अकोल्यासाठी देव पावला! लिंगदेवचे शिक्षक आणि समशेरपुरचे रुग्ण सुखरूप घरी!


सार्वभौम (अकोले) :
                      अकोले तालुक्यातील लिंगदेव येेथे पहिला कोरोना बाधित रुग्ण मिळून आला होता. त्यामुळे  तालुक्यात खळबळ उडली होती. मात्रल तालुक्याचे भाग्य म्हणायचे की, हा पहिलाच रूग्ण अगदी सुखरुप घरी पोहचला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्याचा जीव भांड्यात पडला असून या शिक्षक रुग्णचा मोठा आनंदाने सगळ्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या सुखरुप असण्याने तालुक्याला  एक प्रकारचे बळ मिळाले असून सर्व अकोलेकरांनी डॉक्टर आणि आरोग्य प्रशासनाचे आभार मानले आहे.
                           
याबात सविस्तर माहिती अशी की, गेल्या महिन्यात लिंगदेव येथे मुंबईहून एक शिक्षक आले होते. त्यांना शाळेत क्वारंटाईन केले असता 10 दिवसानंतर त्यांचा रिपोर्ट एका खाजगी रुग्णालयातून मिळाला होता. त्यानंतर त्यांना नगरला दाखल करण्यात आले होते. त्यांच्यानंतर जवळपास नऊ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, एकही व्यक्ती कोरोना बाधित नाही यावर शिक्कामुर्तब झाला, याहून हे स्पष्ट झाले की, शिक्षकांनी तालुक्याला कोरोनाचा धडा दिला खरा. पण, त्यांनी स्वत:ची आणि इतरांना प्रादुर्भाव होणार नाही. याची देखील काळजी घेतली. हे शिक्षक क्वारंटाईन असताना त्यांना शाळेची स्वच्छता करुन अनेक छोटे-छोटे उपक्रम राबविले होते. त्यामुळे गावात त्यांना चांगली सहानुभूती मिळाली. मात्र, जेव्हा त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा सगळे गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. कोरोना हा नैसर्गिक संसर्ग आहे. त्यामुळे येथे समझदारी महत्वाची आहे. ते गावाने दाखविली. त्यामुळे तो एक नवा संदेश तालुक्याच्या बाहेर गेला.
खरंतर जेव्हा गावातील 2 हजार 500 लोकवस्ती कंटेनमेंट करण्यात आली होती. तेव्हा प्रशासनाने फार अथक परिश्रम घेतले. पोलीस बंदोंबस्त, सेवा सुविधा आणि सोशल डिस्टन्स असे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले. त्यामुळे सर्व गावकर्‍यांचा प्रशासनाने आभार मानले आहे.
                             
या पलिकडे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील मुलूंडहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या नको त्या आफवा पसरल्या होत्या. मात्र, रोखठोक सार्वभौमने याबाबत सखोल माहिती घेऊन रुग्णाशी संपर्क साधला असता तो अगदी ठणठणीत असल्याचे सविस्तर वृत्त मांडले. त्यामुळे तालुक्यात जे भितीचे वातावरण पहायला मिळत होते. ते नाहीसे झाले. हा रुग्ण देखील लवकरच त्यांच्या घरी येणार आहे. तर त्यांच्या सानिध्यात आलेल्या 40 व्यक्तींना गावकर्‍यांनी क्वारंटाईन केले होते. त्यांचे काही प्रमाणात हाल झाले. मात्र, स्थानिक उपसरपंच यांनी त्यांच्या दिलदार व्यक्तीमत्वाचे दर्शन घडवत त्यांना धिर दिला. आज जे काही संशयित नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेले होते. त्यांना आज सोडण्यात आले असून ते देखील सुखरूप घरी पोहचले आहेत. त्यामुळे तालुक्यासाठी हा फार मोठा सुखद प्रसंग आहे.
जर एखाद्या गावात कोणी बाहेरुन आले असेल त्याची माहिती प्रशासनाला द्या, मात्र, त्या कुटूंबाची हेळसांड करु नका, त्यांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांना शक्य त्या सुविधा द्या. कारण, कारोनाशी एकोप्याने लढायचे आहे. रुग्णाशी नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना समजून घ्या. जी परिस्थितीत अकोले तालुक्यात आहे. ती फार बिकट नाही. मात्र, द्वेष आणि माहितीची लपवाछपव केली तर मात्र येणारा काळ फार वाईट असेल. हे वास्तव आहे.

गेल्या दहा महिन्यापुर्वी सार्वभौम हे पोर्टत ओपन करण्यात आले होते. रोज सकाळ आणि संध्याकाळ असे दोन लेख यावर टाकले जात होते. त्या अभ्यासपुर्ण लेखाला वाचकांनी इतक्या डोक्यावर घेतले की, अवघ्या 464 लेख, बातम्या आणि विश्लेषण यांच्या जोरावर 50 लाख (आर्ध कोटी) वाचक झाले. त्यामुळे हे पर्वताऐवढे यश आमचे एकट्याचे मुळीच नाही. यासाठी प्रतिनिधी आणि सार्वभौमच्या बातम्या शेअर करणारे ज्ञात अज्ञात व्यक्ती यांचे आहे. त्यामुळे त्यांची उतराई म्हणून आज अर्धा कोटी वाचक झाल्यामुळे मी आज दि.1 जून रोजी 12 वे रक्तदान केले आहे. आपण सार्वभौमचे माय-बाप आहेत. आमच्याकडून शब्द अपशब्द गेला किंवा अनावधानाने चुका झाल्या तर मोठा मनाने पदरात घ्या. आम्ही तुमचे सेवक आहोत, पण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविताना जीव गेला तरी बेहत्तर पण   मागे हटणार नाही. लवकरच रोखठोक सार्वभौम हे सायं दैनिक वृत्तपत्र आपल्या भेटीस येत आहे. त्याला देखील तुम्ही इतकाच प्रतिसाद द्याल अशी आशा बळगतो.
आपला मित्र.

सागर शिंदे
सुशंत पावसे