अकोल्यातील कोतुळमध्ये कोरोनाचा रुग्ण! संगमनेरात एकने भर!
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील कोतुळ (बोरी) येथे घाटकोपर येथून आलेल्या 32 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल अकोले प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना बाधिताची संख्या आता 12 वार पोहचली आहे. तर संगमनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण 46 रुग्ण असताना आता त्यात एकने भर पडली आहे. संगमनेर शहरात मदिना नगर येथे एक व्यक्ती पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अकोले आणि संगमनेरात प्रत्येकी एक-एक रुग्ण मिळून आले आहे. यात मदिनानगर हे पुर्वीच कंटेनमेंट होते. त्यामुळे तेथे फारसे भितीचे कारण नाही. मात्र, अकोले तालुक्यातील कोतुळ येथे कोरोनाने पहिलीच ऐन्ट्री मारली असून तेथील प्रशासन सज्ज झाले आहे.