डिग्रस येथे दोन रुग्ण, क्वारंटाईनच्या काळातील आल्या पार्ट्या नडल्या! अखरे संगमनेरात कोरोनाचे अर्धशतक पुर्ण!
सार्वभौम (संगमनेर) -
संगमनेर तालुक्यात गेल्या तीन दिवसात 16 रुग्ण सापडल्यानंतर चौथ्या दिवशी ही डिग्रस येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यात डीग्रस येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 45 व 21 वर्षीय महिलांना कोरोनाने ग्रासले आहे. सद्या संगमनेर मध्ये एकुण पाच व्यक्ती कोरोना बाधीत होऊन मयत झाले असून आत्तापर्यंत 50 लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे. प्रशासन कसोनीशी काम करीत असताना देखील कोरोनाचा आलेख हा कमी व्हायला तयार नाही.
दरम्यान, संगमनेर मधील ग्रामीण भागात मोठ्या शहरांमधून येणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या झपाट्याने होऊ लागला आहे. मुंबईहून आलेल्या 52 वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या या दोन महिलांना कोरोनाने ग्रासले आहे अशी प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.हे सत्र गेल्या आठ दिवसांपासून चालु असल्याने संगमनेरात एका पाठोपाठ एक कोरोनाचे धक्के बसत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोके दुखी वाढत आहे. ही आकडेवारी संगमनेर प्रशासनाच्या चिंतेत नक्कीच भर पडणारी आहे.
दरम्यान डिग्रस ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष सुंपूर्ण गावावर बेतु शकते.!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील डिग्रस गाव हे 3 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे प्रतिष्ठीत घराण्याचे राजकारण असल्याने कुणीही साधी तक्रार करण्याची हिंम्मत कोणी करत नाही. केलीच तर तो संपूर्ण आयुष्यभर तो बरबाद होतो अशी अख्यायिका गावातील जुन्या जाणत्या नागरिकांकडून ऐकण्यास मिळते. त्यामुळे येथे जुणे जाणते नेहमीच तरुणांना मार्गदर्शन करतात. की, या गावगाड्याच्या नादी लागु नका. जो लागला तो संपला. मग कशाला कोणी गावगाड्याला अर्थात प्रस्तापित राजकारण्यांना डवचाळेल? त्यामुळे तरुण मुले शिकली सवरली आता त्यांना पण कळु लागले अ्राहे. आपले गाव पण आता सुधारले पाहिजे. गावचा विकास झाला पाहिजे, म्हणून तळमळीने पुढे येऊ लागले आहेत. अन्यायाविरुद्ध बोलु लागले आहेत. पंरतु त्याचे प्रायश्चित्त आडमुठ्या मार्गाने वेळोवेळी मिळू लागले आहे. म्हणून कोणी सहजासहजी समाजकारण, राजकारणाचे उद्योग करण्यास पुढे येत नाही. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आज संपूर्ण डिग्रस गाव कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली आहे. सुखा-समाधानाने राहत असलेले डिग्रस गाव काही क्षणात कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व गावाची घडी विस्कळीत झाली आहे. मुंबई, पुणे, मालेगावचा लॉकडाऊन शिथिल होताच लोक गावाकडे येऊ लागले, काहीनी रितसर परवानगी मिळविले आणि गावात आले तर काही उडवाउडवीची उत्तरे देऊन ते गावात दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या सहकार्याने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले, जवळपास त्यांची 41 संख्या होती. त्यात लहान मुले, महिला, पुरुष हे देखील होते. मालेगावहुन आलेले एक दाम्पत्य, मुंबईहुन आलेले सहा जणांचे कुटुंब, पुणे, चाकणहुन आलेली काही सिंगल युवक तर काही कुटुंब होती. त्यात मुंबईहुन आलेल्या सहा व्यक्ती पैकी एक 52 वर्षीय महिला आजारी असल्याची लक्षणे दिसून येत होती विलगीकरण कक्षातील लोकांनी तशी तक्रार सुद्धा केली होती. सदर महिलेला खोकला, सर्दी आहे पंरतु ती तक्रार पिण्याचे पाणी बदलल्याने होत आहे. अशी समजूत काढण्यात आली. अशी गावात दबक्या आवाजातील चर्चा होती. मात्र ती देखील दबाव आणून बंद केली गेली.
तेथील काही लोकप्रतिनिधी नेहमीच तिथे फिरकत असे, प्रवेशद्वाराच्या आत जाऊन गप्पा गोष्टी करत असे, यांना कुणी हटकविण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, यातील काही लोक रात्री उशिरापर्यंत तेथे ओल्या पार्ट्या करीत असे. मतांसाठी म्हणा की नातेगोते संभाळण्याचा फांडा म्हणा. पण यांचे चोचले पुरविले जात आहे. याचा खर्च मात्र मुंबईकरांचा असतो. ही सर्व हातमिळविणी म्हणजे सगळा भोंगळा कारभार. यामुळेच तर कॉरंटाईनचा चौदा दिवसाचा कार्यकाळ अवघ्या सात दिवसात आटोपला आणी थातूर मातूर तपासणी करुन त्यांना सोडून देण्यात आले.काहींचे घर मळ्यात असल्याने मुंबईचे पाहुणे आले म्हणून शेजारी पाझारी गप्पा गोष्टीला एकत्र येऊ लागले.
52 वर्षीय महिलेला सर्दी खोकला, तापाचा त्रास वाढत आहेत म्हणून शेजारीच असलेल्या आश्वी येथील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी गेले असता त्यांना घुलेवाडी ग्रामीण हाँस्पिटल मधून थेट अहमदनगर ला रवानगी करण्यात आली आणी काही तासात रिपोर्ट पाँझिटिव्ह निघाले.
आता डिग्रस ग्रामस्थानी असा प्रश्न उपस्थित राहिला आहे की हे मुंबई कनेक्शन गावची वाट लावील की सावरतील? कॉरंटाईन काळात काही मिडिया, पत्रकार बांधवांनी हे सत्य परिस्थिती समोर आणली होती पंरतु तोही आवाज दाबला गेला म्हणून ही वेळ डिग्रसकरांवर आली आहे.
पिण्याच्या पाण्याची टाकीजवळ सर्व जण एकत्र पाणी पिण्यासाठी येत असे, संडास, बाथरूम 41 लोकामध्ये एकच असायचे, कुठल्याही प्रकारची निर्जंतुकीकरण फवारणी नाही, सॅनेटायझर नाही अशा प्रकारच्या दुर्लक्षित, भोंगळ कारभार डिग्रसकरांच्या जिवावर बेतु शकतो काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कोतवाल, शिपाई, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका हे कर्मचारी आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होते परंतु कुंपनच शेत खात होतेे म्हणून ही वेळ गावावर आली आहे. असे गावकर्यांचे मत आहे. त्यामुळे अजुनाही वेळ गेलेली नाही. त्यामुळे, गावातील सुज्ञ नागरिकांना सामाजिक शहणपण येवो हीच सामान्य लोकांची इच्छा आहे.