अरे बाप रे! संगमनेरात त्या नायब तहसिलदारवर गुन्हा दाखल जिल्हाबंदीचे उल्लंघन, धक्कादायक प्रकार! ते व्हेंटीलेटरवर!

सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) : 
                  संगमनेर तालुक्यातील एका नायब तहसिलदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असतानाच संगमनेर पोलीस ठाण्यात मात्र त्यांच्याविरुद्ध बेकायदा अंर्तजिल्हा प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती गोपनिय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे, महसूल खात्यात एकच खळबळ उडाली आहे. इतकेच काय हा अधिकारी तिकडे ऑक्सिजनवर असून इकडे महसूल खात्याने जिल्हाधिकारी व पोलीस खात्याने पोलीस अधिक्षक कार्यालयात संबंधित गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे, जर खात्यात कोणावर वेळ आली की प्रशासन किती तत्परता दाखविते याची प्रचिती आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 3 ते 6 जून या कालावधीत संगमनेर तालुक्यातील एक नायब तहसिलदार हे त्यांच्या पत्नीस भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही परवाणा नव्हता असे आज प्रशासनाने सिद्ध केले आहे. ही बाबा कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट गुन्हा दाखल करण्याचा घाट घातला. त्यामुळे एकीकडे कोविड योद्धा म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचे पंख छाटायचे. हे कितपत योग्य आहे.? 
हे नायब तहसिलदार नक्कीच पुण्याला गेले होते. यात शंका नाही. मात्र, गेल्या कित्तेक दिवसानंतर आल्या कुटुंबास भेटण्यासाठी जाणे योग्य नाही का? अन्य पोलीस अधिकारी आणि महसूल तसेच वैद्यकीय अधिकारी आणि पुढारी लॉकडाऊन तोडून गेले नाही का? तुम्हाला धक्का बसेल की, जर या काळात कोणीकोणी ट्रेकींग केल्या, कोणकोण जिल्हाबदल करुन आले. असे कित्तेक पुरावे आहेत. मात्र, ज्यांनी गेली 3 महिने आहोरात्र काम केले. त्यांना कोविड योद्धा म्हणून शासन अशा प्रकारे गुन्हे दाखल करुन प्रमाणपत्र देत आहे.! त्यामुळे खरोखर जनतेच्या तोंठातून शब्द उमटू लागले आहे. वा रे! उद्धवा अजब तुझे सरकार.
याबाबत एक स्पष्टता अशी वाटते की, जर प्रशासनाला गुन्हा दाखल करायचा होता, तर थोडाफार वेळ जाऊन देणे गरजेचे होते. कारण हा व्यक्ती आज पुण्यात व्हेंटीलेटरवर आहे. अशा परिस्थितीत त्यास धिर देण्याऐवजी तातडीने गुन्हा दाखल करुन काय सिद्ध झाले? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरीत आहे. मात्र, आज गुन्हा दाखल होऊन जो काही प्रकार प्रशासनाने जनतेसमोर मांडला आहे तो न्याय नसून अन्याय आहे असे जनतेचे मत आहे.
विशेष म्हणजे जेव्हा नायब तहसिलदार यांना कोरोना झाला हे माहित झाले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना पुण्याला उपचार करण्यासाठी बोलावून घेतले असावे. कारण, नगरची व्यवस्था यावर न बोललेले बरे.  त्यामुळे त्या ताईसाहेब तेथे दिनानाथ मंगेशकर येथे आरोग्य खात्यात असून आपल्या पतीवर योग्य उपचार होऊन त्यांना तत्काळ पुन्हा देश सेवेसाठी हजर होता येईल असा त्यांचा हेतू होता. मात्र त्यांच्या मागे त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केले.
असो या सर्व प्रकारावर उद्या रोखठोक सार्वभौम आपले स्पष्ट मांडेल. मात्र, ज्यांनी गेली तीन महिने उन्हातान्हात घाम गाळून रस्त्यावर जनतेचे संरक्षण केले. त्याची आठवण प्रत्येक व्यक्तीने ठेवली पाहिजे. कारण, सामान्यता माणूस शंभर कामे चांगली करतो आणि एक काम वाईट केले की त्याच्या 99 कामांवर पाणी फेरले जाते हीच मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे, या महसूल अधिकार्‍याला लढ म्हणण्या ऐवजी जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत समाजातून नाराजीचा सुर बाहेर पडत आहे.