स्कायमेटच्या अंदाजानुसार वादळ आळेफाटा, संगमनेर व अकोले सिन्नरतून जाणार!! घाबरु नका दक्षता घ्या!


सर्वाभौम विशेष
आरबी समुद्रात निर्माण झालेल्या नैसगिक चक्रीवादळाचा फटका नगर जिल्ह्यातील संगमनेर, पठारभाग, अकोले, सिन्नर या भागांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कारण हे वादळ नगरच्या दक्षिण भागातून जाणार आहे. असे स्कायमेटच्या अंदाजानुसार सांगण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासून या परिसात वादळी वारा आणि संततधार पावसाने गेल्या 24 तासापासून आपली हजेरी काय ठेवली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे अशा ठिकाणी राहणार्‍या लोकवस्तींना प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. यावेळी कोणताही नैसर्गिक आपत्ती येऊ एकते. त्यामुळे घाबरुन न जाता प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. याचाच तडाखा म्हणून सद्या सर्वत्र वादळीवारा आणि पावसाच्या हलक्या सरी अजूनही बरत आहेत. सद्या अकोले व संगमनेर तालुक्यासह 14 तालुक्यात आज दि.3 जून रोजी पाऊस झाला आहे. अकोले तालुक्यात आठ ठिकाणच्या परिसरात चांगला पाऊस झाला आहे तर संगमनेर विभागात दहा ठिकाणी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली आहे. विशेेष म्हणजे पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोर चांगला असून धरणांची पातळी देखील वर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज 3 जून रोजी आरबी समुद्राचे वादळ उत्तर महाराष्ट्रात येऊन धडकत आहे. ही रौद्ररुपी नैसर्गिक आपत्ती पुणे ते नाशिकहून मध्यप्रदेशकडे जाताना त्याचा फटका नगर जिल्ह्यातला बसणार आहे. त्यामुळे, अतिवृष्टी होण्याचे संकेत असून कालपासून ग्रामीण आणि डोंगरी भागांमध्ये वादळाने हाहाकार मागविला आहे. आजच कोठे विजेच्या तारा तुटल्या आहेत तर कोठे झाडे पडली आहेत. गेल्या काही दिवस कोरडेठाक पडलेले ओढे नाले पुन्हा जीवंत झाले असून त्यांनी नदिचा प्रवाह शोधण्यासाठी सुरूवात केली आहे. सद्या ही सुरूवात असून काही तासानंतर हे रौद्ररुप धारण करु शकते. असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे, प्रशासनाने सुचित केले आहे की, जुनाट आणि पडक्या घरामध्ये वास्तव्य करू नका, वीज, झाडे, खांब यांच्याजवळ उभे राहू नका, पाळीवप्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, धोकादायक ठिकाणी चढू उतरु नका, विशेष म्हणजे सेल्फीच्या नादात कोठे आगाऊपणा करु नका, कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका, कोरोनाच्या संदर्भात संस्थात्मक विलगीकरण केलेल्या व्यक्तींनी स्वत:ची काळजी घ्या, त्यांच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. जर काही संभाव्य धोका वाटल्यास संबंधित व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या उपायोजना स्थानिक पातळीवर तत्काळ कराव्यात तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. अशा सुचना निवासि जिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढल्या आहेत.
आता सद्या संगमनेर तालुक्यात 10 ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. आज संगमनेरात 24 मिलीमिटर, धांदरफळ 17 मि.मि, आश्वी 14 मि.मि, शिबलापूर 18, तळेगाव 7, समनापूर 19, साकूर 49, घारगाव 54, डोळासणे 37 तर पिंपरणे येथे 26 मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर अकोले तालुक्यात आठ परिसरात बर्‍यापैकी पाऊस झाला असून शहरात 27 मि.मि, राजूर 13, शेंडी 29, ब्राम्हणवाडा 16, समशेरपूर 16, कोतुळ 27, विरगाव 10 तर साकरवाडी येथे 9 मिलीमिटर असा पाऊस झाला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळी वार्‍याचे प्रमाण कालपासून फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हे वादळ मध्यप्रदेशकडे जाताना आळेफाटा, संगमनेर, अकोले, सिन्नर अशा मार्गे जाणार आहे. असा अंदाज स्कायमेट यांनी वर्तविला आहे. त्यामुळे घाबरुन न जाता केवळ दक्षता घ्या सुचनांचे पालन करा.
सागर शिंदे
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)