून येऊ लागल्याने कोरोनापुढे शासन आणि प्रशासनाने हात टेकले आहेत.
जर कोरोना सुरू झाला आहे तेव्हा पासून संगमनेर शहरात 7 जणांनी या महामारीसमोर हतबल होऊन अखेरचा श्वास घेतला आहे. तर धांदरफळ 1, निमोण 2, डिग्रस 1, पळसखेडे 1 असा 12 जणांना कोरोनाची बाधा होऊन ते मयत झाले आहेत. या व्यतीरिक्त 150 जणांना आजवर कोरोनाची लागण झाली असून 100 जण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या 39 जणांवर संगमनेर व नगर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे ही अकडेवरी पाहता संगमनेर तालुका कोरोनाच्या विळख्यात अडकला असून येथे वेगळी यंत्रणा उभी करण्यासाठी काहीतरी अमलबजावणी करणे अपेक्षित आहे. हा रटाळ कारभार असाच सुरू राहिला तर संगमनेर पुणे, मुंबई सारखे हाताबाहेेेर जाऊ शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे मालेगाव येथे विशेष अधिकारी म्हणून सुनिल कडासणे यांची नियुक्ती केली होती. तशी नियुक्ती एखाद्या विशेष व्यक्तीची करणे गरजेचे भासू लागले आहे.
दरम्यान नागरिकांनी घाबरुन न जाता जेथे जाल तेथे स्वत:ची काळजी घ्या. समोरच्याला बाधा असेल नसेल मात्र आपण आपले सेफ्टी बाळगा, मास्क वापरा, गर्दी करु नका, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, लहान मुले व वृद्ध व्यक्ती यांची विशेेषत: काळजी घ्या. कारण, तुम्हीच तुमच्या जीवणाचे शिल्पकार आहात.!