संगमनेरात दोन लहान भावांनी मोठ्या भावास बांधून मारले! पाच जणांवर गुन्हा दाखल
सार्वभौम (संगमनेर) :
शेतीच्या वादातून भावाने भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.7 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे घडली. यात मोठ्याभाऊ कारभारी गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सख्या भावासह पाच जणांनावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरवंडी येथे गायकवाड यांची कुटुंबियांची जमीन आहे. सोमवारी त्यांच्यात वाद झाला होता. यांच्यात एक सामाईक वाटपाचा रस्ता आहे. तो वादात असून मोठ्याभाऊ हे आरोपी उमाजी गायकवाड यांना म्हणाले की, तो रस्ता तू नांगरु नको. त्याहून दोघांमध्ये वादीवाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याने एकमेकांना शिवीगाळ दमदीटी सुरू केली. त्यावेळी आरोपी यांनी त्यांच्या नातेवाईकास बोलावून घेत तेथे वाद घातला. मोठ्याभाऊ हे त्यांसा समजून सांगत असताना आरोपी शुभम लहाणु सांगळे याने धारधार लोखंडी पट्टीने त्यांच्या हातावर धाव घातला. तर मोठ्याभाऊ यांना दाव्याने बांधून ठेवत मारहाण केली.
यात मोठ्याभाऊ यांना जबरी जखमा झाल्या आहेत. हा प्रकार त्यांच्या घरच्यांना समजला असता वरवंडीत तणावाचे वातावरण तयार झाले होते. भाऊ यांच्या हाताला गंभीर स्वरुपाचा मार लागल्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते. गेली दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, काल त्यांना बरे वाटले असता आश्वी पोलिसांनी त्यांचे जबाब नोेंदविले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आहे.
याप्रकरणी उमाजी कारभारी गायकवाड, रावसाहेब उमाजी गायकवाड, अभिषेक उमाजी गायकवाड, शुभम लहाणु सांगळे, अक्षदा रावसाहेब गायकवाड (सर्व रा. वरवंडी, ता. संगमनेर) अशा पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. संबंधित घटना घडताच पोलीस निरीक्षक मांडवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वास्तव माहिती घेत गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. घटनेचा पुढील तपास पवार करीत आहेत.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 9049247452 संगमनेर : 8308139547, 8208533006