अकोल्याला पुन्हा दोन बाधित, संगमनेरात एक मयत 30 रुग्ण! नवे गावे कोरोनाग्रस्त!
- आकाश देशमुख
सार्वभौम (संगमनेर) :- अकोले तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बर्यापैकी अटोक्यात आहे. मात्र, येथे थेंबे-थेंबे तळे साचताना दिसत आहे. एक-एक करुन अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या सत्तरीच्या जवळपास गेले आहे. हे असे असले तरी यात 39 जणांनी कोरोनावर मात करुन ते अगदी सुखरूप घरी गेले आहेत. आता यात पेंडशेत येथे एका 27 वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे. ती पेंडशेत येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली होती. हे एकमेकांच्या नातेवाईक असल्याचे बोलले जात आहेे. तर धुमाळवाडी येथे आलेल्या अवघ्या 7 वर्षाच्या बालकाला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पहिल्यांदा कारखाना रोड आणि आता धुमाळवाडी कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे.
तर संगमनेरात मालदाड रोड येथे 50 व 30 वर्षीय पुरूष, घुलेवाडी येथे 16 वर्षीय तरुण, रायते येथे 54 वर्षीय पुरूष, निमगाव जाळी येथे 65 वर्षीय महिला, तर नांदुरी दुमाला येथे आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात पाच महिला तर तीन पुरुषांचा सामावेश आहे. पिंपळगाव देपा येथे 22 वर्षीय तरुणी, 3 वर्षीय बालिका तर एक वर्षाचा एक बालक अशा तिघांना बाधा झाली आहे. तसेच शिबलापूर येथे 42 वर्षीय महिला व 50 वर्षीय पुरूष, शहरातील घासबाजार येथे दोन महिला व दोन पुरुष अशा चौघांना कोरोना झाला आहे. त्याच बरोबर संगमनेर बाजारपेठ येथे 60 वर्षीय महिला व पुरूष अशा 24 जणांना बाधा झाली आहे. तर खाजगी रुग्णालयातून सहा जणांचे रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात मोगलपूरा येथे 71 वर्षीय पुरूष, कुरण येथे 37 वर्षीय पुरूष, गुंजाळवाडी येथे 40 वर्षीय महिला तसेच भारत नगर येथे 54 वर्षीय महिला तर पेमगिरी येथे 30 वर्षीय पुरूष आणि राजापूर येथे 60 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहेे. त्यामुळे आज दिवसभरात 30 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात ठिकठिकाणी कोव्हिडचे रुग्ण सापडत असतानाच अकोल्यात पश्चिम पट्ट्यातील कळसुबाई शिखराचा व भंडारादरा धरणाचे पाणलोट क्षेत्र मात्र अबाधित होते. पंरतु शेवटी पेंडशेंत गावातील एक 33 वर्षीय तरुण मुंबईला जाऊन कोव्हीड पॉझिटीव्ह झाला होता. हा तरुण 12 दिवसांपुर्वी मुंबईतून पेंडशेंत या आपल्या मुळ गावी आला होता. काही कारणास्तव दोनच दिवसांपूर्वी तो पुन्हा मुंबईला परतला. तेथे गेल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याचे स्वॅब तपासले असता तो कोव्हीड पॉझिटीव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
त्यानंतर अकोल्याचे आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी आपली टिम थेट पेंडशेंत येथे पाठविली. या गावातून त्याच्या पाठीमागे आई वडील, भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असल्याची माहीती उपलब्ध झाली होती. याबाबत लाडगाव प्राथमिक केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. फलके यांनी तत्काळ त्यांच्या कुटुंबाला होमक्वारंटाईन केले होते. त्यानंतर त्यांच्या परिवारातील काही स्वॅब घेतले होते. आज त्यापैकी एक तरुणी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज जो धुमवाडी येथे जो बालक कोरोना बाधित मिळून आला आहे. त्यांच्या कुटुंबात कल्याण येथून काही लोक आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांना आरोग्य विभागाने अभिनव येथे क्वारंटाईन केले होते. त्यापैकी आज फक्त बालकाचा रिपोर्ट आला असून त्याचे आई वडील आणि अन्य व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे. हे सर्व क्वारंटाईन असल्यामुळे कोणी घाबरण्याचे कारण नाही. त कोणाच्या संपर्कात नाहीत. मात्र, प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी अशे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर यात एक खुशखबर अशी की, लहीत, पेंडशेत असे 16 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
- शंकर संगारे