संगमनेरात भर दिवसा महसुलने पोलिसास काठीने मारले, ते ही वर्दीवर! तो बिचारा एकटा पडला! पण..


सार्वभौम (संगमनेर) :
                           राज्यात एकीकडे पोलीस कोरोना होऊन मृत्युमूखी पडत आहे. तर अडिच हजार पोलिसांचे प्राण पणाला लागले आहे. एकीकडे गृहमंत्री पोलिसांना सांगत आहे काठ्यांना तेल लावून ठेवा, इतकेच काय फक्त प्रेम पत्रासारखे गोडगोड बोलुन कागदाहून संवाद साधतात तर दुसरीकडे महसूल खात्याचाच पोलिसांवर हल्ला होऊ लागला आहे. ते ही महसूल मंत्र्याच्या तालुक्यात. ही किती मोठा विरोधाभास आहे. कारण, संगमनेर शहरासारख्या ठिकाणी महसुलच्या गाठीवर ड्रायव्हर असणारे व्यक्ती, कोतवाली आणि तलाठ्या सारखा व्यक्ती पोलीसावर हात उचलु शकतो. हे घडो जाणे केवळ संगमनेरात. त्यामुळे येथे खरोखर पोलीस खात्याचा धाक राहिला नाही की, महसूल खाते स्वत:ला बाहुबली समजू लागले आहेत. हेच काळेनासा झाले आहे. या सर्वांमध्ये दुर्दैव असे की हा पोलीस कर्मचारी मुख्यालयातील पाहुणा असल्यामुळे त्याचे कोणी परसेना झाले आहे. त्यामुळे, स्वत:ला कायद्याचे पंडीत समजणारे व्यक्तीमत्व देखील खात्याच्या पाठीशी नाहीत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षापुर्वी तत्कालिन पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश हे व्यक्तमत्व जिल्ह्यात होऊन गेले. एकदा श्रीरामपूर येथे काही गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्यावेळी स्वत: साहेबांनी रस्त्यावर उतरुन भर चौकात त्यांना अगदी चित्रपटाला देखील लाजवेल असा धडा शिकविला होता, त्यांच्यानंतर लखमी गौतम यांच्या काळात पिन्या कापसे व बापु विघ्ने या गुन्हेगारांनी दिपक कोलते या पोलिसाचा जीव घेतला होता. त्यावेळी त्यांनी फार मोठी खंत व्यक्त केली होती. माझी काळात माझ्या वर्दीवर कोणी हात उचललेला मी खपवून घेणार नाही. असे म्हणत त्यांनी एका आमदाराला कार्यालयाच्या बाहेर काढले होते. त्यांच्या पाठोपाठ रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांच्या उन्नतीसाठी प्रचंड मेहनत घेतली, एकवेळी कायदा व सुव्यवस्था बिघडली तरी चालेल. मात्र, पोलिसांच्या घरी चांगली दिवाळी झाली पाहिजे असे अनेक खाकीप्रेमी अधिकारी होऊन गेले. तसेच पोलीस उपाधिक्षक नगर शहरात बजरंग बनसोडे यांनी देखील कर्मचार्‍यांवर हात उचलला म्हणून स्वत: खमकी भुमिका घेत क्लेला ब्रुस मैदानावर त्यांनी खाकीसाठी जंग छेडली होती.
                 
येथे तर भर दिवसा पोलिसांवर लाठ्या उगारू लागले आहेत. मात्र, वर्दीतील एकही अधिकारी जागा व्हायला तयार नाही. खरंतर बंदोबस्तासाठी मुख्यालयातून आलेल्या कर्मचार्‍यास मारहाण होणे ही स्थानिक पोलिसांसाठी शर्मेची बाब आहे. त्याला बळ देण्याऐवजी त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे? म्हणजे जे लोकांना न्याय देतो, त्याच्यावरच आज अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. जेव्हा हा पोलीस कर्मचारी महसूल अधिकार्‍यांकडे जातो तेव्हा ते थेट वर हात करतात, म्हणजे अर्थातच त्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर पोलीस खात्याने मात्र, उलट त्यास गप्प बसण्यास भाग पाडल्याचे दिसून येते.
या प्रकारामुळे एकतर महसूल आणि पोलीस यांच्यातील अंतर्गत घुसमट बाहेर पडली आहे. जर पोलिस खात्यावर मार खायची वेळी आली आणि त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही तर त्यांचे मनोबल कसे वाढणार आहे? त्यामुळे, हो जो प्रकार झाला आहे. त्याची माहिती मुख्यालयात आरपीआयला कळविण्यात आली आहे. मुख्यालयातील प्रत्येकाची जबाबदरी आरपीआची आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: एसपी साहेबांकडे तक्रार करुन संबंधित पोलीस कर्मचार्‍याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. अन्यथा आज पोलीस कोविडशी लढून खचले आहेत. त्यांचे कौटुंबिक अस्थिरता वाढली आहे. अशाच असे मारहाणीचे प्रकार गप्प सहन करायचे असेल तर खात्याच्या नोकर्‍या करायच्या की नाही? असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहू शकतो. त्यामुळे, पोलिस अधिक्षकांकडून काही नको.! केवळ भिऊ नको, मी तुझ्या पाठिशी आहे. असे म्हणून लढ म्हणावं इतकीच मापक अपेक्षा कर्मचार्‍यांची आहे.
या प्रकरणात नाईट ड्युटी करूण आलेला पोलीस घरी जात असताना एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबला आणि दरम्यान अर्थपुर्ण तडजोडीत माहिर असणार्‍यांच्या तावडीत सापडला. पोलीस साहेब पाणी पित असताना यांनी त्यास दांडा मारुन दंबगशाही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी खात्यावरचा कड काढला की अनावधानाने मारहाण केली याचा शोध सुरू आहे. असे असेल तरी पोलीस वर्दीवर होतेे. जरी चुकून मारले असावे असे आपण गृहीत धरुन तरी सलोख्याने प्रश्न मिटत होता. तू मास्क का घालत नाही, असे म्हणत फार आर्वच्या भाषेत त्या कर्मचार्‍यास वागणूक देण्यात आली. अर्थात महसूल पोलीस आणि पोलीस महसूल कर्मचारी असल्याचे तेथे पहायला मिळाले. हे सर्व ठिक असले तरी या महसूल कर्मचार्‍यांना मारहण्याचा हक्क कोणी दिला? यांच्या गस्तीच्या अ‍ॅर्डर आहेत. का? या कोतवालांच्या सोबत सक्षम अधिकारी कोण होता? यांना दिलेली महसूल विभागची गाडी गैर मार्गाना वापरली का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले तर कायद्याच्या दृष्टीने ते फार जड जाईल. मात्र, झाकली मुठ सव्वा लाखाची. कारण, संगमनेर म्हणचे येथे सर्व झाकाझाकीला माहिर आहेत. मात्र, जसे लॉकडाऊन सुरू झाले आहे. तेव्हापासून जीतके पोलिसांनी जनतेला मारले नसेल, तितके जास्त महसुलचे कर्मचारी व काही अधिकार्‍यांनी बेछूट हात घुवून घेतले आहे. अर्थात महसुलमंत्र्यांच्या तालुक्यात महसूल शेरच असणार! मात्र, जनतेचे सोडा! ज्या पोलीस खात्याने तुमच्या खांद्याला खांदा लावून आजवर काम केले. त्यांना तरी सोडा. असेच सुर जनतेच्या तोंडून निघू लागले आहेत.
भाग 1 क्रमश: