सात लाखाच्या क्रेटातून 80 हजाराची दारु! पंचशिल बुरखा फाडला! राजुरच्या त्या बहाद्दरांना सॅल्युट!


सार्वभौम (राजूर) :
                       अकोले तालुक्यातील राजूर हाद्दीत बारी चेकनाक्यावर कर्तव्यदक्ष पोलिसांनी चक्क 7 लाखाची गाडी आडवून त्याची चौकशी केली असता त्यात 80 हजार रुपयांची देशी विदेशी दारु मिळून आली आहे. ही कारवाई गुरूवार दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राजूर पोलिसांनी केली. याप्रकरणी राहुल गोपाळ मोहोर (रा. शेंडी, पंचशिल हॉटेल, ता. अकोले. जि. अ.नगर) याच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज जवळ-जवळ तीन महिने होत आले आहे. कोरोनाने देशात थैमान घातले त्याचे वलय महाराष्ट्रात देखील निर्माण झाले. त्यामुळे, राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात नगर जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे. जेथे आजही सीमोल्लंघन होऊ दिले जात नाही. त्याचा फायदा आज राजूर येथे झाल्याचे पहायला मिळाले. तर नाके चेक करणार्‍या कर्मचार्‍यांच्या कर्तत्वाचे देखील दर्शन येथे घडून आले. त्यामुळे खरोखर राजुरच्या पोलीस योद्ध्यांना सॅल्युट.! खरंतर अशा प्रामाणिक पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान व्हायला पाहिजे.!
                       
त्याचे झाले असे की, कोरोनाचा शिरकाव तालुक्यात होऊ नये यासाठी राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी डोळ्यात तेल घालून अकोले तालुक्याच्या सीमांवर कोरोनाशी लढा दिला आहे. कारण, राजुरच्या सीमा पुणे, मुंबई आणि नाशिक यांच्या जवळ आहे. ही सर्व शहरे कोरोनाने त्रस्त झाली आहेत. त्यामुळे राजुरमध्ये शहरातून होणारी आवक वाढत असताना पाटील यांनी त्यांचे कर्मचारी अगदी डोंगर दर्‍यांमध्ये उभे करुन तालुक्याच्या सीमा कोरोनापासून संरक्षित ठेवल्या. जोवर शासन नियम शिथिल करत नाही तोवर पाय रोखून राजूर पोलीस उभे राहिले. देशात आणि राज्यात सीमा खुल्या झाल्या मात्र, राजुरमध्ये आजही कडा पहारा येथे पहायला मिळाला.
                     
एकीकडे लोक दोन वेळच्या अन्नासाठी बेजार झालेले असताना काही लोक मात्र, अलिशान गाड्या वापरून पैसा कमविण्याच्या नादी लागले आहे. हेच चित्र राजुरच्या बारी चेकनाक्यावर पहायला मिळाले. जर तेथे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील साहेबांनी नेेमले नसते ते ही कारवाई झाली असती की नाही! हे नव्याने सांगायला नको. कारण, घारगावच्या आळेखिंड येथे एका उपद्रवी पोलिसाने गुटख्याच्या गाड्या पोलीस संरक्षणात काढून दिल्या. या प्रकरणाला पंधरा दिवस देखील उलटले नाही. त्यामुळे, शिस्त, प्रामणिकपणा आणि वरिष्ठांनी दिलेल्या कामाप्रती निष्ठा अशा अनेक गोष्ठीचे प्रमाण या कारवाईतून प्रतीत झाले आहे.
                                       
त्याचे झाले असे की, सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी गुरूवारी बारी चेकनाक्यावर अशोक गाडे, देविदास गिते यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांची ड्युटी लावली होती. यावेळी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना घोटीकडून 5004 या क्रमांकाची गाडी येताना दिसली. पोलिसांनी त्या वाहनास अडविण्याचा प्रयत्न केेला मात्र, येतानाच चालकाची चलबिचल त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे हे कर्मचारी गाडीला आडवे झाले. गाडी थांबली असता त्यांनी वाहनाची चौकशी करण्यास सुरूवात केली. मात्र, यात दारुचे बॅक्स असल्यामुळे तेथे अर्थपुर्ण तडजोडीचा विषय निघाला. मात्र, पाटील यांच्या सक्त सुचनांचे पालन करीत पोलिसांनी त्यांना कायद्याच्या भाषेत समजून सांगत वाहनाची तपासणी सुरू केली. आत विशेष काही दिसले नाही. मात्र, गाडीची डिक्की उघडली असता त्यात भले मोठे घबाड बाहेर आले.
                               
दरम्यान हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.त्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता थेट गाडी पोलीस ठाण्यात घेण्याची सुचना केली. त्यानंतर गाडी थेट पोलीस ठाण्यात आली. त्यात देशी विदेशी दारूच्या 180 मिली मध्यमार्क 42.8 टक्के प्र32माणाचे 15 बॅक्स, त्यात 48 क्वार्टर सिलबंद व कार असा 7 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. हा प्रकार पाटील यांना सांगण्यात आला असता त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असता अशोक गाडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किशोर तळपे करीत आहेत.
                         यात एक विशेष बाब म्हणजे राजूर हाद्दीत शुक्ला गँगला तडीपार केल्यानंतर येथील अवैध धंदेवाल्यांना शहानपण येईल असे वाटत होते. मात्र, लोक रोज मरत असताना काही लोक पैसा कमविण्यासाठी मरत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्ला कंपनीनंतर त्यांच्या रडावर आता बडे मद्यविक्रेते असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, जिल्हातून तडीपार व्हायचे नसेल तर नितीन पाटील हे राजुरमध्ये तोवर तरी अनेकांनी आपल्या धंद्यांना टाळे ठोकल्याच्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
- आकाश देशमुख