अकोले पाच व संगमनेर सहा 11 रुग्ण पॉझिटीव्ह.! थॅक्स गॉड.! त्या शहराध्यक्षाचे कुटुंब निगेटीव्ह.!


सार्वभौम (अकोले) :-
         अकले शहरातील परखतपूर रोडवरील कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कारखाना रोड व शहराची डोकेदुखी आणखी वाढली आहे. तर बहिरवाडी येथील ३२ वर्षीय महिला, १५ वर्षीय तरुणी तर २४ वर्षीय तरुणाला देखील तेथील बाधित व्यक्तीमुळे कोरोना झाल्याचे समोर आले आहे.   तसेच कळंब येथे देखील एक व्यक्ती यापुर्वी बाधित मिळून आली होती. त्या व्यक्तींच्या संपर्काने ३४ वर्षीय महिलेचा देखील रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आज सोमवार दि. 20 जुलै रोजी पाच व्यक्ती पॅाझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संंख्या ६३ वर जाऊन पोहचली आहे.
     
तर यात महत्वाची बातमी म्हणजे कारखाना रोडवरील ज्या शिवसेना शहरप्रमुखास कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यांच्या घरातील काही रिपोर्ट तपासणीसाठी नेले होते. ते आज प्राप्त झाले असून त्यात एकाही व्यक्तीला संसर्ग नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, त्यांच्यानावे बोंबा ठोकणाऱ्यांच्या बोलत्या बंद झाल्या असून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याचे बोलले जात होते. मात्र आता त्यांच्या कुटुंबातच कोरोनाची बाधा झाली नाही तर बाहेर त्याचा प्रादुर्भाव होणे  शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
        या पलिकडे संगमनेरमध्ये काल 11 कोरोनाबधित तर दोन कोरोनाग्रस्तांची मयत होते कोठे नाहीतर आज पुन्हा पाच रुग्ण नव्याने आढळून आले आहे. यामध्ये शहरातील गोल्डन सिटी येथे 37 वर्षीय पुरुष तर शहरालगत असलेले घुलेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष व 2 वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. तसेच कसारा दुमाला येथे 77 वर्षीय वयोवृद्धाचा कोरोनाची बाधा झाली आहे. शहरालगत असलेल्या राजपूर येथे 17 वर्षीय युवतीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर खंडोबा गल्लीत एक ३६ वयाचा व्यक्ती असे ६ जण मिळून आले आहेत. तालुक्यातील एकुण कोरोना बधितांची संख्या 365 वर जाऊन पोहचली आहे.
       दरम्यान अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्ती  कोरोना बाधित असताना त्याच्या संपर्कातील त्याची बायको, मुलगी व भाचा असे ३ जण पोजीटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी सदर तपासणी अहवाल आले आहेत. सदर व्यक्ती कोरोना पोजीटिव्ह आल्या नंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना बहिरवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होम क्वारंटाईन करण्यात आले होते.त्या मुळे बहिरवाडीतील नागरिकांनी घाबरून जाण्याचे काम नाही.सदर व्यक्ती नाशिक येथून आल्याने सदर व्यक्ती पॉझिटीव्ह सापडला होता. त्या मुळे त्याच्या घरचे त्या व्यक्तीच्या संपर्कात होते.त्या मुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
- शंकर संगारे