अकोल्यात आजी माजी आमदारांध्ये जुगलबंदी! राजुरच्या ग्रामपंचायतीहून वाद पेटला!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :
जशी अकोले विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. तेव्हापासून तालुक्यात वेगळ्याच प्रकारची तणावपुर्ण शांतता आहे. मात्र, जसा वेळ मिळेल तेव्हा कोणी कोणावर ताशेरे ओढले तरी कोणी कुरघोड्या केल्या. हे सुरू असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले आणि सगळेच लॉकडाऊन झाले. मात्र, आता हे काही नियम शिथिल होताच ही रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. ती राजूर येथील ग्रामपंचायतीने स्वयंप्रेरणेने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या रुपाने आपल्याला पहायला मिळाली. आ. डॉ. किरण लहामटे यांनी तहसिलदार मुकेश कांबळे यांना फोन करुन विचाले की, राजुरला बेकायदा लॉकडाऊन केला जातो, त्यामुळे व्यापारी वैतागले आहेत यावर ग्रामपंचायतीवर काही कारवाई होऊ शकते का? त्यामुळे, राजुरचे सरपंच तोफेच्या तोंडी आले आता त्यांना सावरण्यासाठी थेट मा. आ. वैभव पिचड यांनी या वादात उडी घेत विद्यमान आमदारांना खडेबोल सुनावले, पुरे झाले आता! सरपंचांविषयी कारवाईची भाषा खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे, संयमी स्वभावाच्या माजी आमदारांनी देखील रैद्ररुप धारण केले असून आता जशास तसे उत्तर देण्याची ठरविले आहे.

डॉक्टरांनी मुकेश कांबळे यांना फोन लावत लॉकडाऊनच्या काही नियमांची चौकशी करताना आमदार म्हणाले की, राजूर ग्रामपंचायतीला नोटीस बजवा. त्यानंतर प्रशासकीय भाषेत तहसिलदार यांनी स्पष्ट सांगितले की, नोटीस काय! ते अशा प्रकारे मनमानी करीत असेल तर कारवाईच काय! त्यांची पदे देखील रद्द होऊ एकते. त्यामुळे अधिकच आनंद होत त्यांना नोटीस बजाविण्याचे ठरले गेले. अर्थात एक कोविड योद्ध म्हणून सरपंच त्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जेव्हा कोविडने थैमान घेतले होते तेव्हा फक्त एक संशयीत महिला रस्त्याने गेली तर चक्क महामार्गाचे शुद्धीकरण केले होते. तर त्यांच्या यशाचे फलित म्हणजे अजूनाही राजुरला एकही स्थानिक व्यक्ती कोरोनाबाधित नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हटल्यानंतर सोशल मीडियावर रहाकाळ माजले, उई सपोर्ट राजूर ग्रामपंचायत असे सिम्बॉल प्रत्येक गृपवर झळकू लागले. त्यानंतर मात्र, माजी आमदार यांनी शांततेची भुमिका घेतली नाही. त्यांनी सरकारसह आमदारांवर सडकून टिका केली. एक प्रकारचे जशास तसे उत्तर देत त्यांनी आरेरावी आणि कारवाईची भाषा खपून घेतली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले.
दरम्यान असे बोलले जाते की, राज्यात जसे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तेव्हापासून तडजोड, जागावाटप, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खाते, विधानपरिषद, नाराजीनाट्य आणि कोरोना यामुळे साडेसाती लागली आहे. त्यामुळे, सरकार फार उताविळ झाले आहे. कोणाला काही करता येईना, कोठे ठेके घेता येईना, कोणाच्या बदल्या करता येईना, कोणती पदे नियुक्त करता येईना, मंजुर्या देता येईना त्यामुळे प्रत्येकात फार मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. त्यातल्या त्यात भाजपचे राज्यात 104 आणि मित्रपक्ष असे 120 पर्यंत आमदार आहेत, त्यामुळे ते सरकारला फार धारेवर धरत आहेत. त्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असणार्या अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी भाजपत प्रवेश केल्याने नव्या आमदारांच्या हाती काहीच नाही. त्यामुळे, त्यांना स्थानिक स्थैर उभे करताना फार अॅक्टीव्ह रहावे लागणार आहे. हेच उदाहारण म्हणून की काय! अकोल्यात त्याची प्रचिती येऊ लागली आहे. आता येणार्या काळात हा आजी माजी फार रौद्र होत जाणार आहे. कारण, येणारा काळ कोविड नंतर सगळा निवडणुकांचा असणार आहे. सध्या फक्त वेट अॅण्ड वॉच..!
