संगमनेरात पुन्हा 24 रुग्ण !, कोण, कुठले, कसे, काहीच माहित नाही ! प्रशासनाची लपवाछपवी ! अधिकार्‍यांचे फोन मुडवर!


सार्वभौम (संगमनेर) :-
                          संगमनेर तालुक्यात कोरोनाची परिस्थितीत फार हाताबाहेर चालली आहे. त्यात जितकी परिस्थिती बिकट होत चालली आहे. तितकी माहितीची लपाछपी होताना दिसत आहे. हा प्रकार म्हणजेच मंत्री महोदयांच्या मतदारसंघावर खोटे पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रकार आहे की काय? असे अनेकांना वाटते आहे. आजकाल प्रशासकी अधिकारी फोन घ्यायला तयार नाही, माहिती द्यायला तयार नाहीत. मयत झाले यांना माहिती नाही, कोरोना बाधित झाले यांना माहित नाही, संशयित निघाले यांना माहित नाही. अन्यत्र बातम्या आल्यानंतर काही प्रशासकी अधिकार्‍यांना माहिती होते. इतकेच काय! येथे इतके डॉक्टर असून देखील त्यांना कधी फोन केला आणि त्यांनी फोन उचलला असे फार क्वचित होते. तर त्यांना माहिती विचारली असता अजून अहवाल प्राप्त नाही. म्हणजे अनेकदा फक्त क्रॉस चेक केले असता देखील हे अधिकारी माहिती देण्याच्या मनस्थितीत नसतात. अर्थात हे आपल्या सर्वांसाठी कोविड योद्धे आहेत. यात तिळमात्र शंका नाही. मात्र, यांनी राजकीय दबावापोटी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव माहिती दडवून जनतेला अंधारात ठेऊ नये. अशीच विनंती संगमनेरच्या सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
              दरम्यान आत्ताच्या हाती आलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात 24 रुग्ण मिळून आले आहेत. तर पारनेर 1, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 3 व राहूरी 1 असे जिल्ह्यात 70 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासन आणि जिल्हा रूग्णालयातून पुरेशी माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे, कालवर मयत झालेल्या व्यक्तींच्या संखेची झाकाझाक सुरू होती आता कोरोना बाधित व्यक्तींच्या अकडेवारीची झाकाझाक सुरू आहे की काय? असा प्रश्न काही समाजसेवकांनी उभा केला आहे. यात महत्वाचे म्हणजे माध्यमांकडे माहिती आल्यानंतर तो प्रसारीत होते. त्यामुळे वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत जाते तर जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहे. त्यांच्यापासून सावध राहणे किंवा संबंधित ठिकाण, घरे, तो परिसर कंटेनमेंट करण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी ही माहिती महत्वाची भूमिका पार पडतो. मात्र, आजकाल एखादा व्यक्ती कोरोनाने किंवा संशयाने मयत झाला तर त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नाही. उलट ही संबंधित व्यक्ती मयत झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी प्रशासनाला जाग येते. तोवर त्याचे कुटुंब क्वारंटाईन किंवा परिसर कंटेनमेंट राहत नाही. परिणामी हा प्रादुर्भाव वाढत जातो.
                         
  त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून माध्यमांना माहिती देताना नेहमीच संदिग्धता असल्याचे दिसून येत नाही. अर्थात हा राजकीय दबाव तर नाही ना? असा देखील काही सुज्ञ नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे जेथे सरकार प्रणित आमदार आहेत. तेथील प्रशासनावर फार मोठा दबाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे चक्क हात बांधले गेले आहेत. अशीच जोरदार चर्चा सुरू आहे. आता संगमनेरचा विचार केला तर पोलीस पहिल्यांदा वाहनावर कारवाई करीत होते. मात्र, त्यांना राजकीय दबाव आला. कोणी म्हणे येथे जातीयवाद होतोय, कोणी म्हणे शेतकरी भरडला जातो, तर कोणाच्या गाड्या पकडल्यानंतर थेट पुढार्‍यांचे फोन येतात. त्यामुळे पोलिसांनी कारवाया बंद केल्या आता रोज अगदी बोटावर मोजणार्‍या कारवाया होतात. त्या देखील आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा.
