वावा.! अकोल्यात आठजण कोरोनामुक्त. पण, ऐ बाबो.!आजवर 25 हजार 619 होमक्वारंटाईन!

सार्वभौम (अकोले) :
नगर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढता आहे. यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण (65) संगमनेर तालुक्यात आहेत. तर अकोले तालुक्यात ही संख्या 19 असली तरी सुदैवाने अजून एकही रुग्ण स्थानिक नाही. त्यामुळे खर्या अर्थाने अकोले तालुक्याने कोविडची ही लढाई जिंकली असून त्याचे श्रेय्य प्रशासन आणि सुज्ञ नागरिकांना जाते. सध्या तालुक्यात 8 रुग्ण अगदी ठणठणीत होऊन घरी आले आहेत. तर 11 जणांवर उपचार सुरू आहे. पाच गावांतील रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून अद्याप सहा गावे कंटेनमेंट आहेत. तर दोन गावातील कंटेनमेंट उठले असून अद्याप 4 हजार लोक होमक्वारंटाईन आहेत. आतापर्यंत अकोले तालुक्यात 25 हजार 619 रुग्णांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज देश लॉकडाऊन होऊन तीन महिने होत आले आहेत. या दरम्यानच्या काळात सर्वत्र बंदी होती. तरी देखील जनता स्थिर रहायला तयार नव्हती. परप्रांतियांपासून तर गाव वासीयांपर्यंत जो-तो आपापल्या जन्मभुमीकडे धाव घेताना दिसत होता. अशा वेळी गावांसह देशाच्या देखील सीमा बंद करण्यात आल्या होत्या. तरीही लोक गावात आले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्याचाच फार मोठा फटका तालुक्यांना बसला. त्याचे उत्तम उदा. म्हणजे संगमनेर, पारनेर, आणि अकोले आहे. कारण, संगमनेरात बाहेरुन बाझा होऊन आलेल्यांची संख्या 20 पर्यंत आहे. तर स्थानिक 45 रुग्ण आहेत. मात्र, अकोले तालुक्यात तशी परिस्थिती नाही. जोवर लॉकडाऊन शिथिल झालेले होत नव्हते, तोवर तालुक्यात साधा एक देखील कोरोना बाधित रुग्ण नव्हता. मात्र, जसे राज्याअंतर्गत भ्रमण करण्यास परवानगी मिळाली तेव्हा मात्र, लिंगदेव येथे पहिला रुग्ण तालुक्यात पहायला मिळाला. मात्र, त्यांनी कोणाला बाधा होऊ दिली नाही.
आता तालुक्यात समशेरपूर आणि लिंगदेव हे दोन्ही कंटेनमेंट झोन होते. तेथील व्यक्ती कोरोना मुक्त झाल्यामुळे या गावकर्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी प्रशासनाने घोषित केले होते की, लिंगदेव येथील व्यक्ती कोरोनामुक्त झाली आहे. मात्र, त्यांना अद्याप सोडलेले नाही. अर्थात पुर्ण उपचाराअंती त्यांना घरी सोडण्यात येईल अशी प्रतिक्रीया डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे, लिंगदेवच्या रुग्णाच्या फार मागून गेलेले रुग्ण घरी आले आहेत. मात्र, ते अद्याप नगर जिल्हा रूग्णालयात आहेत. हे न समजण्यापलिकडे आहे.
सध्या अकोले तालुक्यात पिंपळगाव खांड, वाघापूर, बोरी, केळुंगण, धामणगाव पाट, जांभळे अशी सहा गावे कंटेनमेंट असून त्यात चार हजार लोकांंना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. आज 19 पैकी 8 घरी असून जे घरी आहेत. ते सुरक्षित राहण्यासाठी तहसिलदार, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी पोलीस हे कसोशीने प्रयत्न करतात. जसे लॉकडाऊन शिथिल झाले आहेत. तेव्हापासून हे अधिकारी धावतीवर आहेत. त्यामुळे आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे. कारण, कोरोना हारला नाही तर आपण घरी बसून त्यास लढा देण्यात हारलो आहोत. म्हणून शासनाने लॉकडाऊन शिथिल केले आहे. खरंतर आता जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने काळजी घेणे अपेक्षित आहे. काल संगमनेरात एका नायब तहसिलदारास कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे, येथे तू कोण याची विचारणा होत नाही. म्हणून काळजी घेणे महत्वाचे आहे.
एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अकोल्यात जो काही 19 हा कोरोना बाधित आकडा आहे. हे सर्व परकीय आक्रमण आहे. त्यामुळे, काल प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आपल्याला सुचना केल्या आहेत. की, जो कोणी बाहेरुन येईल त्याला 14 दिवसांचे क्वारंटाईन कंपलसरी करावे लागणार आहे. तरच याचा फैलाव टाळणे शक्य आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात अजून कोरोनाची लागन काही. हे तालुक्याचे पावित्र्य कायम ठेवायचे असेल तर काळजी घ्या. कारण, आजवर 25 हजार 619 रुग्णांना आपण क्वारंटाईन केले होते. मग हा आकडा वाढला तरी काही भीती नाही. फक्त दक्षतेची गरज आहे.
- - महेश जेजुरकर
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 9049247452 संगमनेर : 8308139547, 8208533006
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)