शेवटच्या श्वासापर्यंत मी मुलाच्या न्यायसाठी लढेल! पालकाचे मयत मुलास अभिवचन!
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील सुगाव बु येथे एक अपघात झाला, दुर्दैवाना त्यात अवघ्या अडिच वर्षाचे चिमुरडा साई त्यात मयत झाला. मात्र, नको त्या व्यक्तींमुळे त्याला राजकीय रंग चढला आणि वाहन व चालकाचा बचाव करण्यासाठी आरोपींच्या सहकार्यांनी झाकाझाक सुरू केली. एकीकडे सगळे कुटूंब बाळ मयत झाल्याच्या दु:खाला उराशी कवटाळून बसलेले असतांना काही महाशय दुसर्या दिवशी तेथे जातात आणि तडजोडीच्या भाषा करतात. हे कोठेतरी न रुचनारे आहे. त्यामुळे, बालकाचे वडील सतिष शिंदे चांगलेच खवळले आणि त्यांनी आलेल्या व्यक्तींचा चांगलाच पाहुनचार घेतला. बालक गेले आता पैशाचे बोला म्हणार्यांची चांगलीच खैरात काढली. तुमच्या पैशाने काय लेकरु परत मिळणार आहे का? असा सवाल करत आता भेट थेट न्यायालयात असे म्हणत मध्यस्तींना त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. त्यामुळे, अशा खचलेल्या कुटूंबाच्या आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण, त्यांना धनदौलतीची नाही तर आधाराची गरज आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुगाव फाट्याच्या जवळच एका अपघात झाला आणि ती गाडी (एम.एच 17 बी वाय 5647) नेमकी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्याच्या पाहुण्याची निघाली. आता यात एका इवलेसे बाळ जीवाने गेले. ते देखील आपल्या सहकार्याचे कारण, सतिष शिंदे हा देखील एक कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथे जमा झाले. त्यांनी मुलाच्या वडीलांना चांगला धिर दिला. मात्र, त्यात एक पदाधिकारी फार सक्रिय होता. तो का? याचे उत्तर मिळाले असता जे काही अन्य पदाधिकारी तेथे आले होते. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. कारण, आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याच्या भुमिकेत असतांना काही पदाधिकारी आरोपींना मदत करताना दिसून आले. त्यामुळे खरोखर पक्ष आणि कार्यकर्ता यांच्याविषयी आत्मियता असल्यामुळे ते चालते झाले. मात्र, जाताना त्यांनी एका व्यक्तीच्या व्हॉटसॅपवर पक्षाची भुमिका मांडली. की, काहीही झाले तरी आम्ही सतिषच्या पाठीशी उभे आहोत. त्यानंतर राष्ट्रवादीचे जाणकार एकही व्यक्ती पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आला नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या उपस्थितीत पदाधिकार्याने एका लोकप्रतिनिधीला फोन लावत तो पोलीस अधिकार्यांकडे दिला. त्यांचे पोलीस ठाण्यात संभाषण झाले आणि तेथून पुढे सगळ्या हलचाली सुरू झाल्या.
दरम्यान एकमेकांना मदत करणे, संकटाच्या काळी एकमेकांच्या दिमतीला धावून येणे सहाजिक आहे. मात्र, ज्या संतिश शिंदे याने विधानसभेच्या वेळी रात्र-रात्र जागून प्रचार केला, शरद पवार आणि राष्ट्रवादीचे झेंडा हातात घेऊन नको नको त्यांच्याशी दुष्मणी करीत मतांसाठी कष्ट वाहिलेे. त्या व्यक्तीच्या मुलाला एखादा सहज उडवून जातो आणि त्या आरोपीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी पाठीशी घालतात. हे सदसद विवेक बुद्धीला पटते का? हे सर्व ठिक आहे. त्याचे संत्वन करण्यासाठी या व्यक्तीने जाणे अपेक्षित असतांना दुसर्या दिवशी हे लोक तडजोडीसाठी याला-त्याला फोन करतात. केवळ आठ पंधरा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर माणूस दु:खातून सावरत असतो. त्यांनतर त्याचा राग शांत होतो. तेव्हा किमाण दोन शब्द बोलण्याची मानसिकता होते. मात्र, यांनीतर घे घास पी पाणी करुन सोडले.खरंतर जेव्हा घटना घडली तेव्हापासून साईचे कुटूंब ठाम होतेे. की, आमचे लेकरु गेले त्या आरोपीस अटक करा, शिक्षा होईल असे पहा. त्याशिवाय मृतदेहाला आम्ही हात लावणार नाही. मात्र, गावकर्यांनी त्यांना समजून सांगितले. त्यानंतर बाळावर अंत्यसंस्कार झाले. म्हणजे इतके ते कुटूंब दु:खात आणि आक्रमक होते. मात्र, त्यांच्या पश्चात वेगळेच काहूर माजले होते. हा प्रकार साईचे वडील आणि चुलते यांना समजला असता त्यांना तडजोड करु पाहणार्यांच्या चांगल्याच कान उघडण्या केल्या. जे पैशाची भाषा करत होते. त्यांनी मुलगा आणून दाखवा असे म्हणत अनेकांची बोलती बंद केली. त्यामुळे, आता साईच्या न्यायी हक्कासाठी त्याच्या कुटूंबाने न्यायालयीन लढा उभा केला आहे. त्या कुटूंबाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे. असे मत सामाजिक संघटना आणि सुज्ञ गावकर्यांनी रोखठोख सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले आहे.
खालील पोष्ट या राष्ट्ररवादी कार्यकर्त्यांनी
लिहिलेल्या आहेत.