संगमनेरात आज पाच कोरोना बाधीत तर तीन महिलांचा मृत्यू.! संगमनेर बंदची गरज.!


सार्वभौम (संगमनेर) :-
               संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आकडा थांबता थांबेना झाला आहे. आजच दोन मयत तर पाच कोरोना बाधित रुग्ण असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे कोरोनाने संगमनेरात सत्तरी पार केली असून दिवसेंदिवस हा आलेख वाढता  आहे. आज संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथील तीस वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव आला आहे. तर मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक देखील  कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर शेडगाव येथील एक महिला मयत तर १८ वर्षीय तरुण बाधीत व आणखी एक मोमीनपुरा येथील ३० वर्षीय तरुण अशा पाच जणांना कोरोनाची बाधा तर आजच तीन महिला मयत झाल्या आहेत.
 यापुर्वी मदिना नगर येतील  २३ वर्षीय महिला, पुण्याहून आलेला ३५ वर्षीय तरुण तर मदिनानगर येथील ५२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. तर मोमीनपुरा येथील ६३ वर्षीय महिला व नाईकवाडापूरा येथील ६५ वर्षीय तर शेडगाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. हा प्रकार अगदी सकाळीच होतो कोठे नाहीतर त्या पाठोपाठ तीन रुग्ण तर दुपारपर्यंत दोन असे पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संगमनेरात मयत ८ तर पाच बाधीतांनी ७० री पार केली आहे.
(बातमी नंतर अपडेट असून मयत ३ व बाधीत पाच आहेत)

सुशांत पावसे