भारतीय सैनिक जेथे शिकले तेथे स्वत:हून क्वारंटाईन झाले, शाळा स्वच्छ पिंपळगावचे एक अनोखे मोठेपण!
सर्वाभौम विशेष
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो, तुमच्यासाठी! हे गाणं ऐकलं की काळजी अगदी भरुन येते. जवान सीमेवर देशाची सुरक्षा करीतच आहे. मात्र, ते सुट्टीवर आल्यानंतर देखील देश कोरोनापासून मुक्त होण्यासाठी आपले बलिदान खर्ची करीत आहेत. असेच दोन भारतीय जवान अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे घरी आले आणि गावकर्यांना त्यांनी विनंती केली. हा लढा अस्तित्वाचा नाही, तर देशाच्या अस्मितेचा आहे. त्यामुळे आम्ही आल्याआल्या घरी जाणार नाही तर आम्हाला आमच्या बालपणीच्या मराठी शाळेत क्वारंटाईन करा. त्यांचे बोल एकल्यानंतर गावकर्यांच्याच काय! अगदी जवान आणि देशाप्रती प्रेम बाळगणार्यांचे उर भरुन आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, हे कोविड योध्यांनो! तुमच्या प्रत्येक कुर्बानीची याद हा भारतील नागरिक त्यांचा काळजात ठेवत आहेे. म्हणून तुम्हाला पहिला जय हिंद !!!
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासुनच खर्या अर्थाने मातृभुमीला न्याय मिळाला आहे. त्यानंतर जम्मु काश्मिरच्या मुद्याहून म्हणजे सन 1948 पासून हा लढा सुरू झाला तर सन 1965 ते 1999 चे कारगिल युद्ध आणि अगदी कालपर्यंचे 2016 चे सर्जिकल स्ट्राईक यात भारतील जवान अगदी कोठे कमी पडले नाही. इतकेच काय! सन 1962 भारत-चीन, 1971 बांगलादेश आणि 1983 मधील श्रीलंका युद्धात देखील जवानांनी देशाचे संरक्षण केल्याचे इतिहास सांगतो आहे. ते युद्ध शस्रास्त्रांचे होते तेथे दंड थोपटून आपले मर्द मावळे उभे ठाकले होते. परंतु आज मात्र परिस्थिती फार वेगळी आहे. आता येथे शस्त्र नव्हे तर शास्त्राची गरज असून मैदानात नव्हे तर घरात बसून लढाई जिंकण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. मात्र दुर्दैव असे की, कोणी घरात बसायला तयार नाहीत, कोणी कोणाचे उपदेश ऐकूण घेण्यास तयार नाही, कोणी रक्ताच्या नात्याला पदरात घ्यायला तयार नाही, अवघ्या अडिचशे किलोमिटरहून आलेल्या मुंबईच्या पाहूण्याला देशाच्या सुरक्षेसाठी मराठी शाळेत क्वारंटाईन होण्याची लाज वाटू लागली आहे. जो कोणी झालाच त्याला घरी इतकी उठाठेव नाही तितकी शाळेत हवी आहे. त्यामुळे तक्रारीचा पाढा आणि रडगाणं सोडून त्याला दुसरा विषयच सुचेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत मात्र, अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अवघ्या काही दिवसांसाठी घरी आलेल्या सैनिकांनी एक नवा आदर्श आणि बलिदानाचा धडा दिला आहे.
