पोरगा की पोरगी स्त्रीसंगाचे वक्तव्य नडले- निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर संगमनेरात तक्रार दाखल!
- सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :
निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी उरण, नगर व बीड अशा तीन ठिकाणी आपल्या किर्तनात वक्तव्य केले होते. की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते आणि अशुभ तिथिला झाला तर संतती रंगडी व बेगडी जन्माला येते. या अक्षेपहार्य वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या समर्थकांनी अक्षेप घेतला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित विषयान्वये दि. 17 फेब्रुवारीला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी तुर्तास चौकशी केली. मात्र, कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, या समितीने त्यांना पुन्हा 27 फेब्रुवारी 2020 रोजी नोटीस काढली होती. तुम्ही जर निवृत्ती महाराजांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करुन तुम्हाला सहआरोपी करु. त्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी तक्रारदार यांच्याकडे काही पुरावे मागितले होते. ते सक्षम पुरावे देखील पुरविण्यात आले होते. त्यानंतर त्याची संखोल चौकशी करण्यात आली.

कोणी काहीही म्हटले तरी, निवृत्ती महाराज यांची क्रेझ साता समुद्रापार आहे. त्यांनी त्यांच्या प्रबोधनातून मजुरापासून तर अगदी रईस लोकांपर्यंत सगळ्यांचे वाभाडे काढले आहे. मात्र, टिका करताना अनेकदा त्यांच्या तोंडातून जातीयवाद बाहेर पडला तर धर्म सोडून विनोदी वृत्तीने त्यांनी अनेकांची खिल्ली उडविली. त्यामुळे, वारकरी सांप्रदाय आणि इंदुरीकर यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाल्याचे अनेकदा पहायला मिळाले. मात्र, त्यांनी एकला चलो रे.! हा नारा कधीच सोडला नाही. कोणी काहीही म्हटले तरी त्यांनी त्यांचा मार्ग सोडला नाही. गेल्या विधानसभेला ते संगमनेर विधानसभा लढविणार असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी राजकारण म्हणताच कानाला हात लावला. त्यामुळे, राजकारण ते अक्षेपहार्य वाक्य अशा अनेक गोष्टीत निवृत्ती महाराज वादग्रस्त परिस्थितीतून गेले आहे. काही झाले तरी ते जे बोलतात ते वास्तव बोलतात, कटू असले तरी ते सत्य आहे. मात्र, अशा प्रकारे त्यांनी स्त्रीसंग याबाबत वक्तव्य करुन पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले आहे. असे समितीचे मत आहे. आता काहीही झाले तरी या आरोपाला त्यांना सामोरे जावे लागेल. मात्र, या तक्रारीमुळे त्यांच्या तोंडाला आवर बसेल हे मात्र नक्की.!
-------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)
सार्वभौम (संगमनेर) :
निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी उरण, नगर व बीड अशा तीन ठिकाणी आपल्या किर्तनात वक्तव्य केले होते. की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते आणि अशुभ तिथिला झाला तर संतती रंगडी व बेगडी जन्माला येते. या अक्षेपहार्य वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या समर्थकांनी अक्षेप घेतला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित विषयान्वये दि. 17 फेब्रुवारीला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी तुर्तास चौकशी केली. मात्र, कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, या समितीने त्यांना पुन्हा 27 फेब्रुवारी 2020 रोजी नोटीस काढली होती. तुम्ही जर निवृत्ती महाराजांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करुन तुम्हाला सहआरोपी करु. त्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी तक्रारदार यांच्याकडे काही पुरावे मागितले होते. ते सक्षम पुरावे देखील पुरविण्यात आले होते. त्यानंतर त्याची संखोल चौकशी करण्यात आली.
यात खरोखर पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असून ते सामाजिक आणि नैतीक दृष्ट्या चूक आहे. या भुमिकेवर समिती ठाम राहिल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशान्वये संगमनेर तालुका वैद्यकीय अधिक्षक यांनी कोर्टात ही फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुन्हा नोंदल्यास या घटनेचा तपास न्यायालयातून पोलीस ठाण्यात येऊन एखाद्या सक्षम अधिकार्याकडून हा तपास केला जाऊ शकतो. त्यामुळे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समस्यांमध्ये आता वाढ झाली असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.दरम्यान स्त्री-संगाबाबात निवृत्ती महाराजांनी जे वक्तव्य केले होते. त्याच्या सुज्ञ नागरिकांमधून भयानक प्रतिक्रीया उभटल्या होत्या. त्यांचे वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर पसरले होते. त्यामुळे त्यांना पुरोगामी सामाजिक संघटनांना प्रचंड विरोध केला होता. तर धार्मिक क्षेत्रातून तसेच सामान्य जनतेने त्यांचे समर्थन केले होते. त्यासाठी राज्यात मोर्चे आंदोलने काढण्यात आले होते. इतकेच काय भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना यावर आवाज उठविला असता ते एक वेगळेच वादळ पहायला मिळाले.
दरम्यान पीसीपीएनडीटी कायद्याच्या समितीने बाकी त्यांचे लक्ष कोठे विचलीत होऊ दिले नाही. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी देखील लक्ष घालून सायबर शाखेच्या मदतीने या व्हिडिओ क्लिपची शहनिशा करण्यात आली होती. मात्र, कालांतराने सोशल मीडियावरील या पोष्ट डिलीट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे, तपासात काही अंशी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, पाठपुरावा करणार्यांनी मात्र, त्याचे सॅम्पल जपून ठेवले होते. ते वेळोवेळी प्रशासनाला देत त्यांनी चौकशीचा अग्रह केला होता. मात्र, अनेकदा त्यांच्याकडून टाळाटाळ होताना दिसत होती.अर्थातच निवृत्ती महाराजांना विरोध करणे म्हणजे समाजाचा रोष ओढून घेतल्यासारखे आहे. त्यामुळे सरकार, राजकारणी, समाजसेवक इतकेच काय तर प्रशासनाने देखील यातून काढता पाय काढून घेतला होता. कोरोनाच्या काळात हा वाद मिटेल आणि त्यावर पंघरुन पडले असे अनेकांना वाटले होते. मात्र, पाठपुरावा म्हणजे काय? याचे उत्तर उदा. या समितीने दिले आहे. यात अॅड. रंजना गवांदे यांच्यासह अन्य व्यक्तींनी फार अभ्यासपुर्वक हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून नंतर पोलीस चौकशी सुरू होऊ शकते.