दरम्यान अकोले शहराच्या लगत एक रुग्ण मिळून आला आहे. मात्र, त्याचा वावर शहरात होता. त्यामुळे आता राजूरनंतर अकोल्यात देखील बंदचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे राजुरमध्ये भाजप राज आहे तर अकोल्यात पहिला पुढाकार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येथे आता काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थिती येथे आता राजकारण नव्हे तर सुरक्षाचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कदाचित अकोले तीन दिवस बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, याला कोणाताही प्रशासकीय आधार असणार नाही. तर हा बंद स्वयंस्पर्तीने बंद करण्याचे ठरु शकते. त्यामुळे, एकीकडे समाजकारण तर दुसरीकडे राजकारण अशा पद्धतीने अकोल्यात राजकीय वारे वाहताने दिसत आहे.
--------------------------------------

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशात कोरोनाचे संकट आजही आ वासून उभे आहे. मात्र, महाराष्ट्राची ढासाळलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाने दारुची दुकाने खुली केली. कोरोनाने मानसे मरो-जगो, पण बाजारपेक्षा खुल्या झाल्या पाहिजे, जनजीवण पुर्वपदावर आले पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे अशा अनेक अजेंड्यांवर प्रत्येकाने कोरोनासोबत जगायचे असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काहीही झाले तरी पुन्हा लॉकडाऊन नाही म्हणजे नाही! आणि जर कोणी धिटाई करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यामुळेच नाशिक सारख्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आणि नाशिक बंद करायचे नाही असे सांगितले. हेच चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
अकोले तालुक्यात देखील राजूर येथे ग्रामपंचायतीने गाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. तर माजी व विद्यमान आमदार देखील स्थानिक आहे. त्यामुळे तेथे जर जुगलबंदी झाली नाही तर नवलच वाटेल. आता काही नागरिकांनी पुढार्यांचे कान भरले आणि लॉकडाऊनवर चर्चा रंगली. त्यानंतर काही व्यापारी डॉ. लहामटे यांच्याकडे गेले आणि साहेबांनी थेट तहसिलदार यांना फोन लावला. पुर्वीपासून त्यांची मनसे प्रमाणे वेगळी स्टाईल आहे. फोन करायचा आणि अधिकार्यांचा पानउतारा करीत त्याची रेकॉर्डिंग करुन हे पुरावे जनतेच्या स्वाधिन करयाचे. मात्र, हा फंडा काल त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांनी विरोधकांना बोलण्यास जागा करुन देत नव्याने जंग छेडली आणि आजी-माजी यांच्यात जुगलबंदी सुरू झाली.