कारण, तान्हाजी शिवाजी तोरमल आणि संजय किसन वाकचौरे हे दोन सैनिक आपल्या आई वडिलांंना भेटण्यासाठी गावी आले आहेत. त्यांनी गावाची वेस ओलंडली आणि थेट कोरोना प्रतिबंध समितीशी संपर्क साधला. आम्ही देशाचे सैनिक आहोत, हा देश कोरोनाशी युद्ध करीत आहे. त्यामुळे या लढाईचा एक भाग म्हणून आपले जे काही नियम आहेत. ते आम्ही स्वयंस्पुर्वीने पाळण्यास तयार आहे. त्यानंतर अगदी सामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांनी स्वत:ला बंधिस्त करुन घेतले. आज सहा दिवस होत आले आहे. त्यांनी शाळेची चांगली स्वच्छता केली आहे. या फावल्या वेळेचा सदउपयोग करुन त्यांनी वेगवेळी पुस्तके वाचली आहेत. नातेवाईकांना फोन करुन त्यांच्याशी हितगुज साधली आहे. विशेष म्हणजे या सैनिकांच्या माय मावल्यांना माहित आहेे. की आपलं लेकरु गावात येऊन अवघ्या काही अंतरावर प्रतिबंधित आहे. त्यामुळे त्या मातृत्वाच्या वेदना ते 10 ते 14 दिवस संपण्याची अतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे या कोरोनाने अनेकांना बेघर केले तर अनेकांची पायपीट केली, अनेकांमध्ये मतभेद केले तर अनेकांची मनभेद केली. याचे वाटोळे करण्यासाठी फक्त संयम आणि सजगतेने वागण्याची गरज आहे. त्यामुळे, या सैनिकांप्रमाणे आपण देखील शासनाने ठरवून दिलेले नियम पाळा, ग्रामीण पातळीवरील समित्यांना सहकार्य करा. असे झाले तर हे दिवस फारकाळ टिकणार नाही. फक्त एकोप्याने लढायचे आहे आणि बामारीसे लढणा है! बिमारसे नाही! हेच लक्षात ठेऊन कोरोना संपवायचा आहे.
प्रत्येक नागरिकांनी दिलेल्या नियमांचे स्वयंप्रेरणेने पालन करणे आवश्यक आहे. जर या सैनिकांप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जागरुक राहिला तर हा प्रादुर्भाव अगदी सहज टाळता येऊ एकतो. त्यामुळे, हा एक चांगला संदेश असून त्यांच्या निर्णयाचे नक्कीच कौतुक आहे.- मुकेश कांबळे (तहसिलदार अकोले)
त्यांनी ऐकीकडे गावाचे रक्षण करुन गावाचे नाव उंचविले आहे. आता गावातील नागरिक सुरक्षित रहावा म्हणून त्यांनी दक्षता घेतली आहे. त्यामुळे, दुष्मनांशी शस्त्राशी आणि गावात त्यांनी विचारांची मांडणी केली आहेे. त्यामुळे मी एक नागरिक म्हणून गावात काम करणारी समिती आणि कोरोनाशी लढणार्या प्रत्येकाचे आभार मानतो. गावकरी- सावळेराम आव्हाड
*"तत्काळ संदेश"*
--------------------------
जी लोकं केवळ शाळेत संशयीत क्वारंटाईन करण्यात आली आहेत. त्यांनी घरी पाठविले पाहिजे. किमान ज्या शाळांच्या आवस्था बिकट आहे अशा तरी. कारण, हे वादळ म्हणजे मानसाच्या काळजाचा ठेव घेते. दोन्ही आपत्त्या नैसर्गिक आहे. त्यामुळे, कोरोनापेक्षा वादळ फार रौद्ररुपी आहे. आजार नंतर पण एक माणूस म्हणून पहिला विचार केला पाहिजे. आपण सेफ आहोत म्हणून कदाचित कोणाला वाटेलही की कशाला घरी बरे आहे तेथेच. पण चार ते १० दिवसांची क्वारंटाईन लोकं घरी पाठविले पाहिजे आणि कोणाला वाटते की आपल्याला किंवा आपल्या कुटूंबाला बाधा झाली पाहिजे.! त्यामुळे ते नक्कीच काळजी घेतील. कारण, आज मराठी शाळेंच्या भौतिक सुविधांचे हाल काय आहेत हे आपण सर्वज्ञात आहोत. त्यामुळे, जे लोकं पहिलेच भेदरले आहेत. त्यांना अधिक भेदरविण्यापेक्षा ते ज्या भावनेने आपल्या "मायभूमीत आसरा" म्हणून आले आहेत त्यांना आपण अशा वादळी वाऱ्यात का ठेवायचं. शेवटी पडकं झकडं का होईना घर-घर असतं त्यात मायेची ऊब असते. म्हणून मला वाटते किमान बाधा नसलेले आणि ४ ते १० दिवस झालेल्या व्यक्तींना घरी पाठविले पाहिजे. मी आत्ता यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. तुम्ही देखील तुमच्या पातळीवर प्रयत्न करा.
यासाठी एकतर मुख्यमंत्री महोदय, जिल्हाधिकारी, तहसिलदार आणि ग्राम पातळीवर माणुसकी म्हणून कोरोना प्रतिबंधक समिती निर्णय घेऊ शकतेे.
विनम्र आवाहन !
सहमत असाल तर प्रशासनापर्यंत पाठवा
-------------------------
सागर शिंदे
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)