अरे देवा! 14 दिवसानंतर नवरी पॉझिटीव्ह, नवरदेव निगेटीव्ह! संशयास्पद रिपोर्ट! धनदांडग्यांची धिटाई ब्राम्हणवाड्याला घातक.! सक्षम प्रशासक नेमा
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यात जांबळे परिसरात झालेल्या एका लग्न समारंभाला आता वेगळीच कहानी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे दि. 25 जून रोजी झालेल्या या विवाह सोहळ्यातील नवरीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आली असून नवरदेवाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भुवया उंचावल्या असून नवरदेवाचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी नेले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली. त्यामुळे, या लग्नात आलेल्या वर्हाड्यांचा शोध घेणे सुरू केला असून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे किंवा काहींना होमक्वारंटाईन करण्यात येणार आहे.
आता प्रशासनाचा म्हणा किंवा आरोग्य यंत्रणाच्या अथवा स्वॅब मशीनचा भोंगळपणा म्हणा. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की, गेल्या 25 जून रोजी काळेवाडी परिसरात एक विवाह सोहळा पार पडला. होता. म्हणजे तो पुर्ण होऊन आज 14 दिवस पुर्ण झाले आहे. त्यानंतर नवरीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येतो आणि नवरदेवाचा निगेटीव्ह.! हे ज्याला पटेल ते फक्त प्रशासनच असू शकतेे. तसेही हे लग्न पार पडल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी म्हणजे दि. 30 जून रोजी ब्राम्हणवाडा येथे दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर या नवरा नवरीला क्वारंटाईन करण्यात आले. हा काळ 30 जून ते 7 जुलै होता. त्यानंतर त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आले होते. मात्र, आज अचानक 14 दिवसानंतर नवरीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि नवरदेवाचा निगेटीव्ह.! हे सर्व धक्कादायक आहे.एक विशेष बाब म्हणजे याच दिवशी ब्राम्हणवाडा येथे आणखी एका व्यक्तीचा विवाह सोहळा पार पडला होता. मात्र, त्याची स्थानिक व्यक्तींनी त्याच्या वाच्चता केली नाही. ना स्थानिक समितीने त्याबाबत प्रशासनाला माहिती दिली. त्याच दिवशी जो विवाह पार पडला तेथील नवरा-नवरीला प्रशासनाकडून विचारणा झाली नाही ना त्यांना संस्थात्कम क्वारंटाईन करण्यात आले. इतकेच काय! त्या लग्नाला कोरोना बाधित व्यक्तीने हजेरी लावून देखील तेथील कोणाचे स्वॅब घेण्यात आले नाही. मात्र, ब्राम्हणवाडा येथून आठ ते दहा किमी अंतरावर असणार्या काळेवाडी परिसरातील नवोदीत दाम्पत्यास तपासणीसाठी नेले गेले. अर्थातच याबाबत वृत्तांकन केले असता धमक्या देण्यात देण्यात आल्या. मात्र, मीडिया याच्या हमरुशी कायद्याला बळी न पडता कायदेशीर मार्गाने गेली आहे. परंतु, स्थनिक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी हे गप्प का आहे? याबाबत तेथून एका सरपंचांच्या नावे फोन आला असता त्यांचा आदर करीत आपण कोविड योद्धे आहात असे म्हणताच त्यांचे मुजोर प्रतिउत्तर आले. कोविड योद्धे गेला उडत! अशा वृत्तीच्या व्यक्तींना प्रशासनाने तेव्हा पाठीशी घातले त्याचा परिनाम आता अकोले तालुका आणि ब्राम्हणवाडा भोगत आहे.
आता विशेष बाब अशी की, कोरोना बाधित व्यक्तीने काळेवाडी लग्नात हजेरी लावली मग तेथे दुसरे कोणाला लागण का झाली नाही? लग्नात अवघ्या काही सेकंद बाधिताचा संपर्क आला असेलही, मात्र, मग नवरदेव कोरोना पॉझिटीव्ह का नाही आला? या पलिकडे ही दोघे तर पतीपत्नी असून ते एकाच घरात राहत होते. त्यांच्या कुटुंबात आणि इतरांना का याची बाधा झाली नाही. त्यामुळे, हा अलेला रिपोर्ट फार मोठे संशयाचे कारण असून या परिसरातील अधिकार्यांची बदली करुन तेथे सक्षम अधिकारी नेमावेत अशी मागणी केली जात आहे. कारण, याच अधिकार्यांच्या संशयास्पद भुमिकामुळे तालुक्यात कोठे नव्हे. इतके कोरोना बाधित व्यक्ती अकोले तालुक्यात मिळून आले आहेत. याबाबत आमदार डॉ. किरण लहामटे व तहसिलदार मुकेश कांबळे यांनी या प्रकरणात लक्ष घालणे अपेक्षित आहे. अन्यथा ब्राम्हणवाड्याचे मुकूंदनगर किंवा कुरण व्हायला वेळ लागणार नाही.
या काळेवाडीच्या कोरोना प्रकरणात नवरदेवाचा कोरोना स्वॅब पुन्हा घेण्यात येणार आहे. मात्र, त्याच बरोबर नवरीचे देखील स्वॅब पुन्हा घेण्यात यावा. त्याची योग्य तपासणी व्हावी अशी मागणी काळेवाडीतून होत आहे. या अहवालात नेमके काय गौडबंगाल आहे. याची सखोल पद्धतीने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत असून तेथील प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे आणि कोणाला पाठीशी घालत आहे. याची देखील चौकशी करावी असा अग्रह स्थानिकांनी धरला आहे.टिप :- दै. रोखठोक सार्वभौम हे पोर्टल कोणाची गुलामी करत नाही. ना कोणाचे बांधिल आहे. त्यामुळे, जे वास्तव आहे आणि जनतेला वाटते त्याचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे, तुमचे म्हणणे मांडा, दमबाजीने बातमीला विरोध कराल तर कायदेशीर गोष्टींना नक्कीस सामोरे जावे लागले. सगळीच माध्यमे विकली जात नाही. पत्रकारीतेचा चौथा स्तंभ म्हणून सार्वभौमने जी तत्व पाळली आहेत ती कोणाच्या जाहिराती आणि पैशावर विकत घेतली जात नाही. त्यामुळे, न्यायी हक्काच्या लढाईसाठी संपर्क करा. पैशाचा मिजास दाखवाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल.
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 360 दिवसात 540 लेखांचे 68 लाख वाचक)