डॉक्टरांनी मुकेश कांबळे यांना फोन लावत लॉकडाऊनच्या काही नियमांची चौकशी करताना आमदार म्हणाले की, राजूर ग्रामपंचायतीला नोटीस बजवा. त्यानंतर प्रशासकीय भाषेत तहसिलदार यांनी स्पष्ट सांगितले की, नोटीस काय! ते अशा प्रकारे मनमानी करीत असेल तर कारवाईच काय! त्यांची पदे देखील रद्द होऊ एकते. त्यामुळे अधिकच आनंद होत त्यांना नोटीस बजाविण्याचे ठरले गेले. अर्थात एक कोविड योद्ध म्हणून सरपंच त्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जेव्हा कोविडने थैमान घेतले होते तेव्हा फक्त एक संशयीत महिला रस्त्याने गेली तर चक्क महामार्गाचे शुद्धीकरण केले होते. तर त्यांच्या यशाचे फलित म्हणजे अजूनाही राजुरला एकही स्थानिक व्यक्ती कोरोनाबाधित नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हटल्यानंतर सोशल मीडियावर रहाकाळ माजले, उई सपोर्ट राजूर ग्रामपंचायत असे सिम्बॉल प्रत्येक गृपवर झळकू लागले. त्यानंतर मात्र, माजी आमदार यांनी शांततेची भुमिका घेतली नाही. त्यांनी सरकारसह आमदारांवर सडकून टिका केली. एक प्रकारचे जशास तसे उत्तर देत त्यांनी आरेरावी आणि कारवाईची भाषा खपून घेतली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले.
त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, ज्यांनी कोरोनाशी लढार्ई देत असताना आपल्या जीवाची काळजी केली नाही. त्यांना राजकीय अकसापोटी दमबाजी करणे, कारवाईची भाषा करणे हे आता खपवून घेतले जाणार नाही. देशात, राज्यात आणि प्रत्येक गावात सरपंचांना कोणतेही संरक्षण नसताने त्यांनी मोठ्या शिताफीने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. जर स्वत:च्या गावाचे भले आणि कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी कोणी स्वयंप्रेरणेने संयुक्तीक निर्णय घेत असेल तर राजकीय वर्चस्व गाजविण्यासाठी अशा प्रकारची दमदाटी होत असेल तर ती का खपवून घ्यायची? त्यामुळे, अशा हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही मुख्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचे माजी आमदार यांनी माध्यमांना सांगितले आहे.
दरम्यान असे बोलले जाते की, राज्यात जसे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तेव्हापासून तडजोड, जागावाटप, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खाते, विधानपरिषद, नाराजीनाट्य आणि कोरोना यामुळे साडेसाती लागली आहे. त्यामुळे, सरकार फार उताविळ झाले आहे. कोणाला काही करता येईना, कोठे ठेके घेता येईना, कोणाच्या बदल्या करता येईना, कोणती पदे नियुक्त करता येईना, मंजुर्या देता येईना त्यामुळे प्रत्येकात फार मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. त्यातल्या त्यात भाजपचे राज्यात 104 आणि मित्रपक्ष असे 120 पर्यंत आमदार आहेत, त्यामुळे ते सरकारला फार धारेवर धरत आहेत. त्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असणार्या अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी भाजपत प्रवेश केल्याने नव्या आमदारांच्या हाती काहीच नाही. त्यामुळे, त्यांना स्थानिक स्थैर उभे करताना फार अॅक्टीव्ह रहावे लागणार आहे. हेच उदाहारण म्हणून की काय! अकोल्यात त्याची प्रचिती येऊ लागली आहे. आता येणार्या काळात हा आजी माजी फार रौद्र होत जाणार आहे. कारण, येणारा काळ कोविड नंतर सगळा निवडणुकांचा असणार आहे. सध्या फक्त वेट अॅण्ड वॉच..!
दरम्यान अकोले शहराच्या लगत एक रुग्ण मिळून आला आहे. मात्र, त्याचा वावर शहरात होता. त्यामुळे आता राजूरनंतर अकोल्यात देखील बंदचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे राजुरमध्ये भाजप राज आहे तर अकोल्यात पहिला पुढाकार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येथे आता काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थिती येथे आता राजकारण नव्हे तर सुरक्षाचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कदाचित अकोले तीन दिवस बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, याला कोणाताही प्रशासकीय आधार असणार नाही. तर हा बंद स्वयंस्पर्तीने बंद करण्याचे ठरु शकते. त्यामुळे, एकीकडे समाजकारण तर दुसरीकडे राजकारण अशा पद्धतीने अकोल्यात राजकीय वारे वाहताने दिसत आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 62 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 560 लेखांचे 62 लाख वाचक) ============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------