बाळ मेलं आता पैशाचं बोला! राष्ट्रवादीच्या प्रांजळ बुरख्याचा पर्दाफाश!


सार्वभौम (अकोले) : 
                     अकोले तालुक्यातील सुगाव परिसरात एका रुंभोडीच्या पिकअपने अवघ्या अडिच वर्षाच्या बाळाला चिरडून मारले. काही काळ शोककळा पसरली. मात्र, दोन्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असल्यामुळे आता चिमुकला गेल्याचे दु:ख असूनही नेते त्या कुटूंबास अर्थथपुर्ण देवाणघेवाणीत अडकवत बसले आहेत. त्यामुळे बाळ गेलं तर जाऊद्या पैशाचं बोला अशी ताणावाताणवी सुरू असल्याचे दिसता आहे. यात पहिल्यांदा वाहन बदलण्यात आल्याचे बोलले गेले. त्यानंतर आता डायव्हर बदलल्याचे समोर येऊ लागले आहे. केवळ इन्शुरन्स आणि कागदी घोडे नाचविण्यासाठी त्या बालकाच्या न्यायासाठी पक्ष सहकारी कोणी उभे रहायला तयार नाहीत की काय? असा प्रश्न पडला आहे. एकीकडे अन्याय झाला तर त्याचा मरेपर्यंत पाठपुरावा करीत न्याय मागणारे आपण पाहिले आहे. तर दुसरीकडे काल मयत झालेल्या मुलाचा देह शांत होतो कोठे नाहीतर आज बैठका बसू लागल्याचे दिसता आहे. त्यामुळे, भर दिवसा कोणीही बालके उडवा, पैसा फेका आणि प्रकरण मिटवा, असाच पायंडा येत्या काळात रुढ होतो की काय? असा प्रश्न उपस्थिती होऊ लागला आहे. मात्र, मुलाचे पालक न्यायासाठी ठाम असून बाकी लोक त्यांना इतक्या दु:खात एकटे का सोडत नाही. हे समजेनासे झाले आहे. या प्रकारामुळे आता उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

आज सगळ्या राज्याला ज्ञात आहे. असे अशोक लांडे हत्या प्रकरण, केवळ फिर्यादी राऊत यांनी न्यायासाठी उभे आयुष्य खर्ची घातले. प्रचंड मोठा पाठपुरावा करुन कोतकर कुटूंबातील चौघांना जन्मठेपीपर्यंत नेले. काही झाले तरी न्याय हवा, तेथे तडजोड नको. या भावनेने त्यांनी त्यांच्या मित्रास खरा न्याय दिला. तशी न्यायाची भूक आजकाल कोणाकडे दिसत नाही, कलमांचा वापर करुन बडेबडे गुन्हे दाखल करायचे आणि नंतर मोठमोठ्या तडजोडी घडवून आणायच्या. यात काही महिलांपासून तर मुरब्बी तोतया समाजसेवकांपर्यंत कोणी कमी नाही. त्यामुळे, न्यायापेक्षा लोकांना पैसा जास्त प्रिय वाटू लागला आहे की काय! असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र येथे पैसा नको तर न्यायासाठी मुलाचे पालक अडून बसले आहेत.
त्याचे झाले असे की, अगदी कालच एका अडिच वर्षाच्या मुलास एका पिकअप वाहनाने उडवून दिले. त्याने मुलास अनावधानाने उडविले असेल यात शंका नाही. मात्र, त्या वाहन चालकाने जखमी मुलास रुग्णालयात नेणे अनेक्षित होते. काही तरुणांनी त्याचा पाटलाग केला. नंतर त्या बालकास रुग्णालयात नेण्यास तो तयार होऊन पुन्हा माघरी आला. मात्र, स्थानिकांना चुकवत त्याने वाशेर्‍याकडे पळ काढला. जाताजाता या बहाद्दराने एका दुधाच्या गाडीला जोराचा धक्का दिली, एका आयशी वाहनाला कट मारला, अशाच वेळी आणखी एखादे बालक रोडवर असते तर याने त्याचा चुराडा केला नसता का? इतकेच काय? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या मांसल पेशी जाड असतात, त्यामुळे ते वरतून कितीही जखमी वाटत असले तरी त्यांचा जीव गेलेला नसतो. म्हणून तर मोठमोठे अपघात होतात आणि त्यात छोटी-छोटी बालके वाचतात. जेव्हा लातुरला किल्लारित भुकंप झाला तेव्हा तीन दिवस एक बाळ मातीच्या डिगार्‍याखाली रक्ताळलेल्या अवस्थित  जिवंत होते. त्यामुळे, मुलगा मयत झाला हे स्थानिकांना कसे ठरवायचे? त्याच्यावर योग्यवेळी रुग्णालयात उपचार झाले असते तर तो जीवंत राहिला असता.
येथे मात्र असे झाले नाही. पोलिसांशी चर्चा करुन  बडीबडी कलमे अपघातात लावली गेली. त्यासाठी काही समाजसेवकांनी मध्यस्ती केली. त्यानंतर वाहन वेगळे दाखविण्याचा प्रकार करण्यात आला. इतकेच काय? ज्याने उडविले त्याचे नाव प्रथम एफआयआरमध्ये सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी सांगितले तो तपासाचा भाग आहे. नंतर खर्‍या अर्थाने त्यांंचा तपास झाला. की, ज्याच्याकडे योग्य कागदपत्रे असतील तो खरा आरोपी. त्यामुळे, झाकली मुठ सव्वा लाखाची! यात न बोललेलं बरं!
आता तुम्हाला आश्चर्य वाटेल हे सर्व घडले कसे? तर ज्याने हा अपघात केला. तो राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍यांचा पाहूणा आहे. तर जो मयत झाला त्याचे पिताश्री राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते आहे. त्यामुळे प्रथम: असे वाटले होते. की, राष्ट्रवादीचे बहुतांशी पदाधिकारी या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून आले. खरोखर हा पक्ष सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतो. मात्र, वास्तवाला फार उशिरा वाचा फुटली. हे सर्व त्या पदाधिकार्‍याच्या समर्थनार्थ आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील बुरखे हे फार उशिरा उघडे पडले. नंतर खाकीवर वरतून दबाव आले आणि त्यांच्या डायरीत जो आरोपी म्हणून उल्लेखला होता. त्याचे नाव वगळून एक मागासवर्गीय लायसनधारी व्यक्ती रेकॉर्डवर आणला गेला.
अर्थात या प्रकरणात दुर्दैव फक्त इतकेच की, जो मयत झाला तो मुलगा फार गुणी होता. त्याच्या पश्चात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर किमान ज्याने हा प्रकार केला तो अद्याप पसार आहे. त्याला कोणतेही शासन नाही. किमान काही कालावधी तरी जाऊन द्यावा लागत होता.  तोच भलत्या बैठका आरोपीचे सहकारी घेऊ लागल्या आहेत. मग काल जो काही प्रकार केला जात होता की, आरोपी अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे, त्याला 24 तास लॅकपला ठेवले पाहिजे? या सर्वांचा मतितार्थ काय होता? हे आरोपींना नव्याने सांगण्याची गरज निर्माण होऊ लागली आहे. करण, एक जीव गेला हे त्यांना कोणी समजून सांगावे.!
ज्या मुलाने समग्र विश्व पाहण्यापुर्वीच आपला श्वास सोडला त्या चिमुरड्या बालकास भावपुर्ण श्रद्धांजली.