अकोले शहरात एकामुळे सात जणांना कोरोनाची बाधा! चास येथे नवा रूग्ण! 45 अहवालांकडे लक्ष!
- महेश जेजूरकर
सार्वभौम (अकोले) :
अकोले शहराला कोरोना आता एकामागूण एक धक्के देत आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार शहरात पुन्हा तीन रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जो पहिला रुग्ण मिळून आला होता. त्यांच्या सानिध्यात असणारे तीन रूग्ण यापुर्वी मिळुन आले होते. त्यांच्या पाठोपाठ आता पुन्हा तीन रूग्ण मिळून आले आहेत. हे असे असले तरी जे नव्याने तिघे मिळून आले आहेत ते यापुर्वीत प्रशासनाने क्वारंटाईन केले आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून कोणाला बाधा होईल असे फारचे चित्र दिसून येत नाही. मात्र, काल जे तिघे कोरोना बाधित आले होते. त्यांच्या सानिध्यात असणार्यांचा शोध घेऊन किमान त्यांना होमक्वारंटाईन करणे गरजेचे आहे. आता शहरात एक मयत तर एकूण सात रूग्ण कोरोनाबाधित झाले आहे. या पलिकडे तालुक्यातील चास येथे एक कोरोना बाधित रुग्ण मिळून आला आहे. तर अद्याप 45 जणांचे स्वॅब येणे बाकी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाला वेस न ओलांडू देणार्या अकोले तालुक्याला आता खर्या अर्थाने कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात जनतेला सर्व काही पाहिजे आहे तर कोरोना देखील येथे येणार हे त्रिकालबाधी सत्य आहे. त्यामुळे, शासन सांगते आहे. तुम्हाला कोरोनासोबत जगायचे आहे. फक्त त्याच्यापासून सावधानता बाळगायची आहे. त्यामुळे, अकोल्यात कोणाला कोरोना झाला किंवा किंवा अकडेवारी वाढली यात गैर काही नाही. हे प्रत्येकाने गृहीत धरुन चालायचे आहे. फक्त स्वत:ची काळजी आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढविण्यापेक्षा या महामारीला प्रत्येकाना सामोरे जाने गरजेचे आहे. आता अकोले शहर व्यापार्यांनी सुरू केले आहे. सात दिवस देखील काही व्यापार्यांना दम निघाला नाही. त्यामुळे अकोले शहर परत बंद होईल अशी अपेक्षा कोणी करणे हे चुकीचे आहे. आता प्रत्येकाने स्व काळजीने वावरावे असाच संदेश नागरिकांनी घ्यावा. अशा प्रतिक्रिया समाजसेवकांनी दिल्या आहेत.
- आकाश देशमुख