अकोले शहरात तीन तर तालुक्यात दोन रुग्ण! शहरात एकच खळबळ उडाली! संगमनेरात दहा रूग्ण
- शंकर संगारे
सार्वभौम (अकोले) :
अकोले शहरातील कारखाना रोड येथे एका व्यक्ती कोरोना बाधित रूग्ण मिळून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळेे, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर राजूर परिसरात पेंडशेत गावातील एका 33 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती गावी आला होता तर त्यानंतर तो मुंबई येथे गेला असता त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला असता त्याने तपासणी केली असता त्याला कोरोना झाल्याचे लक्षात आले आहे. तर बहिरवाडी येथे देखील एका 41 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या व्यतीरिक्त संगमनेर शहरात पाच तर तालुक्यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले आहेत.
श्रमीकनगर येथे 44 वर्षीय महिला, गणेशनगर येथे 36 वर्षीय पुरुष, रेहमतनगर येथे तीन वर्षीय चिमुरडी, मालदाडरोड येथे 40 वर्षीय पुरुष, निंबाळे येथे 38 वर्षीय तरुण, निमोण येथे 27 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथे 82 वर्षीय व्यक्ती, कोल्हेवाडी येथे 28 वर्षीय तरुण शहरातील शिवाजीनगर येथे 65 वर्षीय वृृद्ध तर शिबलापूूर येथे 27 वर्षीय तरुण असे दहा अहवाल पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने 350 कडे घोडदौड सुरू केली आहे. तर आजवर संपुर्ण तालुक्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेरात कोरोनाची साखळी फार मोठी वाढत चालली आहे.
अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीने खाजगीत तपासणी केली होती. त्यात तो अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्ती नाशिक येथे राहत होता परंतु आषाढी यात्रेसाठी तो गावाकडे (बहिरवाडी) 10 दिवस पासून राहत होता. त्याच प्रमाणे सुगाव या गावी आपल्या बहिणीकडे देखील तो काही दिवस राहत असल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा त्याला त्रास जाणवु लागळ्याने त्याने ग्रामीण रूग्णालयात येण्यापूर्वी जवळपास आठ दिवस अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे आता त्याचे संपर्कातील त्या रुग्णालयाचे डॅाक्टर, तेथील कामगार, नातेवाईक यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच काहींचे स्वॅब तपासणी साठी पाठवणार आहे. तसेच त्यांना होम कोरंटाईन केले जाणार आहे. तसेच सदर व्यक्ती काही दिवस सुगाव येथील नातेवाईकाकडेही राहिला असल्याचीही माहिती समोर येत आहे. रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने स्थानिक प्रशासनाने संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना होमक्वारंटाईन केले आहे.
दरम्यान अकोले शहरात गेल्या कित्तेक दिवस कोरोनाची ऐन्ट्री नव्हती. आता मात्र तो आलेख वाढता असल्याचे दिसते आहे. आज कारखाना रोड व परखतपूर रोड येथे तीन रुग्ण मिळून आले आहेत. विशेष म्हणजे हा एका संसर्गजन्य आजार आहे. ज्याला झालेला आहे. त्याला त्याची भनक देखील लागत नाही. त्यामुळे जर कोणाला बाधा झाली तर त्याच्यावर शिंतोडा उडविण्यापेक्षा त्याला धिर देणे महत्वाचे असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी जेव्हा कोरोना चीनमध्ये होता. तेव्हापासून काही समाजसेवक अकोल्याच्या कानाकोपर्यात स्वत:ची गाडी घेऊन जनजागृती करीत होते. हे कोणी विसरु नये. हेच समाजसेवक शहरात रात्र-रात्र काढून अकोल्याच्या सीमारेषा सुरक्षित ठेवत होते. त्यामुळे अशा कोविड योद्ध्यांना कोरोना झाला तर त्यांना नक्कीच धीर दिला पाहिजे.
यात अत्यंत महत्वाची बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची आहे. की, जे-जे व्यक्ती कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:हून क्वारंटाईन होऊन घेणे अपेक्षित आहे. जर काही होत नाही असे म्हणून जर संसर्ग वाढत राहिला तर मात्र तालुक्यात वेगळे चित्र पहावयास मिळेल. तर या दोन दिवसात जर कोणाला श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी खोकला किंवा ताप अशी लक्षणे जाणवली तर त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. अशीच प्रशासनाने विनंती केली आहे.
- आकाश देशमुख