संगमनेरात आणखी तीन रुग्ण, प्रशासन स्तब्ध, आता तुम्हीच तुमचे संरक्षक! नेमकं काय झालय शहराला!!

sushant pawse
सार्वभौम (संगमनेर) :
                    आता संगमनेरात कोरोनाचे थैमान म्हटले तरी काही वावघे ठरेल असे वाटत नाही. कारण, रोज वाढणारी आकडेवरी आणि मृतांची संख्या लक्षात घेता. तालुक्याचे चित्र हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. आता पुन्हा तीन रुग्ण मिळून आले असून गेल्या काही दिवसांपुर्वी शांत झालेले निमोण पुन्हा कोरोनाच्या दिशेने चालले आहे. येथे 41 वर्षींय तरुणाला तर शहरी भागात नाईकवाडापूरा येथे 39 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच मुंबईहून आलेल्या 48 वर्षीय व्यक्तीला हे सिमटन्स मिळून आले आहेत. त्यामुळे, संगमनेरचा आकडा 72 वर जाऊन पोहचला आहे.
                             
संगमनेरला कोरोनाने फार काही शिकवण दिली आहे. जातीय समिकारणापासून तर राजकीय समिकरणापर्यंत, सामाजिक दृष्टीकोणापासून ते आर्थिक समिकरणापर्यंत आणि कायदा व सुव्यवस्थेपासून तर प्रशासनाच्या अंतर्गत कलहापर्यंत सगळे काही धडे कोरोना देत आहे. येथे फक्त कमी पडले असेल तर ते म्हणजे ऐकीचे बळ! जनता आणि प्रशासन यांच्यात कधी ताळमेळ बसला नाही, लॉकडाऊन सुरू असताना देखील मटके आणि वाळुतस्कारी होत राहीली तरी अनेकांना पैशाचा मोह अटोपला नाही, त्याचा परिणाम आता नव्याने सांगायला नको. जी लोक बाहेरुन आले त्यांनी प्रशासनाला माहिती कळविणे अनिवार्य असताना देखील ते घरात दडून बसले. परिणामी त्याचे तोटे आज बाहेर पडू लागले आहेत. यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे नगरच्या आरोग्य विभागाने अनेकांना असमाधानकारक वागणूक आणि उपचार दिले. त्यामुळे तोंडा-तोंडी त्यांच्याविषयी नाराजी पसरली आणि लोकांनी घरात बसणे सहन केले मात्र, अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज आला तरी त्यांच्या उरात धडकी भरू लागली. अशी अनेक कारणे आजकाल समोर येऊ लागली आहे.
                      या दरम्यान एक गोष्ट वारंवार लक्षात येत होती. की, पोलीस आणि महसूल हे कोविड योद्धे जरी असले तरी त्यांच्यात्यांच्यात प्रचंड अंतर्गत वादंग असल्याचे बोलले जात होते. एकेकाळी महसूल रस्त्यावर पोलीस घरी अशा बातम्या झळकल्यानंतर पोलिसांनी अचानक रस्त्यावर धाव घेत 300 गाड्यांवर कारवाई केली. आता पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यात देखील कधी एकवाक्यता दिसून आली नाही. एका पोलीस कर्मचार्‍याने कंटेनमेंट क्षेत्रात एका नगरसेवकाच्या भावास झापले तर तो झोन तोडून पाचपंन्नास कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी निवेदने दिली. त्यांच्यावर कारवाई काय? तर शुन्य. मात्र, या पोलीस कर्मचार्‍यास माफी मागण्यास प्रवृत्त करण्यात आले. मग काय! आडला हरी....
                     
आता हा प्रकार येथेच थांबला नाही. याच दरम्यान एका पोलीस कर्मचार्‍यास तलाठी महोदय आणि महसूल कर्मचार्‍यांनी पोलीसाला काठीचा चोप दिला. त्याने महसूल व पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केली तर क्षमा वैगरे मागून त्यावर पडदा टाकला गेला. आता हे इतकेच मॅटर नाहीत. तर असे फार प्रकार जनतेच्या समोर आले. मात्र, त्यांची वाच्चता झाली नाही, लॉॅकडाऊनच्या काळात फार मोठमोठ्या तडजोडी झाल्य. तेव्हा सगळे घरात बसले होते. त्या दरम्यान अनेकांना कोरोना पावला. मात्र, याचे रुपांतर हळूहळू मतभेदात होत गेले. आणि आता त्याचा विस्पोट होताना दिसत आहे.
                     
 आजही अनेकांना कळायला तयार नाही की, त्या नायब तहसिलदार यांच्यावर इतक्या तत्काळ गुन्हा दाखल का केला? अनेक अर्ज पेंडींग आहेत त्यावर अद्याप काहीच कारवाई नाही. इतकेच काय! पोलीस प्रशासनाला आदेश आहेत की, जे लोक बाहेरील जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तशा प्रकारे अनेक पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी कर्मचारी आणि अन्य बडे लोक बाहेरून आलेले आहेत. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही? मात्र, ज्या नायब तहसिलदार यांनी गेली 3 महिने रस्त्यावर उभे राहून देशसेवेचे कर्तव्य बजावले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात इतकी तत्परता दाखविली गेली. अशा कोविड योद्ध्यांवर इतक्या तत्काळ गुन्हे दाखल होत असतील ते ते चूक आहे. त्यामुळे त्यांच्यास समर्थनार्थ कोणी सामाजिक संघटना किंवा प्रशासन एकवटेल का? हे देखील लवकरच लक्षात येईल.
                       
  अर्थात वर्दीला एक धनी नसातो. जो तो उठसूट आदेश देतो, ते पडद्याआड राहतात आणि आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर होतात. त्यामुळे, यामागे नेमकी कोणाला घाई झाली होती. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सगळ्यात आता महसूल आणि पोलीस देखील रस्त्यावर उतरतील असे वाटत नाही. केवळ कायदेशीर मार्गाने जे करायचे ते करण्याची मानसिकता कोणाची राहील असे वाटत नाही. त्यामुळे, आता तुम्हा आश्चर्य वाटेल. पण संगमनेर पुर्णत: रामभरोसे चालणार आहे. त्यामुळे, नागरिकांनो तुम्हीच आता तुमच्या जीवणाचे संरक्षक आहात. हेच प्रखर वास्तव आहे.!