एका बुक्का तीन दात पाडले, सहा जणांना बेदम मारहाण, परस्पर विरोधी फिर्यादी 16 जणांवर गुन्हे!


सार्वभौम (अकोले) :- 
                   अकोले तालुक्यातील कळंब येथे जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामार्‍या झाल्या यात कळंब व नवलेवाडी येथील दोन शेतकरी एकमेकांना भिडले. या दरम्यान एक महिला हा वाद सोडविण्यासाठी गेली असता एका व्यक्तीने तिच्या तोंडावर बुक्का मारला असता तिचे तीन दात पडल्याने ही महिला रक्तभंबाळ झाली होती. तर दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करुन घेतली असून एकूण 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
                            याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळंब येथे रत्नाबाई शंकर लांगडे या त्यांच्या आट्यावर उभे असताना आरोपी सुधिर शंकर लांडगे, प्रमोद भिकाजी नवले, संदीप खांडगे, रुपाली सुधीर लांगडे हे एकत्र जमा झाले. त्यावेळर रत्नाबाई यांना हे म्हणाले की, तुमच्याकडील पावनेतीन एकर जमीन ही सुधिर शंकर लांडगे यांच्या नावावर करुन दे असे म्हणून शिवीगाळ करु लागले. त्यावेळी रत्नाबाई म्हणाल्या की, यापुर्वीची काही जमीन तुमच्या नावावर केली आहे. आता उरली ती तरी मला जणग्यासाठी राहूदे असे समजून सांगत असताना वरील सर्वांनी मिळून शंकर लांडगे, पार्थ लांडगे, समर्थ लांडगे, प्रमिला भगवान काळे, सृष्टी वायकर यांना बेदम मारहाण केली. जर जमीन नावावर केली नाही तर तुमचे मुडदे पाडू अशी धमकी दिली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                 
   तर या गुन्ह्याच्या विरोधात मंगळवार दि. 21 जुलै रोजी रुपाली सुधिर लांडगे यांनी देखील एक फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सोमवार दि. 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जमिनिच्या कारणाहून वाद झाले होते. त्यावेळी शंकर पांडुरंग लांडगे, रतनबाई शंकर लांडगे, गोरक्ष शंकर लांडगे, तृप्ती गोरक्ष लांडगे, प्रमिला भगवान काळे व यांच्यासह अन्य पाच अशा दहा जणांनी एकत्र येऊन रुपाली लांगडे यांना घरात घुसून मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व कानातील टॅप्स गहाळ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.