डॉ. अमोल कर्पेंच्या कारवाईत कागदी घोड्यांची शर्यत! शल्यचिकीत्सक व नगरपालिकेच्या से कडे लक्ष!


सार्वभौम (संगमनेर) :
                           संगमनेर शहरात कापड व्यापारी आणि डॉक्टर यांच्यातील वैयक्तीक युद्धाचे रुपांतर आता अस्मितेवर जाऊन पोहचले आहे. दोन्ही व्यक्तींकडे काळ्या कोटातून कोर्टात जाण्यासाठी लागणारे सल्ले कमी नाहीत. त्यामुळे, हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. यात प्रशासनाची चांगलीच गोची होताना दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे भावना, प्रेम, समझदारी यांच्याकडे फारसे महत्व नसते तर कागदी घोडे जसे नाचतील तितकी ताथाथैया प्रशासनाला करावी लागते. या प्रकरणात देखील असेच होऊन बसले आहे. आता डॉ. कर्पे यांनी दिलेला अर्ज आणि त्यावर होणारी कारवाई ही वाटते तितकी सोपी नाही. कारण, क्लिनिक परवाणा, डॉक्टरकी व्यवसायाची परवाणगी आणि बरेच काही सिद्ध करण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. जर यात एक जरी चुकीचा निर्णय झाला तर पोलीस बाराच्या भावात जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे यात केवळ कारवाईचा काला करुन योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, यात नगरपालिका आणि जिल्हा शल्य चिकीत्सक यांची भुमिका फार महत्वाची ठरणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. अमोल कर्पे यांच्या क्लिनिकवर हल्ला करण्याचा प्रयत्न करुन शिविगाळ दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला. आता इथपर्यंत पोलिसांचा शोध पुर्ण झाला आहे. हा प्रकार वास्तव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात गुन्हा दाखल होणार यात तिळमात्र शंका नाही. फक्त त्यांना डॉक्टर म्हणून मान्यता असने, जेथे हल्ला करण्याचा प्रयत्न झाले तेथील क्लिनिकला मान्यता असणे  या दोन गोष्टींचा शोध सद्या शिताफीने सुरू आहे. दै. रोखठोक सार्वभौमने पहिली मालिका लावल्यानंतर या प्रकरणाचे पुन्हा उत्खनन झाले आणि तपास यंत्रणा द्वितगतीने धावली. यात काल 6 जून रोजी चौघांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यानंतर एक गुन्हा निष्पत्ती झाली आहे, फक्त गृहसचिव भारत सरकार अजय भल्ला यांनी काढलेल्या आदेशान्वये कोविड-19 च्या दरम्यान डॉक्टरांना जे आयपीसीच्या कलमाखाली संरक्षण देण्यात आले आहे. त्यास डॉ. कर्पे पात्र आहेत की नाही. हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. त्यासाठी पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी अगदी कायद्यावर बोट ठेवले आहे. कारण, या दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ नाही तर बळी जाऊ शकतो हे खात्याला चांगलेच माहित आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातून नगरपालिका आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्रव्यावहार केला आहे. जर त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आला तर यात नक्कीच 2005 ते  2020 च्या निर्धारीत तरतुदीनुसार गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अन्यथा या वादाचा चेंडू थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
अर्थात या दोन्ही गटाचे वाद पारंपारीक झाले आहेत. मात्र, आता त्याला अस्मितेचे रुप आले आहे. तसेतर बहुतांशी या प्रकरणातून न्युटरल असणार्‍या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यात डॉ. कर्पे यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आहे. कारण, प्रत्येक रुग्णालयाच्या कुंडल्या प्रशासनाकडे असून देखील त्यांच्यावर कारवाई न होता. एकट्या कर्पे यांच्यावरच का? हा प्रांजळ सवाल नागरिकांचा आहे. मात्र, नगरपालिकेची ही दुटप्पी भुमिका आणि एकहाती कारभार याला अपिल नाही. तसेही येथे आजकाल तुकाराम मुंडे यांच्यासारखे प्रशासक राहिलेत तरी कोठे? हो ला हो म्हणायचे आणि नाही ला नाही. त्यामुळे नोकरी टिकली बास झाली. अन्यथा मुंडे साहेबांची एकाच वर्षात 12 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाल्याचा इतिहास आहे. मात्र, संगमनेरात एकदा अधिकारी आला की तो तीन वर्षे काढून एक वर्षे एक्सटेंशनसाठी बंगल्याच्या समोर घुटमळत असतो. हेच वास्तव सजग नागरिक बोलुन दाखवितात. त्यामुळे येथे अतिक्रमण, कत्तलखाणे, अवैद्य व्यवसाय, वाळुतस्करीवर नियंत्रण, जमीनतस्करी आणि क्लिनिकचे झालेले हॉस्पिटल यांच्यावर कारवाई होईल अशी आशा देखील कोणी बाळगू नये. खरंतर डॉक्टरांची रोजीरोटी चालावी म्हणून तर तेथे शहरात लोणी सारखा एकही मोठा सरकारी दवाखाना होऊ शकला नाही. असे फार उघड-उघड गणिते आहेत. मात्र, या सगळ्यांकडे काना डोळा होत असतो. केवळ प्रबळ विरोधक नसल्यामुळे....
 आता डॉ. अमोल कर्पे यांच्यावर पुर्वी कारवाई झालेली आहे. हे जगजाहीर आहे. मात्र, तरी देखील त्यांनी कोविडच्या काळात सरकारला आणि प्रशासनाला मदतीचा पहिला हात देऊ केला होता. इतकेच काय! त्यानी कोरोनाचा रुग्ण तपासला तेव्हा दोन वेळा क्वारंटाईन व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या दवाखाण्यास तहसिलदार यांनी शासकीय प्रसिद्ध पत्रकानुसार शुद्धपत्र दिली. इतकेच काय ? या हल्ला अर्जाप्रकरणी स्वत: प्रांताधिकार्‍यांनी दोनवेळा पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करुन कारवाई करुन प्रत मिळावी असे नमुद केला आहे. या पलिकडे जिल्हाधिकारी ते पोलीस अधिक्षक यांच्यातही पत्रव्यवहार होऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून कारवाई संदर्भात सुचना करण्यात आलेल्या आहेत. अर्थात हे आदेश देणे जितके सोपे आहे तितका तपास सोपा नाही. त्यामुळे यात वेळ लागणे सहाजिक आहे. कारण, संगमनेरात असे अनेक गुन्हे आहेत. ज्यांचे चव जाऊन चोथा उरला आहे. त्यामुळे पोलिसांकडे कायदा व सुव्यवस्थेपलिकडे रिकामी कामे मोठ्या प्रमाणावर येऊ लागाली आहे. पण, कागदी घोडे नाचविण्यापलिकडे त्यांना गत्यंंतर नाही.
सद्या बघुयात डॉ. अमोल कर्पे प्रकरणात पोलीस काय सुवर्णमध्य काढतात. याबाबत कापड व्यापारी यांनी दि.5 जून रोजी त्यांचा खुलासा पोलीस ठाण्यात सादर केला आहे. त्यांची बाजू त्यांनी मांडली. ती सार्वभौमच्या हाती आल्यास ती जनतेसमोर मांडण्याचे काम केले जाईल. तोवर वेट अ‍ॅण्ड वॉच...!
क्रमश: वाचा भाग ३
 - सागर शिंदे