आरे देवा.! संगमनेरात कुरण येेथे संशयीत पुरुष तर शहरात महिलाचे कोरोनाने मृत्यू! मयत 11, बाधीतांचे शतक!


सार्वभौम (संगमनेर) :
                संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एका व्यक्ती कोरोना संशयीत म्हणून मयत झाला असून संगमनेर शहरात नाईकवाडापुरा येथील एक ५० वर्षीय महिला मयत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात आता मयतांची संख्या 11 वर जाऊन पोहचली असून कोरोना रुग्णांना नाबाद शतक पुर्ण केले आहे. त्यामुळे संगमनेरात कोरोनाचा कहर कमी होता होत नाही. असे दिसून येत नाही. आता शहर आणि कुरण येथे प्रशासनाने काही भाग कंटेनमेंट केले आहे.
                       
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुरण येथे एका 85 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर एका  45 वर्षीय संशयीत व्यक्तीस कोरोनाच्या तपासणीसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा रिपोर्ट अद्याप प्राप्त नाही. मात्र, त्या उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून कुरणमधील कोरोनाची शांतता भंग झाली असून खर्‍या अर्थाने तेथील उद्रेख सुरू झाला आहे. कोरोनामुळे तेथील नागरिकांमध्ये अस्थिरता दिसून येत असून त्यातील काही नागरिक प्रशासकीय अधिकार्‍यांना शिवीगाळ, दमदाटी करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील काही प्रशासकीय संघटनांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे.
                                 
तर शहरातील मोगलपुरा, लखमीपुरा येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा एकएक रुग्ण मिळून येत आहे. त्यामुळे येथे प्रशासन वारंवार कंटेनमेंट झोन करीत आहे. शहरात नाईकवाडापुरा येथील ठिकाणी ज्या महिलेस त्रास होत होता तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिचा आज कोरोनाशी लढताना मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून मयतांची संख्या 11 वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे अपेक्षित आहे.
                           संगमनेरात कोरोनाने हाहाकार घातला आहेे. हेच वास्तव आहे. राज्यात 36 जिल्ह्यांपैकी असे फार बोटावर मोजण्याइतके तालुके आहेत. जेथे 100 कोरोनाचे रुग्ण आहे. तर जिल्ह्यात नव्हे तर एखाद्या तालुक्यात 11 लोक कोरोनाने मयत व्हावे असे हे तुरळक उदाहरण आहे. असे असताना देखील येथील नागरिक दक्षता घ्यायला तयार नाहीत, तर काही महाशय म्हणतात येथील नागरिकांना घाबरुन देण्यात येत आहे. बाबो! वैगरे शब्दप्रयोग करुन जर संगमनेरची जनता घाबरत असती तर आज बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला असात, रस्ते ओस पडले असते, पोलीस, महसूल यांच्या पायाला भिंगरी बांधण्याची वेळ आली नसती. त्यामुळेे, हा गैरसमज त्यांनी काढून परखड आणि वास्तव जनतेसमोर मांडले पाहिजे. कारण, भितीपेक्षा दक्षता फार महत्वाची आहे. संगमनेर जनतेचा कोणी "राजा" नाही, येथील जनता स्वयंभू आहे. त्यांना भले बुरे कळते त्यामुळे त्यांचे वकीलपत्र घेण्यात अर्थ काय.! मुळात सरकार म्हणते आता कोरोनासोबत जगून त्यास हरवायचे आहे. त्यामुळे कोरोनाचे आव्हान पेलण्यासाठी नागरिक सक्षम आहे. म्हणून तर रस्त्यावर 6 ते 5 प्रचंड गर्दी असते. त्यामुळे, त्यांना कोणी घाबरवू शकत नाही.
                         अर्थात प्रशासनाचे कर्तव्य आहे. नागरिकांना सावधान होण्याचे सल्ले देणे, त्यांची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांना सरकार ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. म्हणून त्याचे एकच म्हणने आहे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, सर्वाजानिक ठिकाणी जाणे टाळा, सॉनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सचे पालन करा. हेच नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम माध्यये करत आहे.
       
तर जिल्ह्यात आज सायंकाळी  रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका अशा  २८ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या आता १०५ इतकी झाली आहे. तर नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४,  तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.
           दरम्यान, जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत २६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सध्या ॲक्टिव रुग्णसंख्या १०५ इतकी झाली आहे.