बाबो.! अकोले तालुक्यातील वाघापूर आणि जांभळे येथो दोन कोरोना बाधीत.!


सार्वभौम (अकोले):
मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित आला असून घाटकोपर येथून अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित असल्याचा अहवाल आला आहे.
                       
 दरम्यान मुंबईहून जे रूग्ण आले आहेत. त्यातील तिघाजणांपैकी दोघांना बाधा झाली आहे. कारण, धामणगाव पाटच्या रुग्णाचे जांभळे कनेक्शन होते. त्यामुळे जांभळे गाव अडचणीत येणार अशी शंभर टक्के खात्री तालुक्यातला होती. धामनगावच्या रुग्णास  त्रास होत होता. तो घाटकोपरहून ज्या गाडीत आला त्याच गाडीत त्याने आपल्या जांभळ्यातील चुलत भावाला आणले, त्याला 3 दिवसांपूर्वी जांभल्यात सोडून तो पुढे गेला, दोन दिवसांपुर्वी जांभळे येथील शाळेत विलगिकरणात त्याला त्रास जाणवू लागल्यामुळे दोन दिवसांपुर्वीच रात्रीच त्याला तपासणीसाठी नगरला हलवले होते. त्याच्या सोबत त्याचा मूलगासुद्धा त्याच रूम मध्ये होता. बाजूच्या रूममध्ये 1 कुटुंब होते. त्याला नेल्यामुळं सगळ्यां गावाचा जीव भांड्यात पडला होता. आज हे रिपोर्ट प्राप्त झाले असून एक पॉझिटीव्ह तर अन्य निगेटीव्ह आले आहेत.
तर जी व्यक्ती वाघापूर येथे मिळून आली आहे. ती 62 वर्षीय महिला असून ती देखील मुंबई येथून आलेली आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांच्या मनाला एक प्रश्न सहज पडतो की, जर मुंबईहून आलेले जवळजवळ 70 ते 80 टक्के लोक कोरोना बाधित असल्याचे मिळून येत आहे. तर या मुंबईत गोपनिय आकडा किती मोठा, चिंताजनक आणि भयवाह असेल याची कल्पना करवत नाही.