                          तर या पलिकडे कोविड संदर्भात नगरपालिका नेमके काय काम करते आणि काय खर्च करते हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. मात्र, जर काँग्रेसच्या कोणाचा वाढदिवस असेल, कोणीची निवड झाली तर येथे अगदी सुंदर बँनर लावण्याचे चोख काम नगरपालिका न चुकता करते. असे मत अनेकांनी मांडले आहे. आज शहरात 200 पेक्षा जास्त रूग्ण मिळून आले आहेत. हे कोणाचे अपयश आहे? संगमनेरात नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, भले-भले लोकप्रतिनिधी तर बड्या नेत्यांच्या उंबर्‍यावर जाऊन कोरोना पोहचला आहे. त्यामुळे येथील नागरिक किती सुरक्षित आहेत हे नव्याने सांगायला नको. उलट कोरोनाच्या काळात तरी संगमनेरात सर्वोत्तम काम होणे अपेक्षित होते. कारण, येथे कोणी विरोधक नाही, जे आहेत. त्यांच्या शब्दांच्या धरी बोथट असून प्रत्येकाचे हात साहेबांच्या उपकाराखाली चेपलेले आहेत. त्यामुळे कोणी प्रबळ विरोधक नाबही. अशा परिस्थितीत येथे काम होण्यापेक्षा रुग्ण सापडला त्याला जिल्ह्यात पोहच करा, त्याचा संपर्क शोधा आणि त्यांना होमक्वारंटाईन करा. चारदोन लाकडे उभे-आडवे मारुन त्या क्षेत्राला कंटेनमेंट झोन घोषित करा अशी कामे करून तालुक्यात सध्या तरी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केले जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
                      तर दुसरीकडे संगमनेर तालुक्यात कोरोनाची आकडेवरी माध्यमांमध्ये झळकू लागली आहे. त्यामुळे संगमनेरचे प्रशासन माध्यमांना माहिती देताना टाळाटाळ करू लागले आहे. फोन वेटींगला टाकणे, वारंवार आय विल कॉल बॅक यू, जरा वेळाने सांगतो, अजून असे काही नाही, संपुर्ण माहिती नाही, असे काही घडलेच नाही, अकडेवारी वाढली नाही अशा प्रकारे चालढकल करणारी उत्तरे दिली जातात. अर्थात हे प्रशासनाचे एक प्रकारे अपयश आहे. हे झाकण्याचे काम ते करीत आहे की, महसुलमंत्र्यांच्या तालुक्यात सर्व काही अलबेले सुरू आहे. हे दाखविण्याचे व्रत हाती घेतले आहे. हेच काळायला तयार नाही. हे असेच घडत राहिले तर संगमनेरचे आता मालेगाव नाही तर खरंच अमेरीका होईल. त्याचा तोटा एसीत बसणारे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना नव्हे तर अगदी सामान्य मतदारांना होईल. त्यामुळे, जे आहे ते प्रशासनाने जनतेसमोर मांडले पाहिजे असेच सुज्ञ नागरिकांना वाटत आहे.
तर संगमनेरात कोरोनाचा आठरावा बळी गेला आहे. काल विद्यानगर येथे सतरावा बळी गेला होता. आज त्या संखेत एकाने वाढ झाली आहे. पद्मानगर येथील एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्याचा आज मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यानगर येथे जो संशयिताचा मृत्यू झाला होता. त्याबाबत प्रशासनाला विचारणा करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी सांगितले असे काही नाही. त्यानंतर तिसर्‍या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे क्लेअर करण्यात आले. तर आज देखील पद्मानगर येथे जो मृत्यू झाला त्याचा प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा नाही. त्यामुळेे तो देखील संशयित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही दडवादडवी आणि दडपादडपी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी खुद्द सरकारमधील भलेभले पदाधिकारीच आता सोशल मीडियावर येऊन सरकारच्या विरोधात बोलू लागले आहेत. त्यामुळे सरकारची देखील डोकेदुखी वाढल्याचे दिसते आहे. 
असे असले तरी नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्या. शक्यतो घराबाहेर पडू नका. तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्स पाळा, लहान मुले व वृद्धांची काळजी घ्या.
- सागर शिंदे