संगमनेरात कोरोनाचे आणखी दोन बळी संख्या सातवर.! नाईकवाडपुर येथे महिलेचा मृत्यू.!
संगमनेर सार्वभौम :- संगमनेर शहरातील कंटेन्मेंट झोन मधील मोमीनपुरा वय ६५ व नाईकवाडपुरा येथील ६३ वर्षीय दोन महिलेंचा कोरोणाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरात आज एकच वेळी २ बळी गेले आहे. शहरातील मदिनानगर परिसरातील ५५ वर्षीय फालुदा विकणाऱ्याचा पाचवा बळी गेल्यानंतर आज त्यात पुन्हा दोघांची भर पडून कोरोना बधित मृतांची संख्या सातवर जाऊन पोहचली आहे. तर मदिनानगर २ तर पुणे नाका असे तीन पॉझिटीव्ह केस मिळून आले आहेत.
दरम्यान, आज मंगळवार ९ रोजी सकाळी दोन महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.काही दिवसांपूर्वी तालुक्यात दोन मटकाकिंगचा कोरोना बाधीत होऊन मयत झाली होती. तर शहरात दोन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोना बधितांची संख्या वाढत असताना कोरोनाची लागण होऊन देखील मयतांनची संख्या तालुक्यात वाढत आहे