संगमनेरात पोलीस कर्मचार्यास कोरोनाची बाध! नाशिकला अहवाल प्राप्त, मंगळापुरातून संशयीत नगरला...
सार्वभौम (संगमनेर) : -
संगमनेर तालुक्यातील मंगळपूर येथील एका पोलीस कर्मचार्यास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हा कर्मचारी सद्या नाशिक पोलीस दलात कायर्र्रत आहे. हे गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांच्या राहत्या घरी (मंगळापूर) आले होते. मात्र, त्याना काही सिमटन्स आढळून येऊ लागल्यामुळे त्याला नाशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (दि.2) सायंकाळी उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समजते आहे. सद्या राज्यात 2 हजार 211 पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची बाधा होऊ झाली आहे. यात नाशिक आणि मुंबईच्या पोलिसांचा आकडा फार मोठा आहे. पोलिसांकडून संरक्षण करुन घेतले जाते मात्र, त्यांना संरक्षण देण्यासाठी शासन सक्षम नाही की काय! असा प्रश्न पडतो आहे. आता राज्यात 25 पोलिसांचा मृत्यू झाला असून 1 हजार 772 कर्मचारी ती 249 पोलीस अधिकार्यांना बाधा झाली आहे. त्यामुळे हे खाकीच जगणे फार कठीण होऊन बसले आहे.
आज मितीस संगमनेर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात 16 रुग्ण सापडले आहे. मागील दोन दिवसात दिवसाला सात रुग्ण सापडल्याने ही साडेसाती अधिकच वाढते की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोनाने जगात थैमान घातले असताना महाराष्ट्रात त्याचा संसर्ग पसरला आणि खेडोपाडी पोहचला. स्थानिक प्रशासन या महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज झाला. संगमनेर तालुक्यात प्रथमतः परदेशी वारी केलेल्या 65 जणांवर प्रशासनाची करडी नजर पडली. व जिल्हा सीमा उल्लंघन केलेले 4 हजार 736 संशयीत नागरिकांना संगमनेर प्रशासनाने होमक्वारंटाईनचे शिक्के देऊन 14 दिवस बंदिस्त केले. त्यांची वेळोवेळी प्रशासनाने तपासणी देखील केली होती. परंतु जमातीच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना संगमनेर मध्ये प्रथम लागण झाली. हे दोन रुग्ण आढळल्याचे समजताच प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी अगदी कठोर निर्णय घेतले. आणि संगमनेर शहर तीन दिवस पुर्णतः बंद करून विनाकारण बाहेर फेरफटका मारणार्यांनावर 188 ची कारवाई देखील केली. तरी देखील कोरोनाचे प्रसरण संगमनेरमध्ये झपाट्याने वाढतच गेले. शहरासह ग्रामीण भागातही दोनाचे चार रुग्ण आढळुन येत राहीले.
आज तागायत संपूर्ण तालुक्यात कोरोना बाधित 46 रुग्ण आहे. त्यापैकी शहरात 24, तर धांदरफळ बु 8, निमोण 7, घुलेवाडी 1, केळेवाडी 1, नींबाळे 1, आश्वी बु 1, कौठेकमळेश्वर 1, डिग्रस 1, मंगळापूर 1, खळी 1 असे एकुण ग्रामीण भागात 24 रुग्ण आढळून आले आहे. पण, यापैकी संगमनेर तालुक्यात 34 मुळ रहिवासी असून तालुक्यातील अनिवासी 12 नागरिक कोरोन बाधित आढळून आले आहे. तालुक्यात एकुण 48 रुग्ण असुन त्यापैकी 22 रुग्ण ठणठणीत झाले आहे. व 19 रुग्णांवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पाच कोरोनाबधितांचा मृत्यू देखील झाला आहे.
दि. 25 मे पर्यंत संगमनेर कडेकोट लॉकडाऊन राहिले. तर 26 मे रोजी संगमनेर प्रशासनाने शिथिलता दिली. त्यानंतर नागरिक घराबाहेर पडू लागले. याचाच फायदा उचलून दुसर्या जिल्ह्यातील नागरिकांनी सीमा उल्लंघन करून आपल्या रहिवाशी ठिकाणी प्रवेश मिळवला परंतु त्यांनी तालुक्यात कोरोनाचा वानवळा आणला व शहरासह ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढवला. हे सत्र गेल्या पाच दिवसांपासून चालु असल्याने संगमनेरात एका पाठोपाठ एक कोरोनाचे धक्के बसले. व प्रशासनाची डोके दुखी वाढवली. जिल्ह्यात एकुण परिस्थितीचा आढावा घेतला तर एकट्या संगमनेर तालुक्यात 30टक्के रुग्णांनची संख्या आहे. व मृत्यू दरातही संगमनेर जिल्ह्यात अव्वल स्थानी आहे. त्यामुळे संगमनेर प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
सुशांत पावसे
गेल्या दहा महिन्यापुर्वी सार्वभौम हे पोर्टत सुरू करण्यात आले होते. रोज सकाळ आणि संध्याकाळ असे दोन लेख यावर टाकले जात होते. त्या अभ्यासपुर्ण लेखाला वाचकांनी इतके डोक्यावर घेतले की, अवघ्या 464 लेख, बातम्या आणि विश्लेषण यांच्या जोरावर 50 लाख (अर्धा कोटी) वाचक झाले. त्यामुळे हे पर्वताऐवढे यश माझ्या एकट्याचे मुळीच नाही. यासाठी प्रतिनिधी आणि सार्वभौमच्या बातम्या शेअर करणारे ज्ञात अज्ञात व्यक्ती यांचे आहे. त्यामुळे त्यांची उतराई म्हणून आज अर्धा कोटी वाचक झाल्यामुळे मी आज दि.1 जून रोजी 12 वे रक्तदान करुन आपले आभार मानले आहे. आपण सार्वभौमचे माय-बाप आहेत. आमच्याकडून शब्द अपशब्द गेला किंवा अनावधानाने चुका झाल्या तर मोठ्या मनाने पदरात घ्या. आम्ही तुमचे सेवक आहोत, पण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविताना जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही. ना कोणाला शरण जाऊ! या यशामुळेच लवकरच आपले रोखठोक सार्वभौम हे सायं दैनिक वृत्तपत्र आपल्या भेटीस येत आहे. त्याला देखील तुम्ही इतकाच प्रतिसाद द्याल अशी मला खात्री आहे.
आपला मित्र
सागर शिंदे