संगमनेरच्या संस्कार व संस्कृतीचा कणा म्हणजे मालपाणी

संजय मालपाणीजी, तुम्हास उदंड आयुष्य लाभो.!

- सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :-
                     भारत देशाला एक संस्कृती आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे. त्यात महाराष्ट्राला संतांची तसेच योद्ध्यांची भूमी असे म्हटले आहे. त्याच संतांनी जगाला एक संदेश दिला आहे. तो म्हणजे, एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ! होय, हे शब्द कानी पडले की आता पहिला शब्द आठवतो मालपाणी.! कारण, कालपर्यंत त्यांनी गीता परिवाराच्या माध्यमातून नव्या पिढीचे सुसंस्कृत नवे पर्व उभे केले. तर आज 1 कोटी 25 लाख रुपये देशाला उभे करण्यासाठी साधुसंतांच्या उक्तीला पडत्या काळात साद घातली होती. म्हणून एक सलाम त्या परिवारला ज्यांनी सुजान देश घडविण्याचा वसा हाती घेतला आणि ही मातृभूमी संकटात आली असता तिच्या पदरात भरभरुन दान टाकले. म्हणून, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले! या म्हणीला प्रत्यक्षात सादर करताना या संस्थेतील प्रत्येकाचे आभार आणि त्यांच्या उदात्त अंत:करणाला वंदन.! आज संजय मालपाणी यांच्या रुपाने देशाला लाभलेला दानशूर व्यक्ती आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्याला सलाम म्हणून मांडलेला भावनांचा सागर..!  
                      आज कोरोनाचा जन्म होऊन शंभर दिवस उलटून गेले. कोटी जनतेच्या श्वासाला गुलाम करून लाखो लोकांच्या श्वासाला पुर्णविराम दिला. तरी देखील याचा आत्मा शांत होईनासा झाला आहे. या व्हायरसचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचे बाहु असणारे केंद्र आणि राज्यशासन हे दोन हात करुन या संकटाशी रात्रंदिवस झुंज देत आहे. पण, आता ही लढाई एकट्याची नाही. तर ना मैदानात उतरुन बंड आणि दंड थोपटण्याची वेळ आहे. तर ती आहे फक्त आर्थिक व सामाजिक बळ देवून जिंकण्याची. घरात बसून देशसेवा करण्याची. मात्र, या भरवशावर देश पुन्हा उभारी घेऊ शकत नाही. याची कल्पना येताच सामाजिक बांधिलकी जपत विवेकी विचारांचे वारस आणि अखंड भारत मातेवर अविरत नि:स्वार्थी प्रेम करणारे कर्णरुपी दानशूर पुढे येऊ लागले. या मायभुमीच्या ऋणात्मक शिलालेखावर संगमनेर तालुक्यातील मालपाणी उद्योग समुहाचे देखील नाव सुुवर्णाक्षरांनी लिहीलेले असेल, यात तिळमात्र शंका नाही. कारण, देशातील जनतेला आजही दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न पडला आहे. अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण बसल्याने काही दिवसांपुर्वी पै-पैची गरज भासू लागली होती. अशात तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांची अनमोल मदत मालपाणी समुहाने केली. हे हा देश कधीच विसरू शकत नाही. कोरोनाची ईडा पिडा टळो आणि पुन्हा बळीचे राज्य येवो, यासाठी या कुटुंबाचे हे बळ फार मोठे आहे. कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी दि. 13 एप्रिल 2020 रोजी एक कोटी रुपयांचा धनादेश संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे सुपुर्द केला होता. त्याचा आठवणींना आज रोखठोक सार्वभौम विनम्र होऊन या कुटुंबासाठी उदंड आयुष्य भागत आहे.
           
   खरंतर आजवर संगमनेरला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यात मालपाणी यांच्या दानशुरतेने आणखी एक भर पडली आहे. लोक राजकारणात लाखो आणि कोटी रुपये उधळतात. मात्र, त्यांचे नाव राजकारणाच्या अपरोक्ष आहे. शुन्यटक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण हे त्यांनी भारत माता संकटात असताना सिद्ध करुन दिले आहे. संस्कृती आणि संस्कार या पलिकडे त्यांना कशात स्वारस्य नाही. म्हणून तर मालपाणी कुटुंबाबद्दल आज प्रत्येक संगमनेरकरांच्या मनात अधिकची आत्मियात वृद्धींगत होऊन सन्मानाने नांदत आहे. आज संगमनेरचा विचार करत त्यांनी राज्याचा देखील विचार केला. त्यांच्या मनाचा मोठेपणा देशाच्या आरोग्य अस्मितेपर्यंत जावून पोहचला. म्हणून तर त्यांनी पंतप्रधान निधीसाठी 50 लाख, महाराष्ट्रराज्य मुख्यमंत्री निधी 50 लाख, जनकल्याण समिती 11 लाख, संगमनेर सहाय्यता निधी 5 लाख, ग्रामीण रुग्णालय सुरक्षा साधने 5 लाख, लायन्स क्लब संगमनेर सफायर भोजन सेवा 2 लाख,  ग्रामीण रुग्णालय संगमनेर 1 लाख, निर्जंतुकीकरण फवारणी 1 लाख अशी एकूण 1 कोटी 25 लाख रुपयांचे अमुल्य योगदान देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले होते. खर्‍या अर्थाने ही रक्कम दानपेटी जमा नाही तर इतिहास जमा झाली आहे.
                       आजही देश फार मोठ्या संकटात आहे. त्याला अशाच दानशूर लेकरांची गरज तेव्हा होती आणि आजही आहे. तसेच देशातील जनतेला देखील आधाराची गरज आहे. कारण, 1957 साली देश उभा करण्यासाठी व देशातील जनतेला आधार देण्यासाठी साहिर लुधियानवी यांनी एक गित लिहीले होते. साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. खरोखर मालपाणी यांनी हा खूप मोठा बोजा आपल्या खांद्यावर घेऊन मायभुमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐरव्ही लोक किती खर्च करतात, लग्न, कार्य, सन, उत्सव आणि राजकारण यात मोठेपणा मिरविताना अक्षरश: पैशांचा पाऊस पडतो. काही लोकांची दिवसाची कमाई ऐकल्यानंतर डोळे गरगरू लागतात. मात्र, कोणाला देवाच्या पदरात दोन रुपयांचे दान टाकण्याची मानसिकता होत नाही. असे असतांना मालपाणी उद्योग समुहाने हे सिद्ध करुन दिले की, आपण आणि आपली मानसिकता व संस्कृती काय आहे. जेव्हा ही रक्कम त्यांनी दिली तेव्हा तिचा अवडंबर न करता, त्यांनी खरोखर कर्मात देव शोधला होता. त्यांनी फक्त व्यावसायिक दृष्टीकोनातून आर्थिक भरभराटी न पाहता वेळप्रसंगी देश आणि समाज पहिला! मग आम्ही, हाच संदेश जगाला दिला होता.
                            होय.! हे थोडेसे कडवे वाटेल पण वास्तव आहे. की, संगमनेरमध्ये हॉस्पिटलांचे जाळे पाहिले तर अगदी सतराशेे साठ डॉक्टर मिळून येतील. त्यांचे कारणामे, लुटमार आणि मालमत्ता यावर सध्या न बोललेलेच बरे. त्याबद्दल कोणाचेच दुमत देखील नाही. परंतु दुर्दैव याचे वाटते की, आज ज्यांनी क्लिनिकच्या नावाखाली हॉस्पिटल उभी करुन कोट्यावधी रुपयांच्या बिल्डिंगा उभ्या केल्या. त्यातलेच काही डॉक्टर आजही रुग्णाला तपासायला तयार नाहीत. वकीलासारख्या कायदेतज्ञाला हाकलवून देतात, नगरसेवकांच्या दोन जिवाच्या पत्नीस बाहेर काढतात. तर सामान्य मानसांची काय बिशाद! हे डॉक्टर आज रुग्णाला हात लावायला देखील तयार नाहीत. पुर्वी हेच पेशन्ट आले की, रक्त-लघवीसह शंभर तपासण्या करून सलाईन लावण्यासाठी यांच्याकडे बेड देखील शिल्लक राहत नसे. आत्ता आठ महिन्यापुर्वी डेंग्युच्या काळत याच महाशयांनी कोणाला बेडच्या खाली तर कोणाला खुर्चीवर सलाईन लावून जनतेला लुट-लुट लुटले. पण आज कोरोनात साधं कोणी दारात उभं