अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती; आय लव यू म्हणत लगट आणि अत्याचार.!


सार्वभौम (अकोले) :- 
              माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे म्हणत निळवंडे येथील तरुणाने एका अल्पवयीन मुलीस मोहात पाडले, नंतर तिच्याशी लगट करुन तिच्यावर अत्याचार केला. यात ती गर्भवती राहिल्याचे लक्षात आले आहे. हा प्रकार मुलीच्या पालकांना समजला असता त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत माडली. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीनुसार पोस्को व बलात्कराचा गुन्हा दाखल केला आहे. यात मच्छिद्र  संजय मेंगाळ (रा. निळवंडे ता. अकोले) यास आरोपी करण्यात आले आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ मे २०१९ ते २० मे २०२० या काळात आरोपी याने एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. दरम्यान दोघामध्ये चांगल्या गप्पा होत होत्या मात्र मुलगी अल्पवयीन असल्यामुळे या तरुणाने त्याचा फायदा घेतला आणि शेरणखेल येथील एका शेतात बोलविले. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणत तिला प्रेमाच्या मोहात पाडले आणि  तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार येथेच थांबला नाही तर तो वेळोवेळी वारंवार होत राहिला. या दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलीचे पोट दुखू लागले. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या आईस सांगितला, मात्र असेच दुखत असेल, मासिकच्या समस्या होत असेल त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र तीन ते चार महिन्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या आईस शंका  आल्यामुळे त्यांनी मुलीस एका रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, ही मुलगी गरोदर आहे. दरम्यान पालकांचा पारा चढला आणि त्यांनी मुलीस विचारणा केली असता ती घाबरुन गेली होती. तिने नाहीचा पाढा लावून धरला. मात्र, तिला समजून सांगितले असता तिने घडलेला प्रकार समोर मांडला. त्यानंतर ही सर्व  उठाठेव समोर आली. दरम्याम मुलीच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. घडला प्रकार पोलिसांच्या समोर मांडला. पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी हकीकत ऐकल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात मच्छिद्र मेंगाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      दरम्यान हा विषय थोडासा बाजुला ठेऊन तालुक्यातील अत्याचाराचे प्रकार पाहिले तर फार भयानक बाब समोर येते. की, राजूर आणि अकोले येथे बलात्काराचे गुन्हा दाखल होण्याचे सर्वाधिक प्रकार आहे. तर पळूण जाणे हा देखील मोठा आकडा आहे. हे प्रमाण थांबविण्यासाठी शाळा आणि सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेणे फार गरजेचे आहे. कारण, विरोधी लिंग असणाऱ्या व्यक्तींचे ठराविक वयात अाकर्षिले जाणे हे नैसर्गिक आहे. मात्र, त्या वयात योग्यते मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी असे आयुष्य बरबाद होतात.

जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

      वास्तवत: जर मुलगा १८ वर्षाच्या पुढे असेल आणि मुलगी १८ वर्षाच्या कमी असेल तर प्रेम आणि भावना यांना कायद्यात यत्किंचितही थारा नाही. तेथे पोस्को, अपहरण, विनयभंग किंवा बलात्कार हे गुन्हे दाखल होतातच. तशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे, मुलीच्या आयुष्याला कलंक लागतोच मात्र, मुलांचे उभे आयुष्य सुरु होण्यापुर्वीच संपून जाते. त्यामुळे, अशा वयात तरी मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे. लाजू नका, भिऊ नका पण पालकांनी योग्यवेळी मुलांशी हितगूज साधले पाहिजे. कारण, जिल्ह्यात नगर शहरात आणि अकोले तालुक्यात अशा घटना फार घडतात. केवळ, योग्यवेळी योग्य सल्ला मिळाला नाही तर मुलांचे आयुष्य बरबार होते. म्हणून अकोल्यात बालगुन्हेगारी या विषयांवर कार्यशाळा होणे गरजेचे आहे.