गटारीत सापडलं राजूर, कोरोनाच्या शिरकावाने दोन दिवस गाव बंद!
सार्वभौम (अकोले) :
अकोले शहराला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता राजूर येथे देखील कोरोना बाधित महिला मिळून आली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या पलिकडे अकोले तालुक्यातून जे 23 जणांचे स्वॅब नेले होते. ते निगेटीव्ह आल्याने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या पलिकडे आणखी 85 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आज सकाळी लहीत येथील एका महिलेचा रिपोर्ट पाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तो भाग प्रशासनाने कंटेनमेंट केला आहे. तर आता राजूर शिक्षक कॉलनी हा भाग देखील कंटेनमेंट करण्यात आला आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर आता दोन दिवस राजूर बंद करण्याची विचार राजूकरांनी केला आहे. त्यामुळे ऐन गटारीच्या दिवशी गाव बंद राहणार असून या बंदमुळे खरोखर कोरोना गटारीत जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आता राजूर येथे जी महिला कोरोना बाधित मिळून आली आहे. त्यांना पुर्वीच एका आजाराने ग्रासलेले आहे. त्यामुळे या महिलेस नगर येथे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. यावेळी शुक्रवार दि.11 जुलै रोजी त्यांचे स्वॅब घेतले होतेे. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नगर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सोमवार दि.13 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेतला होते. आज सायंकाळी याबाबत जिल्हा प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाला त्याची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी तत्काळ राजुरला धाव घेऊन संबंधित विभाग कंटेनमेंट केला आहे. आता राजूरमध्ये रुग्ण सापडल्यानंतर राजूर बंद करण्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, यापुर्वी ग्रामपंचायत, आजी-माजी आमदार व प्रशासन यांच्यात शब्दयुद्ध झाल्यामुळे ग्रामपंचायत यांनी राजूर बंदला प्रतिसाद दिला नाही. मात्र, व्यापारी आणि ग्रामस्त यांच्या स्वयंप्रेरणेने राजूर रविवार दि.19 जुलै ते 21 जुलै पर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती काही शशिकांत ओहरा व संतोष चांडोले यांनी दिली.
या पलिकडे एका आनंदाची बातमी अशी की, उंचखडक बु व अकोले शहरातील काही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यात उंचखडक येथील सात रिपोर्टकडे अनेकांचे लक्ष होते. ते सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथील एक हजार लोक स्वयंप्रेरणेने होमक्वारंटाईन झाले आहेत. गावकर्यांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यामुळे प्रशासनाने गावकर्यांची आभार मानले आहे.- आकाश देशमुख