करायला तयार नाहीत! वा रे नैतिकता आणि देशाभिमान. म्हणून तर आज एकवेळी मंदीराला नव्हे, पण मालपाणी रुग्णालयाला हात जोडून दंडवत घालावासा वाटतो. येथे 24 सात अवघ्या 10 रुपयात रुग्ण तपासणी सेवा केली जाते. चार ऑपरेशन थिएटर असलेल्या या रुग्णालयात अत्यल्प दरात सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. आजपर्यंत दोन लाखाहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आज देशाचा आणि लोकशाहीच्या मतदार राजाचा पडता काळ आहे. त्यांनी प्रत्येक स्वार्थी मानसांना डोक्यात ठेवले पाहिजे. ज्यांनी पडत्या काळात अगदी दिपस्तंभाची भूमिका घेतली. पाय रोवून तुमच्यासाठी कोरोनाशी झुंजले. त्यांच्यापाठी अगदी श्वास सुरू आहे. तोपर्यंत उभे राहिले पाहिजे आणि ज्यांनी सेवा कमी परंतु लुट जास्त केली, प्रचांड स्वार्थ पाहिला, एक रूग्ण म्हणून, ग्राहक म्हणून, माणूस म्हणून अवहेलना केली त्यांना त्यांच्या वागणुकीची जाणीव करुन दिली पाहिजे. हेच सध्या फार आत्मियतेने वाटते. खरंतर मालपाणी कुटुंबाचे औदार्य पाहिले की मन भरुन येते. छाती अभिमानाने रुंदावते. कारण, कोणताही स्वार्थ नाही. कोठे राजकारण नाही, कोणाचा फोर्स नाही. तरी देखील हे किती मोठे योगदान म्हणायचे. नि:शब्द होत त्यांच्या देशसेवेला आणि जनसेवेला रोखठोक सार्वभौमचा मानाचा मुजरा!
                     खरंतर मालपाणी उद्योग समुहाने विविध सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून संगमनेर मधील शैक्षणिक क्षेत्रात शारदा विद्यालय ते संगमनेर कॉलेज व ध्रुवची स्थापना केली. त्यामुळे नकळत तालुक्याच्या स्वाभिमानासह त्यांच्या रुपाने महाराष्ट्राचाही अभिमान वाढला आहे. कारण, त्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी क्रीडा, साहित्यिक, व्यवसायिक, राष्ट्रसेवा अशा विविध क्षेत्रात उतुंग कामगिरी करून महाविद्यालयाचा दर्जा उंचवला आहे. खरंतर विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो त्यास जसा आकार देऊ तसा तो घडत असतो. हाच हेतू बाळगून शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालय नावारुपास आणले. 
                     संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशी एमआयडीसी नाही. त्यामुळे कुशल-अकुशल कामगारांना येथे वाव नसताना आपल्या मालपाणी उद्योगामार्फत तालुक्यातील बेरोजगारांना उदरनिर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करून दिला. व तालुक्यातील तरुणांना नवउद्योजक घडवण्यासाठी नेहमी तरुणाशी संवाद साधला. त्यासाठी प्रख्यात उद्योजकांची व्यख्यानमाला आयोजित करून प्रोत्साहित करतात.तसेच पर्यावरणातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मालपाणी उद्योगसमूहामार्फत वनसंवर्धन व स्वच्छता अभियाना सारख्या मोहीम नेहमी राबवल्या जातात. त्यातच हरित संगमनेरच्या स्वप्नपूर्तीसाठी दरवर्षी लाखो रोपे मोफत देऊन त्याचे संवर्धनही केले जाते. सर्वसामान्य कुटुंबाची परिस्थिती पाहता विवाहासाठी होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी अक्षय तृतीयास सर्वधर्मीय शाही विवाह सोहळा केवळ एक रुपयात आयोजित करून सर्वखर्च मालपाणी उद्योगा मार्फत केला जातो. हा सोहळा संगमनेरवासीयांसाठी एक वैभव ठरला आहे. दुर्बल घटकांना मालपाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. असे एक ना अनेक कार्य संगमनेरांसाठी ते नेहमी करत असतात. त्यांचे हे पालकत्व आणि उत्तरदायित्व देशातील जनता कधीच विसरू शकत नाही.
- सुशांत पावसे
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 74 लाख वाचक)