अबब! शहरात दिड लाखांचे गाडीभर मांस पकडले.! गुन्हा दाखल, एक अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जणावरांचे 750 किलो पेक्षा जास्त मांस संगमनेर पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई शुक्रवार दि. 26 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास केली. यात चक्क दिड लाख रुपयांचे मांस ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी मोहम्मद मँहायुद्दीन शहाजाद (रा. मदिनानगर, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री एक वाहन शहरातून गोवंश मांस घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली होती. त्यांनी मदिनानगर परिसरात जमजम कॉलनी येथे पोलीस पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी संबंधित ठिकाणी एक संशयीत गाडी आली असता त्याची चौकशी करण्यासाठी तिला थांबविले. वानाची तपासणी केली असता ती संपुर्ण मटनाने भरलेली होती. त्यामुळे माळी यांनी पहिले वाहन ताब्यात घेतले आणि आरोपीस देखील ताब्यात घेत वाहन पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान वाहनातील मांसाबाबत चौकशी केली असता ते कोठून आणले, कोठे चालविले होते याची माहिती त्याने प्रथमत: पोलिसांना दिली नाही. मात्र, वाहनात एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तर 2 लाख रुपये किमतीचा एम. एच 43 एचडी 375 हा टेम्पो जप्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मद मँहायुद्दीन शहाजाद याच्यासह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यास अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा साईनाथ भानुदास तळेकर यांच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आरवडे करीत आहेत.
संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरांची हत्या केली जाते. याबाबत अनेकांनी आजवर आवाज उठविला आहे. मात्र, हे कत्तलखाने बंद होण्याची कोणतीही चिन्ह नाही. गेल्या आडवड्यात तालुक्यात चार मोठ्या कारवाया झाल्या असून शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, तालुक्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील आणि शहराचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दोन कारवाया केल्या असून यात 15 जणावरांची मुक्तता केली असून आज दिड लाख रुपयांचे मांस जप्त केले आहे. त्यामुळे, शहर खुले झाले काय तोच मटनाच्या गाड्या राज्यात निर्यात होऊ लागल्या आहेत.
खरंतर यांना वलय कोणाचे आहे. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, कत्तलखाण्यांना पाठीशी घालणार्यांचीच कातडी जनावरांची झाली असून कोणी कितीही लिहा, कोणी काहीही म्हणा, कोणी काहीही आरोप करा, यांना काहीच फरक पडत नाही. फक्त वेळच्या वेळी ठरलेला अर्थपुर्ण व्यवहार पुर्ण करा. त्यांना या पलिकडे काही घेणेदेणे नाही. प्रशासनाच्या या मुगगिळी धोरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून नागरिकांनी शहरातील कत्तलखाने बंद करण्याची विनंती केली आहे.